Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रशासनाचा संयम सुटला! ३५ पैकी आली फक्त १ ई-बस; जूनअखेरपर्यंत बसेस न आल्यास ‘ऑलेक्ट्रा’चा करार रद्द होणार

शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तसेच प्रदूषणमुक्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २०२२ मध्ये ऑलेक्ट्रा कंपनीशी करार केला होता.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 08, 2026 | 02:27 PM
प्रशासनाचा संयम सुटला! ३५ पैकी आली फक्त १ ई-बस; जूनअखेरपर्यंत बसेस न आल्यास ‘ऑलेक्ट्रा’चा करार रद्द होणार
Follow Us
Follow Us:

 

  • प्रशासनाचा संयम सुटला!
  • ३५ पैकी आली फक्त १ ई-बस
  • जूनअखेरपर्यंत बसेस न आल्यास ‘ऑलेक्ट्रा’चा करार रद्द होणार
छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक आणि पर्यावरणपूरक स्वरूप देण्यासाठी राबविण्यात येणारा ई-बस प्रकल्प चार वर्षांपासून रखडलेला आहे. हैदराबादस्थित ऑलेक्ट्रा कंपनीकडून भाडेतत्त्वावर उपलब्ध होणाऱ्या ३५ ई-बसांपैकी अद्याप केवळ एकच बस महापालिकेला मिळाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली असून जूनअखेरीपर्यंत कंपनीने आपली भूमिका स्पष्ट न केल्यास आणि बसेस उपलब्ध करून न दिल्यास करार रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिला आहे.

शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तसेच प्रदूषणमुक्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २०२२ मध्ये ऑलेक्ट्रा कंपनीशी करार केला होता. या प्रकल्पात नऊ मीटर आणि बारा मीटर लांबीच्या एकूण ३५ ई-बसांचा समावेश करण्यात आला होता. मात्र कराराला चार वर्षांचा कालावधी उलटूनही प्रकल्प अपेक्षित गतीने पुढे सरकलेला नाही. महापालिकेने अनेक वेळा कंपनीला मुदतवाढ दिली.

प्रत्येक सहा महिन्यांनी वाढविण्यात आलेल्या मुदतीमुळे प्रकल्पाची अंमलबजावणी सातत्याने लांबणीवर पडत गेली. सध्या कंपनीला देण्यात आलेली मुदत १५ जून रोजी संपत आहे. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्यास जूनअखेरीस अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जाधववाडी येथील बस डेपोमध्ये ई-बसांसाठी चार्जिंग यंत्रणा उभारण्याचे काम अंतिम टप्यात पोहोचले आहे. त्यामुळे बसेस उपलब्ध नसल्याने नागरिकांना लाभ मिळू शकलेला नाही.

ऐतिहासिक पैठण नगरीत कचऱ्याचे साम्राज्य! ७० हजार लोकसंख्येसाठी अवघ्या २ घंटागाड्या; पावसाळ्यापूर्वी रोगराईची भीती

महापालिका प्रशासनाचा आता संयम संपला

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरासाठी ३५ ई-बस खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी २०२२ मध्ये ऑलेक्ट्रा कंपनीशी करार करण्यात आला. मात्र आतापर्यंत केवळ एकच बस उपलब्ध झाली आहे. उर्वरित ३४ बसेस कधी मिळणार याबाबत कंपनीकडून स्पष्टता नसल्याने महापालिकेने नाराजी व्यक्त केली आहे.

जाधववाडी डेपोमध्ये चार्जिंग स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे आले असतानाही बस नसल्याने संपूर्ण व्यवस्था वापराविना पडून आहे. त्यामुळे जूनअखेरीपर्यंत कंपनीने बसेस उपलब्ध करून देण्याबाबत ठोस भूमिका घेतली नाही तर करार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल.

नो-नेटवर्क भागातील नागरिकांना दिलासा! ‘या’ तारखेपासून थेट घरात येणार नळ; महापालिका आयुक्त अमोल येडगे यांची मोठी घोषणा

Web Title: Chhatrapati sambhajinagar municipal commissioner amol yedge warns olectra company over delayed e bus project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार
1

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार

मनपासमोरून रिक्षा चोरली, 10 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले अन्…
2

मनपासमोरून रिक्षा चोरली, 10 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले अन्…

Jalgaon News: गैरवर्तन पडलं महागात! पोलिस अधीक्षकांनी उचललं कठोर पाऊल
3

Jalgaon News: गैरवर्तन पडलं महागात! पोलिस अधीक्षकांनी उचललं कठोर पाऊल

FDA Big Action: ‘उत्तम उपहारगृहा’वर एफडीएचा मोठा हातोडा! अस्वच्छता अन्…; परवाना निलंबित करून हॉटेल केले सील
4

FDA Big Action: ‘उत्तम उपहारगृहा’वर एफडीएचा मोठा हातोडा! अस्वच्छता अन्…; परवाना निलंबित करून हॉटेल केले सील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.