Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Municipal Election 2026: राजकीय वर्तुळात खळबळ; अजित पवार यांच्या प्रचार कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न

Chhatrapati Sambhajinagar News: कैलासनगर परिसरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 08, 2026 | 02:45 PM
राजकीय वर्तुळात खळबळ; अजित पवार यांच्या प्रचार कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न (Photo Credit- X)

राजकीय वर्तुळात खळबळ; अजित पवार यांच्या प्रचार कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादीच्या प्रचार कार्यालयाला आग !
  • रणधुमाळी महापालिका निवडणुकीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
  • आरोपी अटकेत
Nationalist Congress Party campaign Office Fire: निवडणुकीच्या धामधुमीत आरोप-प्रत्यारोपांची भाषा अधिक धारदार होत चालली आहे. सोलापूरमध्ये खुनाची घटना घडल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रकार समोर आल्याने निवडणूक काळातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कैलासनगर परिसरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आरोपील अटक

दरम्यान, प्रकरणात पोलिसांनी तपास करुन अवघ्या काही तासात संशयीत आरोपी बाळू उर्फ योगेश मुळे (४०, रा. कैलासनगर) याला अटक केल्याची माहिती जिन्सी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रविकिरण कदम यांनी दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वार्ड अध्यक्ष योगेश गणेश शहाणे (२२) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, मयूर मोहनराव सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नगरसेवकपदाचे उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी कैलासनगर येथील दत्तानगर भागात परवानगी घेऊन कार्यालय उभारण्यात आले होते. या कार्यालयासमोर मंडप टाकण्यात आला होता.

पाण्यासाठी अजून वर्षभर वाट बघा… संभाजीनगरमध्ये हे काय बोलून गेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळें

सतर्कतेने आग आटोक्यात..

७ जानेवारी रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास परिसरातील नागरिक किशोर भुजबळ यांच्या निदर्शनास बाळू उर्फ योगेश मुळे हा व्यक्ती माचिसने मंडपाला आग लावताना आढळून आला. आरडा-ओरड होताच संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेला. तत्काळ गल्लीतील नागरिकांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली. या घटनेत मंडप व इतर साहित्य जळून अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले.

सीसीटीव्ही फुटेजने आरोपीला बेड्या

घटनेनंतर प्रचार कार्यालयात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासण्यात आले असता, एक लाल टी-शर्ट घातलेला व्यक्ती मंडपाला आग लावताना दिसून आला. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी बाळू उर्फ योगेश मुळे याला ताब्यात घेत अटक केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसवे वार्ड अध्यक्ष योगेश गणेश शहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर मनपा रणांगण; कोणाला मिळाली ‘शिट्टी’ तर कोणाला ‘बासरी’? पाहा अपक्षांच्या चिन्हांची संपूर्ण यादी!

Web Title: An attempt was made to set fire to ajit pawars campaign office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Rashtrawadi Congress

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
1

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
2

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या
3

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.