Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रशासकीय काळातील 21 कामांवर भाजप आमदाराचे बोट; विनानिविदा खर्च, जीएनआय निविदा अन्…

महापालिकेच्या प्रशासक कार्यकाळात आपत्कालीन अधिकारांचा वापर करून कोट्यवधी रुपयांची कामे विनानिविदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 11, 2026 | 04:45 PM
प्रशासकीय काळातील 21 कामांवर भाजप आमदाराचे बोट; विनानिविदा खर्च, जीएनआय निविदा अन्...

प्रशासकीय काळातील 21 कामांवर भाजप आमदाराचे बोट; विनानिविदा खर्च, जीएनआय निविदा अन्...

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या प्रशासक कार्यकाळात आपत्कालीन अधिकारांचा वापर करून कोट्यवधी रुपयांची कामे विनानिविदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. तब्बल २१ कामांबाबत आक्षेप नोंदवत त्यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर महापालिकेत जाऊन आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेतली. दीड तास चाललेल्या बैठकीत प्रशासक काळातील विविध निर्णय, खर्च आणि कार्यादेशांची माहिती मागविण्यात आली. विशेषतः कलम ६७ (३) (क) अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

 

महापालिकेवर सलग सहा वर्षे प्रशासक राजवट होती. या काळात विविध विकासकामांसाठी आपत्कालीन तरतुदीचा वापर करण्यात आला. मात्र, हे अधिकार केवळ तातडीच्या परिस्थितीसाठी असताना त्यांचा वापर अनावश्यक कामांसाठी केल्याचा दावा बंब यांनी केला. शासकीय निवासस्थानाचे नूतनीकरण, पेव्हर ब्लॉक टाकणे यासारख्या कामांवर २० कोटींचा खर्च केल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यापूर्वीही प्रशासक कार्यकाळातील कामांबाबत माहिती मागण्यासाठी बंब यांनी महापालिकेत भेट दिली होती. कागदपत्रांबाबत प्रशासनाकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याने त्यांनी हा विषय विधिमंडळात उपस्थित केला होता.

आता पुन्हा महापालिकेत येऊन संबंधित कामांची कागदपत्रे, खर्चाचा तपशील आणि प्रशासकीय मंजुरीबाबत माहिती मागितली. बैठकीत मुख्य लेखाधिकारी संतोष वाहूळे यांनी काही मुद्द्यांवर खुलासा केला. मात्र, तो समाधानकारक नसल्याचे सांगत बंब यांनी प्रत्येक प्रकरणाची सविस्तर माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली.

२१ प्रकरणांची यादी आयुक्तांसमोर ठेवली

मंगळवारी झालेल्या बैठकीत आमदार बंब यांनी तब्बल २१ मुद्द्यांची यादी आयुक्तांसमोर ठेवली. आर्थिक अनियमितता, विनानिविदा खर्च आणि प्रशासकीय प्रक्रियेतील त्रुटींची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

आपत्कालीन अधिकारांचा वापर की गैरवापर?

महापालिका कायद्यातील कलम ६७ (३) (क) अंतर्गत आयुक्तांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची कामे निविदेविना करण्याचे अधिकार आहेत. मात्र, याच तरतुदीचा आधार घेऊन सुमारे २० कोटी रुपयांची कामे करण्यात आल्याचा आरोप बंब यांनी केला. या कामांपैकी अनेक कामे अत्यावश्यक स्वरूपाची नसल्याने निविदा प्रक्रिया टाळण्यात आली का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

वर्षभरापासून सुरू आहे बंब यांचा पाठपुरावा

प्रशासक कार्यकाळातील निर्णयांबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत बंब यांनी वर्षभरापूर्वी तत्कालीन प्रशासक जी. श्रीकांत यांच्याकडे माहितीची मागणी केली होती. अपेक्षित माहिती न मिळाल्याने त्यांनी हा विषय विधिमंडळात उपस्थित केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी त्याच मुद्द्यांवर प्रशासनाला जाब विचारला आहे.

Web Title: A bjp mla has leveled allegations regarding the work carried out during the administrative tenure of the chhatrapati sambhajinagar municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • BJP
  • Chhatrapati Sambhajinagar
  • CM Devedra Fadnavis
  • Prashant Bamb

संबंधित बातम्या

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
1

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

सणासुदीच्या दिवसात बळीराजा संकटात, महायुतीचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही; काँग्रेसची टीका
2

सणासुदीच्या दिवसात बळीराजा संकटात, महायुतीचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही; काँग्रेसची टीका

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क
3

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप
4

Amit Shah : महाराष्ट्र बहुभाषिक म्हणता? संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक पाठवू!’; अमित शाहांवर मनसेचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.