मनपाची प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; १० टन प्लास्टिक जप्त, ७५ हजारांचा दंड वसूल
महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या नागरी मित्र पथकाने ही कारवाई केली. गंगवाल प्लास्टिक, एस. के. प्लास्टिक (संजय आसाराम कटार) आणि एस. पी. प्लास्टिक या दुकानांमध्ये मोठ्या यमाणावर एकल वापराच्या फास्टिकचा साठा आढळला. संपूर्ण साठा जप्त करण्यात आला असून, तो पुन्हा वापरात येऊ नये यासाठी त्याची दिवसांत मनपाने १० हजार किलोपेक्षा अधिक प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले आहे. त्यामुळे २० लाख किमतीच्या ३४ ते ३५ लाख प्लास्टिक कॅरीबॅग बाजारात व्येण्यापासून रोखण्यातयश आले आहे.
महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले की, प्लास्टिकमुक्त शहरासाठी शून्य सहनशीलता धोरण राबविण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. व्यापारी व नागरिकांनी तात्काळ प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आणि साठा बंद करावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
सहायक आयुक्त रमेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरी मित्र पथकाने ही कारवाई केली. पथकात देविदास सुसर, बालाजी साबळे, सुवणासिंग परदेशी जनार्दन सांगळे, संतोष बनकर, किशन निकम, ज्ञानेश्वर पाटील, रतन वाघ, नारायण फुके, जयेश मगरे आदीचा समावेश होता. स्वच्छता अधिकारी अनिल जाधव, सचिन मिसाळ, अभिजित गंगावणे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
प्लास्टिक असोसिएशनच्या पदाधिका-यांनी उपायुक्त भोंबे यांची भेट घेऊन सहकार्याची तयारी दर्शवली. काही विक्रेत्यांनी स्वतः हुन साठा परत करण्याची तयारी दर्शवली असून, मनपा व व्यापारी यांच्यात समन्वयातून कारवाईचा निर्णय घेण्यात आला.






