Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: गॅस टंचाईवर सरकारचा तोडगा! १.४४ लाख लिटर रॉकेल मंजूर; आजपासून ग्रामीण भागात वितरण सुरू

आज शुक्रवार, २४ एप्रिलपासून हा पुरवठा प्रत्यक्ष सुरू होत आहे. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरातील कच्चे तेल आणि गॅस पुरवठा विस्कळित झाला आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून देशात गॅस टंचाई जाणवत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 24, 2026 | 03:15 PM
गॅस टंचाईवर सरकारचा तोडगा! १.४४ लाख लिटर रॉकेल मंजूर

गॅस टंचाईवर सरकारचा तोडगा! १.४४ लाख लिटर रॉकेल मंजूर

Follow Us
Follow Us:

 

  • गॅस टंचाईवर सरकारचा तोडगा!
  • १.४४ लाख लिटर रॉकेल मंजूर
  • आजपासून ग्रामीण भागात वितरण सुरू
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): एलपीजी गॅस तुटवड्यावर उपाययोजना म्हणून राज्यात राॅकेल पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी १ लाख ४४ हजार लिटरचा कोटा मंजूर केला आहे. आज शुक्रवार, २४ एप्रिलपासून हा पुरवठा प्रत्यक्ष सुरू होत आहे. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरातील कच्चे तेल आणि गॅस पुरवठा विस्कळित झाला आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून देशात गॅस टंचाई जाणवत आहे.

बुकिंग करुनही गॅस मिळण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा अवधी लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरुपात रॉकेलचा पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे.  महाराष्ट्रात सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे २०१६ पर्यंत रेशन दुकानांवरुन रॉकेलचा पुरवठा होत होता. परंतु त्यानंतर तो बंद करण्यात आला. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी आता ३७४४ किलो लिटर नियतन मंजूर केले आहे.

यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी १ लाख ४४ हजार लिटरचा समावेश आहे. रॅकिल परवानाधारकांना पूर्वी प्रति किलो लिटर ६७५ रुपये इतके कमिशन दिले जात होते. आता राज्य सरकारने त्यात दुप्पट वाढ करुन ते १३५० रुपये इतके केले आहे हे विशेष. जिल्ह्याचा पुरवठा पुण्यातील लोणी काळभोर येथील डेपोतून होणार आहे. हा पुरवठा करण्यासाठी डिलरची नेमणूक करण्यात आली असून आता आज शुक्रवारपासून जिल्ह्यात रॉकल पुरवठ्यास सुरूवात होत आहे. येत्या २७ एप्रिलपर्यंत हा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी रॉकेलचे दरही निश्चित करण्यात आले असून जिल्ह्यात सरासरी ६३ रुपये लिटरने हे रॉकेल ग्राहकांना मिळणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar: मनपाची प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; १० टन प्लास्टिक जप्त, ७५ हजारांचा दंड वसूल

नागरिकांना मिळाला चांगलाच दिलासा

जिल्ह्यातील नागरिकांना आता रॉकेल मिळणार असल्याने चांगलाच दिलासा मिळणार आहे. त्यामुळे गॅससाठी व इंधनासाठी होणारी महिलांची परवड रॉकेल मिळाल्यानंतर थांबणार असल्याचे दिसते. त्यामुळे आजपासून मिळणारे रॉकेल ग्रामीण भागातील नागरिक खरेदी करतात की नाही हे पाहणे उचित ठरणे आहे.

केवळ ग्रामीण भागातच रॉकेलाचा होणार पुरवठा

तालुकानिहाय घाऊक आणि अर्धघाऊक विक्रेत्यांना नियतन मंजूर करण्यात आले आहे. आयओसी (IOC) कंपनीला ऑर्डर दिली असून, शुक्रवारपासून प्रत्यक्ष वितरण सुरू होईल. यामुळे ग्रामीण भागातील इंधन टंचाई दूर होण्यास मदत होईल,” असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी स्पष्ट केले.

Chhatrapati Sambhajinagar: ‘स्मार्ट सिटी’ला अखेर गुंडाळले! अधिकारी-कर्मचारी संभ्रमात; आयुक्तांशी चर्चेनंतर पुढील दिशा स्पष्ट

Web Title: Chhatrapati sambhajinagar district kerosene supply starts to tackle lpg shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Gas Shortage

संबंधित बातम्या

तुझी इन्स्टा आयडी दे, मला तुझ्यासोबत…; अल्पवयीन तरुणीला भर रस्त्यात मारहाण
1

तुझी इन्स्टा आयडी दे, मला तुझ्यासोबत…; अल्पवयीन तरुणीला भर रस्त्यात मारहाण

Jayakwadi Dam Water Level: जायकवाडी ८० टक्क्यांच्या उंबरठ्यावर! ५० हजार क्युसेकने पाण्याची आवक; मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली
2

Jayakwadi Dam Water Level: जायकवाडी ८० टक्क्यांच्या उंबरठ्यावर! ५० हजार क्युसेकने पाण्याची आवक; मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली

Abhijeet Dipke on Amit Shah: ‘अमित शाह यांच्या आदेशावरूनच…’, अभिजीत दीपके यांचा खळबळजनक आरोप, तर केंद्र सरकारवरही टीकेचे बाण
3

Abhijeet Dipke on Amit Shah: ‘अमित शाह यांच्या आदेशावरूनच…’, अभिजीत दीपके यांचा खळबळजनक आरोप, तर केंद्र सरकारवरही टीकेचे बाण

Chhatrapati Sambhajinagar: नागरिकांच्या जमिनी अन् गोपनीय डेटा धोक्यात? छत्रपती संभाजीनगरातील ‘या’ शासकीय कार्यालयात एजंटांचे राज्य
4

Chhatrapati Sambhajinagar: नागरिकांच्या जमिनी अन् गोपनीय डेटा धोक्यात? छत्रपती संभाजीनगरातील ‘या’ शासकीय कार्यालयात एजंटांचे राज्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.