Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपुरात जंगली हत्तींचा धुमाकूळ; धान पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

गडचिरोली जिल्ह्यातून दोन जंगली हत्ती चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. हत्तींच्या भ्रमंतीदरम्यान धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 10, 2026 | 01:58 PM
Chandrapur News: चंद्रपुरात जंगली हत्तींचा धुमाकूळ; धान पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Chandrapur News: चंद्रपुरात जंगली हत्तींचा धुमाकूळ; धान पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Follow Us
Follow Us:
  • गडचिरोलीहून नदीमार्गे आलेल्या दोन जंगली हत्तींनी चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश केला.
  • सामदा, वाघोली आणि व्याहाड परिसरातील धान पिकांचे हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
  • वनविभागाने पंचनाम्यासाठी पथक नेमले असून ड्रोनसह ३० कर्मचाऱ्यांकडून हत्तींवर नजर ठेवली जात आहे.
चंद्रपूर: गडचिरोली जिल्ह्यातून नदीमार्गे शुक्रवारी रात्री दोन जंगली हत्तींचे चंद्रपूर जिल्ह्याच्या दिशेने आगमन झाले. सामदा बुज येथील दागोबा देवस्थान, वाघोली बुट्टी, व्याहाड परिसरातून मार्गक्रमण करीत या हत्तींनी जंगलाच्या दिशेने प्रवेश केला. या प्रवासादरम्यान हत्तींच्या मार्गात आलेल्या धान पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

Raigad News: श्रीवर्धनमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी-नागरिकांचा तीव्र विरोध; १३ ऑगस्टच्या सभेपूर्वी आंदोलनाचा इशारा

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन टस्कर हत्ती नदी ओलांडून जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. हत्तींचा संभाव्य मार्ग निश्चित करून त्या परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आले. सामदा बुज येथील दागोबा देवस्थान परिसरातून पुढे जात हत्ती वाघोली बुट्टी आणि व्याहाड बुज परिसरातून जंगलात पोहोचले. या भागात सध्या शेतांमध्ये धान पीक रोवण्याचा हंगाम असून अनेकांनी आवत्या टाकलेले आहे.  (फोटो सौजन्य – AI Created)

हत्तींच्या वावरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हत्तींच्या वजनामुळे धानाची पिके तुडवली गेली असून काही ठिकाणी पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे मेहनतीने उभे केलेले पीक डोळ्यांदेखत उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. हत्तींच्या भ्रमंतीमुळे सामदा, वाघोली आणि व्याहाड परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे धान पीक बाधित झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत आणि शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सध्या रोवणीचा हंगाम सुरू असून धान लागवड केलेल्या शेतात वारंवार हत्ती येऊन पिकांचे नुकसान करीत आहेत, दीड महिन्यापूर्वीही हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले होती. आता पुन्हा हत्ती परत आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने हत्तीचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात आणि तुटपुंजी मिळणारी नुकसानभरपाई वाढवून प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात भरपाई देण्यात यावी. – भाऊराव कोठारे, कापसी

निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! शेवटच्या वर्षातील वेतनवाढ नाकारणे चुकीचे; थकबाकी देण्याचे आदेश

हत्तीचा मुक्काम सध्या साखरी सिर्सी जंगल परिसरात आहे. दरम्यान प्रवासात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी पथक गठित करण्यात आले आहे. भ्रमंती मार्गातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येणार आहे. एखादा शेतकरी सुटल्यास त्यांनी वनविभागाकडे लेखी अर्ज करावा. हत्तीच्या देखरेखीसाठी रात्रीच्या सुमारास २० कर्मचाऱ्यांचे पथक तर दिवसा १० कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले असून ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगून वनविभागाच्या सुचनांचे पालन करावे.- विनोद धुर्वे, वनपरीक्षेत्र अधिकारी, सावली

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Wild elephants enter chandrapur from gadchiroli paddy crops damaged chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Best Before Reality : … मग अन्न विषारी होतं? Best Before चा नियम काय सांगतो? FSSAI ने दूर केला मोठा गैरसमज!
1

Best Before Reality : … मग अन्न विषारी होतं? Best Before चा नियम काय सांगतो? FSSAI ने दूर केला मोठा गैरसमज!

Singapore Airlines India GM : सिंगापूर एअरलाइन्सची मोठी घोषणा! भारत प्रमुखपदी अश्विन के. यांची नियुक्ती
2

Singapore Airlines India GM : सिंगापूर एअरलाइन्सची मोठी घोषणा! भारत प्रमुखपदी अश्विन के. यांची नियुक्ती

Sri Lanka Tour Package : कमी खर्चात श्रीलंकेची सफर! IRCTC ने लाँच केला ‘रामायण टूर पॅकेज’; 6 दिवसांमध्ये काय असणार खास?
3

Sri Lanka Tour Package : कमी खर्चात श्रीलंकेची सफर! IRCTC ने लाँच केला ‘रामायण टूर पॅकेज’; 6 दिवसांमध्ये काय असणार खास?

Raigad News: श्रीवर्धनमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी-नागरिकांचा तीव्र विरोध; १३ ऑगस्टच्या सभेपूर्वी आंदोलनाचा इशारा
4

Raigad News: श्रीवर्धनमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी-नागरिकांचा तीव्र विरोध; १३ ऑगस्टच्या सभेपूर्वी आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.