Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: आश्वासनं नको, ठोस निर्णय हवा! रिलायन्स पाताळगंगा कामगारांचा ७ सप्टेंबरला निर्णायक लढा, आंदोलनाचा इशारा

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या पाताळगंगा प्रकल्पातील कामगारांच्या गेल्या दशकभराच्या संघर्षांनंतरही प्रलंबित विविध मागण्यांबाबत कंपनी प्रशासनाने कोणाताही निर्णय न घेतल्याने कामगार संतप्त झाले आहेत. या कामगरांनी रिलायन्स कंपनीच्या गेटवर धडक देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 29, 2026 | 02:41 PM
Raigad News: आश्वासनं नको, ठोस निर्णय हवा! रिलायन्स पाताळगंगा कामगारांचा ७ सप्टेंबरला निर्णायक लढा, आंदोलनाचा इशारा

Raigad News: आश्वासनं नको, ठोस निर्णय हवा! रिलायन्स पाताळगंगा कामगारांचा ७ सप्टेंबरला निर्णायक लढा, आंदोलनाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • प्रलंबित मागण्यांवर निर्णय न झाल्याने पाताळगंगा प्रकल्पातील कामगारांनी ७ सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
  • ‘समान कामासाठी समान वेतन’सह विविध मागण्यांसाठी कामगार मोहोपाडा येथील अचानक मैदानावर एकत्र येणार आहेत.
  • आंदोलनानंतर रिलायन्स कंपनीच्या गेटवर धडक देऊन व्यवस्थापनासमोर मागण्या मांडण्याची भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली आहे.
रसायनी: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या पाताळगंगा प्रकल्पातील कामगारांच्या गेल्या दशकभराच्या संघर्षांनंतरही प्रलंबित विविध मागण्यांबाबत कंपनी प्रशासनाने कोणाताही निर्णय न घेतल्याने कामगार संतप्त झाले असून रिलायन्स कंपनीच्या गेटवर धडक देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यामुळे कामगारांच्या या संघर्ष अथवा लढ्याला आता निर्णायक वळण मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. २०१५ पासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे १,८३४ कामगारांनी ७सप्टेंबर २०२६ रोजी मोहोपाडा येथील अचानक मैदानावर सहपरिवार एकत्र येत आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. त्यानंतर रिलायन्स कंपनीच्या गेटवर जाऊन आपल्या मागण्या प्रशासन व्यवस्थापनासमोर मांडण्याची भूमिका कर्मचारी संघटनेने जाहीर केली आहे.

Marathi Language: ‘यूपी-बिहारच्या मतांसाठी मराठीचा अपमान खपवून घेणार नाही’; अविनाश जाधवांचा भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल

कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ‘समान कामासाठी समान वेतन’ या मागणीचा समावेश आहे. या मागणीसंदर्भात औद्योगिक न्यायाधिकरण, ठाणे येथे सदर प्रकरणाची कार्यवाही झाली होती. या प्रकरणात पीठासीन अधिकारी एस. झेड. सोनभद्रे यांनी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अवार्ड पारित केले. संघटनेच्या म्हणण्यानुसार, या अवार्डमध्ये ‘समान कामासाठी समान वेतन’ या मागणीच्या मूळ गुणवत्तेवर अंतिम निर्णय देऊन ती मागणी चुकीची अथवा अमान्य ठरविण्यात आलेली नाही. यापूर्वी याच मागणीसंदर्भात कार्यवाही झाली होती. त्या पार्श्वभूमीवर सध्याचा संदर्भ मागे घेण्यासंदर्भात कार्यवाही झाली; मात्र भविष्यात त्याच मागणीसाठी नव्याने संदर्भ दाखल करण्याचे स्वातंत्र्य देण्याची विनंती न्यायाधिकरणाने मान्य केली नाही, अशी संघटनेची भूमिका आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

११ वर्षांच्या संघर्षाचा कुटुंबांवर मोठा परिणाम

दरम्यानच्या ११ वर्षांच्या संघर्षांचा कुटुंबावर परिणाम झाल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कामगारांचा प्रश्न केवळ वेतनाचा नाही, तर त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक आणि सामाजिक भवितव्याचा प्रश्न आहे, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने मांडली आहे. संघटनेच्या दाव्यानुसार, गेल्या ११ वर्षांच्या संघर्षाच्या कालावधीत तब्बल १८५ कामगाराचे निधन झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर या प्रदीर्घ संघर्षाचा परिणाम झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. २०१५ पासून आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, निवेदने दिली, पत्रव्यवहार केला, न्यायालयीन प्रक्रिया पार पडली, मात्र अद्याप प्रश्नाचा प्रत्यक्ष तोडगा निघालेला नाही. आता आश्वासनांपेक्षा ठोस कार्यवाही अपेक्षित आहे, अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.

Lek Ladki Yojana: मुंबईतील 3 हजार 563 लाभार्थींना मिळणार लाभ; अंतिम लाभ मिळण्यासाठी काय आहे अट?

आझाद मैदानावरील आंदोलनानंतरही प्रश्न कायम

कामगारांनी यापूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर दोन वेळा मोठ्या संख्येने आंदोलन केले होते. मात्र त्या आंदोलनांनंतरही प्रश्न सुटला नसल्याचा दावा कर्मचारी संघटनेने केला आहे. कंपनी व्यवस्थापनाकडून कामगाराशी अपेक्षित पातळीवर चर्चा झाली नसल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे आता ७ सप्टेंबरच्या आंदोलनाच्या माध्यमातून कामगार आपली एकजूट आणि मागण्यांची तीव्रता प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणार आहेत. ७ सप्टेंबर २०२६ रोजी मोहोपाडा येथील अचानक मैदानावर सुमारे १,८०० कामगार सहपरिवार एकत्र येणार आहेत. त्यानंतर रिलायन्स कंपनीच्या गेटवर जाऊन आपल्या प्रलंबित मागण्या मांडण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Reliance patalganga workers protest over 1800 employees to stage family protest on september 7

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
1

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
2

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
3

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर
4

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.