
Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने मालिकेत प्रेक्षकांसाठी काही भागांची विशेष कथा सादर होणार आहे. श्रद्धा, ममता, आक्रोश आणि स्वामीभक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या या कथेत स्वामी समर्थांची आणखी एक अद्भुत लीला अनुभवायला मिळणार आहे.
पैशांची चणचण असल्यामुळे भर पावसात मासेमारीसाठी समुद्रात गेलेला बाजी परतत नाही आणि त्याच्या आईवर, कांतावर दुःखाचा डोंगर कोसळतो. बाजीशिवाय जगात आपलं असं कोणीच नसलेल्या कांताला एकच आशा उरते स्वामी समर्थ! आपल्या मुलाला परत मिळवण्यासाठी ती स्वामींच्या चरणी येते. पहा जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री ८.१० वा. आपल्या कलर्स मराठीवर. Jai Jai Swami Samarth Special Episode:
मात्र स्वामीस्थानाच्या उंबरठ्यावरच कांताचा कपिलासोबत वाद होतो आणि हा वाद इतका विकोपाला जातो की परिस्थिती हाताबाहेर जाते. कांताच्या मनात समुद्राबद्दल निर्माण झालेला राग, मुलाच्या विरहाचं दुःख आणि स्वामींकडून असलेली अपेक्षा यामुळे तिच्या मनात प्रचंड संघर्ष सुरू होतो.
अशातच स्वामी कांताला एक आगळंवेगळं काम सांगतात नारळी पौर्णिमेसाठी समुद्राला अर्पण करण्याचा नारळ सजवण्याचं! मात्र ज्या समुद्राने आपला मुलगा हिरावून घेतला, त्याच समुद्राला नारळ अर्पण करण्यास कांता स्पष्ट नकार देते. स्वामी आणि कांतामध्ये या हट्टाची अनोखी जुगलबंदी रंगते. दरम्यान, कांताला वारंवार बाजीचा आवाज ऐकू येऊ लागतो…“आई, माझ्यासाठी एवढं कर ना…”
Orry and Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये ओरीचा राडा? भर कार्यक्रमात दिली धमकी, नेमकं काय घडलं?
हा आवाज तिच्या मनाचा भास आहे की त्यामागे खरंच काही गूढ संकेत दडले आहेत? कांताच्या हातून नारळ सजवला जाईल का? आणि तिच्या या कठीण प्रवासात कपिला कोणते अडथळे निर्माण करणार? नारळी पौर्णिमेचा दिवस उजाडतो. पण अक्कलकोटमध्ये समुद्रच नाही, मग कांताच्या हातून नारळाचं विसर्जन कुठे आणि कसं होणार? याच प्रश्नाचं उत्तर देताना स्वामी समर्थांची अशी लीला घडते, जी पाहून भक्तांच्या अंगावर रोमांच उभे राहतील. आणि त्यानंतर… कांताच्या आयुष्यात घडणारं एक अनपेक्षित वळण तिच्या श्रद्धेला नवी दिशा देणार आहे.
Ram Kapoor-श्रेया यांच्या किसिंग सीनवरून वाद; आरोपांवर अभिनेत्याने अखेर सोडलं मौन, म्हणाले की…
स्वामी समर्थ खरंच कांताची हाक ऐकतील का? बाजीचा आवाज कांतापर्यंत का पोहोचतोय? समुद्र आणि स्वामी समर्थ यांच्यात नेमकं काय नातं आहे? कांताला दिलेल्या नारळामागचं स्वामींचं गूढ काय आहे? आणि रक्षाबंधनाच्या या पवित्र पर्वावर स्वामी समर्थांच्या हातावर कोण बांधणार आहे प्रेम, विश्वास आणि रक्षणाची राखी? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहा ‘जय जय स्वामी समर्थ’चा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष कथा भाग सलग चार विशेष भाग! पहा जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री ८.१० वा. आपल्या कलर्स मराठीवर.