गोसेच्या कालव्यात तरुणाचा मृत्यू (File Photo : Drowned)
चंद्रपूर : चंद्रपूर येथून पर्यटकांना घेऊन जाणारी एक पर्यटक बस भेडाघाटला पोहोचली. भेडाघाटच्या सरस्वती घाटात आंघोळ करताना एका पर्यटकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 5) सकाळच्या सुमारास घडली. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याला नदीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
ईश्वर मदन (वय 24, अंबाडी, ता. चंद्रपूर) असे मृत तरूणाचे नाव आहे. चंद्रपूर येथून सुमारे 40 प्रवाशांचा एक गट एका पर्यटक बसने धार्मिक स्थळांच्या भ्रमंतीसाठी निघाला होता. प्रवाशांची बस गुरुवारी सकाळी भेडाघाटला पोहोचली. त्यानंतर बस मैहर चित्रकूटला रवाना होणार होती. भेडाघाटला पोहोचताच बसमधील प्रवासी सरस्वती घाटावर पोहोचले. तिथे, ईश्वर मदन नदीत आंघोळ करण्यासाठी उतरला आणि काही वेळातच खोल पाण्यात गेला. त्याला बुडताना पाहून इतर साथीदारांनी मदतीची याचना केली.
हेदेखील वाचा : माण नदीवरील बंधाऱ्यावरून पायी जाणारा तरूण बुडाला; पोलिसांसह पालिकेकडून शोध सुरू
दरम्यान, आवाज ऐकून स्थानिक गोताखोरांनी नदीत त्या तरुणाचा शोध सुरू केला आणि खूप प्रयत्नांनंतर त्या तरुणाला मृतावस्थेत नदीतून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून घटनेचा तपास सुरू केला.
मोरबे धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत, रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयात थर्ड इअरमध्ये शिकणारा अनिकेत किसन भगत (वय 20) याचा मोरबे धरणात बुडून मृत्यू झाला. अनिकेत भगत हा सुकापूर, पनवेल येथील विद्यार्थी असून, बुधवारी परीक्षा संपल्यावर आणि एक मे पासून सुट्टी असल्याने मित्रांसोबत नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या परिसरात आला. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला.
हेदेखील वाचा : Karjat News: पावसाला सुरुवात होत नाही तोच पुलाच्या कामाचे तीनतेरा; उल्हास नदीवरील पूल वाहतूकीसाठी बंद