Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनपासमोरून रिक्षा चोरली, 10 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले अन्…

शहागंज परिसरातील १० वर्षीय मुलीच्या अपहरण व सुटका प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे. अपहरणासाठी वापरण्यात आलेली रिक्षा आरोपीने चोरी केल्याचे उघड झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 25, 2026 | 01:11 PM
मनपासमोरून रिक्षा चोरली, 10 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले अन्...

मनपासमोरून रिक्षा चोरली, 10 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले अन्...

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : शहागंज परिसरातील १० वर्षीय मुलीच्या अपहरण व सुटका प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे. अपहरणासाठी वापरण्यात आलेली रिक्षा आरोपीने घटनेच्या सुमारे तासभर आधी मनपा मुख्यालयासमोरून चोरी केल्याचे उघड झाले आहे. रिक्षाच्या नोंदणी क्रमांकावरून मालकाचा शोध घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.

 

राजाबाजार येथील ५१ वर्षीय व्यक्ती चेलीपुरा परिसरात दुरुस्तीसाठी दिलेला टीव्ही आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या १० वर्षीय नातेवाईक मुलीला शहागंज येथे भाजीपाला विक्री करणाऱ्या नातेवाईकाकडे काही वेळासाठी सोपविले. नंतर मुलीला कुरकुरे आणण्यासाठी बाहेर पाठविण्यात आले असता आरोपीने तिच्याशी संवाद साधला. ‘तुझी आंटी माझ्या ओळखीची आहे,’ असे सांगून त्याने मुलीचा विश्वास संपादन केला. १०० रुपये देत खाऊ आणण्याचे आमिष दाखवून तिला रिक्षात बसविले आणि अपहरण केले. घटनेनंतर मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : घाटी परिसरातून महिलेचे अपहरण; पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन सलग दोन दिवस अत्याचार

सीसीटीव्ही अन् तांत्रिक तपासावर भर

तपासादरम्यान रिक्षा क्रमांकावरून मालकापर्यंत पोहोचलेल्या पोलिसांना, संबंधित रिक्षा मनपा मुख्यालयासमोरून चोरीला गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आरोपीने वाहन चोरी करून त्याचाच वापर अपहरणासाठी केल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसानी तपासावर विशेष लक्ष ठेवले आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, सिटी चौकच्या निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर आणि राहुल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तपास करीत असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी समन्वयाने कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. चिमुकलीने दिलेल्या वर्णनाच्या आधारे संशयितांचे छायाचित्र दाखवून ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शीच्या माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : पीएमपीएमएल ठेकेदाराच्या फायद्यासाठी? नगरसेवकांचा उपरोधिक सवाल; प्रशासनावर जोरदार टीका

Web Title: A shocking incident involving the kidnapping of a little girl has occurred in sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • Arrested News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
1

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल
2

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल

Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र
3

Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई
4

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.