Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime : नवजात बाळ विक्री प्रकरणाला राजकीय वळण; भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक

चंद्रपूरमधील नवजात बाळ विक्री आणि मानवी तस्करी प्रकरणात तपासाला नवे वळण मिळाले असून, दस्तऐवजीकरण आणि प्रक्रियेत मदत केल्याच्या आरोपावरून भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी मुख्य आरोपींसह अन्य आरोपींवर मानवी तस्करी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 02, 2026 | 12:14 PM
नवजात बाळ विक्री प्रकरणाला राजकीय वळण; भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक

नवजात बाळ विक्री प्रकरणाला राजकीय वळण; भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक

Follow Us
Follow Us:
  • नवजात बालक विक्री प्रकरणात भाजपच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक
  • चंद्रपूरमधील नवजात बालक विक्री आणि मानवी तस्करी प्रकरण
  • दोन्ही महिला चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक
  • भाजप शहर महिला आघाडीच्या महामंत्री सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे यांना अटक
Chandrapur Crime News Marathi : चंद्रपूरमध्ये उघडकीस आलेल्या नवजात बालकांची विक्री आणि मानवी तस्करी प्रकरणाच्या तपासाला आता राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणात कागदपत्रांची पूर्तता आणि इतर प्रक्रियांमध्ये मदत केल्याच्या आरोपावरून रामनगर पोलिसांनी चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक असलेल्या भाजपच्या दोन महिला कार्यकर्त्यांना अटक केली आहे. दोन्ही महिलांना 1 जुलैला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सर्वांचे लक्ष तपासावर लागले आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिलांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलिसांकडून या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, दस्तऐवजांची देवाणघेवाण आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Amol Kolhe News: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं

दोन्ही महिला भाजपशी संबंधित

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सायली येरणे या भाजप शहर महिला आघाडीच्या महामंत्री आहेत, तर भाग्यश्री हांडे या देखील भाजपशी संबंधित पदाधिकारी असल्याची माहिती आहे. तपासादरम्यान नवजात बालकाच्या विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, संबंधित प्रक्रिया आणि समन्वय साधण्यात या दोघींची भूमिका असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या निष्कर्षानंतर दोघींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर अटक करण्यात आली.

यापूर्वी पाच आरोपींना अटक

रामनगर पोलिसांनी यापूर्वी या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय फुलझेले, पीडित अल्पवयीन मुलीची आई तसेच नवजात बालक खरेदी केल्याचा आरोप असलेल्या दोन महिलांसह एकूण पाच आरोपींना अटक केली होती. या सर्वांविरुद्ध मानवी तस्करी तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुरावे गोळा करत कारवाईचा विस्तार केला असून, या साखळीत आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर आता प्रकरणाचा तपास आणखी व्यापक होण्याची शक्य केली जात आहे.

तपासाचा विस्तार होण्याची शक्यता

या कारवाईनंतर नवजात बालक विक्री आणि मानवी तस्करीचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे. संबंधित कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि आरोपींच्या संपर्कातील इतर व्यक्तींची चौकशी सुरू असून, आणखी काही संशयितांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे चंद्रपूरमधील राजकीय वातावरणही तापले असून, विरोधकांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी मात्र तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू असल्याचे सांगत, पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल

Web Title: Chandrapur newborn baby sale human trafficking case bjp women office bearers arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • BJP
  • Chandrapur
  • crime
  • police

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा
1

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

Amol Kolhe News:  सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं
2

Amol Kolhe News: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं

Ketan Agrawal Muder Case: चेतन-सियाचा राजस्थानला शिफ्ट होण्याचा होता प्लॅन? चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा
3

Ketan Agrawal Muder Case: चेतन-सियाचा राजस्थानला शिफ्ट होण्याचा होता प्लॅन? चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा

Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाईचे आश्वासन
4

Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.