Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुष्मान भारत जनआरोग्य योजना ठरली वरदान! संभाजीनगर जिल्ह्यात ८० हजार शस्त्रक्रिया पूर्ण, ‘इतक्या’ रुग्णांनी घेतला थेट लाभ

Mahatma Phule Jan Arogya Yojana: सन २०२४-२५ या वर्षात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने या योजनेत मोठी कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील ३९ हजार २९६ रुग्णांवर ८० हजार ३०० उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 25, 2025 | 03:30 PM
आयुष्मान भारत जनआरोग्य योजना ठरली वरदान! (Photo Credit - X)

आयुष्मान भारत जनआरोग्य योजना ठरली वरदान! (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:
  • ऐतिहासिक कामगिरी!
  • जिल्ह्यात ‘आयुष्मान भारत’ योजनेतून तब्बल ८०,३०० शस्त्रक्रिया पूर्ण
  • ३९ हजार रुग्णांना मिळाला मोफत उपचारांचा लाभ
छत्रपती संभाजीनगर: आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार उपलब्ध करून दिले जातात. सन २०२४-२५ या वर्षात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने या योजनेत मोठी कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील ३९ हजार २९६ रुग्णांवर ८० हजार ३०० उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. यासाठी ₹२४०.८३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २३ सप्टेंबर २०१८ रोजी या योजनेचा शुभारंभ झाला होता.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रित अंमलबजावणी

महाराष्ट्रामध्ये ही योजना राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत (MJPJAY) एकत्रितपणे राबवली जाते. या एकत्रित योजनेमुळे राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांना, तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, कंत्राटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनाही उपचारांचा लाभ मिळतो. यामुळे सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांना मोठी वैद्यकीय मदत मिळत आहे.

ई-कार्ड वितरणात जिल्ह्याची प्रगती

शासनाच्या प्रयत्नांमुळे या आरोग्य योजनेअंतर्गत ई-कार्ड वितरणात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने मोठी प्रगती केली असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

  • एकूण लाभार्थी संख्या: जिल्ह्यातील एकत्रित लाभार्थी संख्या ३४.३५ लाख आहे.
  • तयार झालेले ई-कार्ड: आतापर्यंत १०.४५ लाख ई-कार्ड तयार झाले आहेत.

योजनेतील मोफत उपचार मिळवण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याकडे आयुष्मान ई-कार्ड असणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar News:’आरक्षण ५०% पेक्षा जास्त; सुप्रीम कोर्टात अंतिम लढत’; इच्छुकांची धडधड वाढली

ई-कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया

जिल्ह्यातील नागरिकांनी आपले आयुष्मान ई-कार्ड तयार करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कांचन वानोरे आदींनी केले आहे.

ई-कार्ड बनवण्यासाठी आवश्यक:

  • आधार कार्ड आणि आधार संलग्नित मोबाईल नंबर.
  • १२ अंकी ऑनलाईन रेशन कार्ड क्रमांक (PM-JAY).
  • कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंकिंग पूर्ण असणे आवश्यक आहे.

ई-कार्ड बनवण्याचे ठिकाण: जिल्ह्यातील नागरिक आशा स्वयंसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, सीएससी केंद्रे (CSC Centres), आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकानदार यांच्या माध्यमातून किंवा ॲपद्वारे स्वतःच बेनिफिशिअरी लॉगिन करून ओटीपीच्या मदतीने ई-कार्ड तयार करू शकतात.

जिल्ह्यातील शस्त्रक्रियांची आकडेवारी

  • अंगीकृत रुग्णालये: जिल्ह्यातील १०५ रुग्णालये (१९ शासकीय व ८६ खाजगी) या योजनेअंतर्गत अंगीकृत आहेत.
  • पूर्ण झालेल्या शस्त्रक्रिया: २०२४-२५ या वर्षात ८०,३०० उपचार/शस्त्रक्रिया पूर्ण.
  • मंजूर निधी: याकरिता ₹२४०.८३ कोटी मंजूर

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar Crime: मोठी कारवाई! संभाजीनगरमध्ये ६१ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक; तर ‘इतक्या’ लाखाचा ऐवज जप्त

Web Title: Ayushman bharat jan arogya yojana has been a boon 80 thousand surgeries completed in sambhajinagar district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar News

संबंधित बातम्या

Bunty Dixit Murder Case :  हत्या केल्यानंतर मैदानात कट्टा फेकला, स्वतःच गाठले पोलीस ठाणे; आरोपीची धक्कादायक माहिती
1

Bunty Dixit Murder Case : हत्या केल्यानंतर मैदानात कट्टा फेकला, स्वतःच गाठले पोलीस ठाणे; आरोपीची धक्कादायक माहिती

वैजापुरात चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली चार दुकाने; मुरारी पार्क, लाडगाव रोड परिसरात धुमाकूळ
2

वैजापुरात चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली चार दुकाने; मुरारी पार्क, लाडगाव रोड परिसरात धुमाकूळ

‘दहा लाख रुपये दे, नाहीतर गेम करेन’; थेट उपमहापौरांनाच मिळाली जीवे मारण्याची धमकी
3

‘दहा लाख रुपये दे, नाहीतर गेम करेन’; थेट उपमहापौरांनाच मिळाली जीवे मारण्याची धमकी

FDA News: महाराष्ट्रात औषध विक्रेत्यांवर FDA चा मोठा बडगा! दोन आठवड्यांत २९ परवाने रद्द, ७१ निलंबित
4

FDA News: महाराष्ट्रात औषध विक्रेत्यांवर FDA चा मोठा बडगा! दोन आठवड्यांत २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.