Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: राजुरा-आसिफाबाद मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात, वाहतुकीची समस्या गंभीर; नागरिकांकडून कारवाईची मागणी

राजुरा-आसिफाबाद-आदिलाबाद मार्गावर वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या गंभीर बनली असून वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर फलक, खुर्च्या आणि विविध साहित्य ठेवल्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 09, 2026 | 02:32 PM
Chandrapur News: राजुरा-आसिफाबाद मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात, वाहतुकीची समस्या गंभीर; नागरिकांकडून कारवाईची मागणी

Chandrapur News: राजुरा-आसिफाबाद मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात, वाहतुकीची समस्या गंभीर; नागरिकांकडून कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:
  • राजुरा-आसिफाबाद-आदिलाबाद मार्गावर वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे.
  • दुकानदार आणि व्यावसायिकांकडून रस्त्यावर फलक, खुर्च्या व इतर साहित्य ठेवल्याने सार्वजनिक रस्त्यांचा वापर बाधित होत आहे.
  • नागरिकांनी नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली आहे.
राजुरा-आसिफाबाद-आदिलाबाद या प्रमुख मार्गालगत वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काही दुकानदारांनी दुकानांचे फलक थेट रस्त्यावर आणून ठेवले असून, काही व्यावसायिकांकडून खुर्च्या, विविध साहित्य तसेच इतर वस्तू सार्वजनिक रस्त्यावर ठेवण्यात येत असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

छ. संभाजीनगरमध्ये मान्सून लांबला; सरासरीच्या केवळ ३६ टक्के पाऊस, शेतकरी चिंतेत; कृषी विभागाचा पेरणीबाबत महत्त्वाचा सल्ला

काही भंगार व्यावसायिक, चायनीज सेंटर चालक आणि इतर व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, अनेकदा किरकोळ अपघाताच्या घटनाही घडत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत ही समस्या अधिक तीव्र होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातील विविध चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर, पोस्टर आणि जाहिराती लावण्यात आल्याने शहराच्या सौंदर्यावरही विपरीत परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी फलक आणि जाहिरातींचे जाळे निर्माण झाल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली. आधीच शहरात अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर असताना रस्त्यावर फलक, खुच्र्चा आणि इतर साहित्य ठेवण्याचे प्रकार वाढल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

शहरांमध्ये प्रशासनाने विशेष मोहीम राबवा

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण हटवून बसविण्यात आलेल्या गड्डू टाइल्सवरही पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून रस्त्यांवरील अतिक्रमणे, अनधिकृत फलक तसेच बॅनर-पोस्टर हटवावेत, अशी मागणी केली. वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून प्रमुख मार्ग अतिक्रमणमुक्त करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Mumbai News: पवई तलावाचे अस्तित्व आले धोक्यात! दररोज सोडले जाते १८ दशलक्ष लीटर मलजल; महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

प्रशासनाने तातडीने कारवाई करावी

राजुरा शहरातील प्रमुख मार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अतिक्रमणामुळे सार्वजनिक रस्त्यांचा वापर खासगी व्यवसायासाठी होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर ठेवण्यात आलेले फलक, खुर्चा, साहित्य तसेच अनधिकृत बॅनरमुळे वाहतूक कोंडी वाढत असून अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Encroachments on rajura asifabad adilabad road raise traffic concerns citizens demand immediate action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
2

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
3

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
4

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.