छत्रपती संभाजीनगर मनपा रणांगण; कोणाला मिळाली 'शिट्टी' तर कोणाला 'बासरी'? पाहा अपक्षांच्या चिन्हांची संपूर्ण यादी! (Photo Credit - X)
पक्षीय चिन्हे विरुद्ध अपक्षांची ‘मुक्त’ चिन्हे
महापालिका निवडणूक कार्यक्रम अंतर्गत २ जानेवारी रोजी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवार, ३ रोजी मैदानात असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात भाजप, शिवसेना-शिंदे गट, शिवसेना-उबाठा, काँग्रेस, रा. कॉ. (श.प.), रा. कॉ. (अ.प.), आम आदमी पार्टी, एमआयएम या निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेले राष्ट्रीय पर्भासह इतर राज्यांकडे नोंदणीकृत पक्ष, नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष यांच्यासह करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय पक्षांना कमळ, धनुष्यबाण, मशाल, घड्याळ, तुतारी, पंजा, पतंग, झाडू ही निशाणी देण्यात आली तर अपक्ष उमेदवारांना शिट्टी, ट्रॅक्टर, कपबशी, कपाट, नारळ, हेलिकॉप्टर, बासरी या चिन्हांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, कोणत्या आपल्याला चिन्हावर लढायचे आहे याची माहिती उमेदवाराला निवडणूक अर्ज सादर करताना द्यावी लागते. यात प्रथम प्राधान्य, द्वितीय आणि तृतीय असे तीन पर्याय द्यावे लागतात, उमेदवारांनी आपल्या आवडीचे जे चिन्ह दिलेले होते ते त्यांना देण्यात आले तर काही ठिकाणी एकाच चिन्हांची दोन ते तीन दावेदार असल्याने चिठ्ठचा टाकून चिन्ह देण्यात आले.
प्रचाराचा धडाका सुरू: कोणाची काय तयारी?
निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांनी आधीच आपले प्रचार साहित्य तयार केलेले आहेत. त्यावर त्यांचा प्रचारही सुरू झालेला आहे. तर अपक्षांना आज चिन्ह भेटल्यानंतर त्यांनी पॉम्पलेट्स, बॅनर्स, टोप्या, झेंडे असे प्रचारसाहित्यांची ऑर्डर दिली आहे. अंदाजे दोन दिवसात हे प्रचार साहित्य त्यांच्या ताब्यात येईल, यानंतर त्यांचा प्रचार सुरु होणार आहे. तूर्तास राष्ट्रीय पक्षातील उमेदवारांचा प्रचाराचा जोरदार धडाका सुरु झालेला आहे.
अपक्षांना करावी लागते मागणी
आपल्याला कोणत्या चिन्हावर लढायचे आहे याची माहिती उमेदवाराला निवडणूक अर्ज सादर करताना द्यावी लागते. यात प्रथम प्राधान्य, द्वितीय आणि तृतीय असे तीन पर्याय द्यावे लागतात. उमेदवारांनी आपल्या आवडीचे जे चिन्हे दिलेले असते ते त्यांना देण्यात येते. एकच चिन्ह दोन जणांनी मागितले असेल तर चिठ्ठी टाकली जाते. ज्यांना चिन्ह मिळाले नाही त्याला त्याचा दुसरा किंवा तिसरा पर्यायाचे चिन्ह दिले जाते. ते चिन्ह आयोगाकडे उपलब्ध नसेल तर आयोग मुक्त चिन्हातून चिन्हाचे वाटप करते. यंदा काही ठिकाणी बॅट आणि गॅस सिलिंडर चिन्हांची दोन ते तीन दावेदार असल्याने चिठ्ठधा टाकून चिन्ह देण्यात आले.
चिन्ह वाटपाची अशी असते पद्धत
चिन्ह वाटप करताना आधी राष्ट्रीय नोदणीकृत पक्षांना चिन्ह वाटप केली जातात. यात तीन गट पडले जातात. पहिल्या गटात भाजप, शिवसेना-शिंदे गट, शिवसेना-उबाळा, कॉग्रेस, रा. कॉ. (श.प.), रा. कॉ. (अ.प.) या निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेले राष्ट्रीय पक्षांना चिन्हे दिली जातात. यानंतर दुसऱ्या गटात इतर राज्यांकडे नोंदणीकृत पक्षांना चिना दिले जातात. तिसऱ्या गटात नोंदणीकृत जाते. यदा यात वंचित बहुजन आधाडी आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी), राष्ट्रीय अमान्यताप्राप्त पक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले समाज पक्ष (रासघ) हे तीन पक्ष आहेत. शेवटी अपक्ष उमेदवारांना विन्ह दिली जातात.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार चार टप्प्यांत चिन्हांचे वाटप करण्यात आले:
| गट | उमेदवाराचा प्रकार | प्रमुख चिन्हे / पक्ष |
| गट १ | राष्ट्रीय व राज्य मान्यताप्राप्त पक्ष | कमळ, धनुष्यबाण, मशाल, घड्याळ, तुतारी, पंजा, पतंग, झाडू |
| गट २ | इतर राज्यांतील नोंदणीकृत पक्ष | नोंदणीकृत चिन्हे |
| गट ३ | अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष | वंचित बहुजन आघाडी, रासप, बीआरएसपी |
| गट ४ | अपक्ष उमेदवार | शिट्टी, ट्रॅक्टर, कपबशी, हेलिकॉप्टर, बासरी इ. |






