Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: घोडाझरी धरणाच्या जलसाठ्यात वाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी व नागरिक चिंतेत होते. मात्र आता नागभीड तालुक्यासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 29, 2026 | 02:58 PM
Chandrapur News: घोडाझरी धरणाच्या जलसाठ्यात वाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

Chandrapur News: घोडाझरी धरणाच्या जलसाठ्यात वाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

Follow Us
Follow Us:
  • दोन दिवसांच्या पावसामुळे घोडाझरी धरणातील जलपातळी ११.२ फुटांवर पोहोचली असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
  • शेतीसाठी धरणात १५ ते १६ फूट पाणीसाठा आवश्यक असल्याने सध्या आणखी चार ते पाच फूट पाण्याची गरज आहे.
  • गतवर्षी ३० जुलैलाच धरण ओव्हरफ्लो झाले होते, मात्र यंदा कमी पाणीसाठ्यामुळे पर्यटकांसह शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
चंद्रपूर: नागभीड तालुक्यासह परिसरात गत २ दिवसापासून सतत सुरू असलेल्या रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे ऐतिहासिक घोडाझरी धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. पावसाने काहीशी ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या शेतकरी आणि नागरिकांना धरणातील वाढत्या पाणीसाठ्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. आजच्या परिस्थितीत झिरो पॉईंट धरून घोडाझरी धरणात ११.२ फूट, तर झिरो पॉईंट सोडून ८.२ फूट पाणीसाठा जमा झाला आहे.

Nepal Flood: नेपाळ-चीन पर्यटनाला गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत मोठी बातमी; ४५ जणांचा ग्रुप…

यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला अपेक्षित पाऊस न झाल्याने घोडाझरी धरणातील जलसाठा अत्यंत खालावला होता. धरणाचा तळ उघडा पडण्याची वेळ आल्याने शेतकरी आणि परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गत २ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून जलपातळीत झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी आशादायक मानली जात आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी ३० जुलैलाच घोडाझरी धरण ओव्हरफ्लो झाले होते. त्यावेळी सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.  (फोटो सौजन्य – AI Created) 

पाण्याचा मनमोहक नजारा पाहण्यासाठी पर्यटकांचीही मोठी गर्दी झाली होती. मात्र, यंदा त्याच कालावधीत धरणात तुलनेने अत्यल्प पाणीसाठा असल्याने गतवर्षाच्या तुलनेत पावसाची स्थिती किती बदलली आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. घोडाझरी धरण हे परिसरातील शेतीसाठी महत्त्वाचे जलस्रोत असून त्यावर अनेक शेतकऱ्यांच्या सिंचनाचा आधार आहे. पाण्याची वाढ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरत आहे.

धरणाला दमदार पावसाची गरज

पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर सांडव्यावरून कोसळणारे पाणी आणि निसर्गरम्य परिसर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतो. यंदा धरणातील कमी जलसाठ्यामुळे पर्यटनावरही परिणाम झाला आहे. आगामी काळात दमदार पाऊस झाल्यास धरणातील पाणीसाठा वाढून परिसराला पुन्हा निसर्गसौंदर्याची झळाळी मिळण्याची शक्यता आहे. तथापि, दोन दिवसाच्या पावसाने घोडाझरी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र अपेक्षित पावसाअभावी शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. गतवर्षी ३० जुलैलाच ओव्हरफ्लो झालेले धरण यंदा झिरो पॉईंट धरून ११.२ फूट पाण्यावर आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी दमदार पावसाची गरज आहे.

Mumbai Local Megablock : रविवारी प्रवाशांचा खोळंबा! मेगाब्लॉकमुळे ट्रान्स-हार्बरला फटका; वंदे भारतसह एक्स्प्रेसही होणार लेट

तरच मिळू शकतो पुरेसा आधार

घोडाझरी धरणात किमान १५ ते १६ फूट पाणीसाठा उपलब्ध झाल्यासच पिकांना पुरेसा आधार मिळू शकतो आणि शेतीतून समाधानकारक उत्पादन निघण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या झिरो पॉईंट धरून ११.२ फूट पाणी असले तरी शेतकऱ्यांची चिंता अद्याप पूर्णपणे दूर झालेली नाही. सध्या उपलब्ध जलसाठ्यापेक्षा आणखी चार ते पाच फूट पाण्याची वाढ होणे गरजेचे आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आगामी काळात धरणाच्या जलपातळीत आणखी वाढ होऊन १५ ते १६ फुटांचा आवश्यक टप्पा गाठता येईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत. घोडाझरी धरणाला पर्यटनाच्या दृष्टीनेही विशेष महत्व आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Ghodazari dam water level rises after two days of rain farmers get relief but more rain needed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची अनोखी कथा!
1

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची अनोखी कथा!

Lonavala Tourism News :  वीकेंडलाही लोणावळा ओस! पावसाच्या दांडीमुळे भुशी डॅम, धबधबे कोरडे
2

Lonavala Tourism News : वीकेंडलाही लोणावळा ओस! पावसाच्या दांडीमुळे भुशी डॅम, धबधबे कोरडे

Raigad News: आश्वासनं नको, ठोस निर्णय हवा! रिलायन्स पाताळगंगा कामगारांचा ७ सप्टेंबरला निर्णायक लढा, आंदोलनाचा इशारा
3

Raigad News: आश्वासनं नको, ठोस निर्णय हवा! रिलायन्स पाताळगंगा कामगारांचा ७ सप्टेंबरला निर्णायक लढा, आंदोलनाचा इशारा

Orry and Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये ओरीचा राडा? भर कार्यक्रमात दिली धमकी, नेमकं काय घडलं?
4

Orry and Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये ओरीचा राडा? भर कार्यक्रमात दिली धमकी, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.