Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FDA Big Action: ‘उत्तम उपहारगृहा’वर एफडीएचा मोठा हातोडा! अस्वच्छता अन्…; परवाना निलंबित करून हॉटेल केले सील

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध उत्तम उपहार गृहावर धाड टाकून परवाना निलंबित केला. दूषित तेल, अस्वच्छता आणि झुरळांचा वावर आढळल्याने ही मोठी कारवाई झाली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 24, 2026 | 03:14 PM
'उत्तम उपहारगृहा'वर एफडीएचा मोठा हातोडा! अस्वच्छता अन्...;

'उत्तम उपहारगृहा'वर एफडीएचा मोठा हातोडा! अस्वच्छता अन्...;

Follow Us
Follow Us:
  • ‘उत्तम उपहारगृहा’वर एफडीएचा मोठा हातोडा!
  • अस्वच्छता अन्…;
  • परवाना निलंबित करून हॉटेल केले सील
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरातील हजारो ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या उत्तम उपहार गृहामध्ये अन्न सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) धाडीत समोर आले. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या निर्मितीत वारंवार वापरलेले तेल आणि डालडा, झुरळांचा वावर, अस्वच्छता, कृत्रिम रंगाचा बेजबाबदार वापर आणि इतर गंभीर त्रुटी आढळल्याने प्रशासनाने आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित करत व्यवसाय बंद केला. शहरातील नावाजलेल्या उपहारगृहावरील या कारवाईने खाद्यसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत २२ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. तपासणीत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत अनेक गंभीर उल्लंघने समोर आली. विशेष म्हणजे शहरातील नावाजलेल्या उपहारगृहात ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांच्या निर्मितीतच आरोग्याच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

तपासणीदरम्यान समोसे, भजी आदी पदार्थांसाठी वारंवार वापरलेले सरकीचे तेल वापरले जात असल्याचे आढळले. अन्न पदार्थांसाठी वापरल्या जाणारे टेलाचे बीआर रिडिंग २५ पर्यंत नार्मल असते. माञ उत्तम मधील तेलाची टीपीसी मीटरद्वारे तपासणी केली असता तेलाचे बीआर रिडिंग ५८ इतके नोंदले गेले. तसेच इमरती जिलेबी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती तुपाचे (डालडा) रिडिंग ३६ इतकी होती. जी की, आरोग्यास अपायकारक असल्याचे स्पष्ट झाले. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी कि.ल. झाडे, सहायक आयुक्त द.वि. पाटील आदींनी केली.

FDA On BMC Canteen: मुंबई महापालिका कँटीनवर FDAचा दणका; ताकात माशी सापडल्याने कँटीन सील करण्याचे निर्देश

किचनमध्ये आढळली झुरळे; आंबवलेले पीठ

अन्न तयार करण्याच्या ठिकाणी झुरळांचा मुक्त वावर, भिंतींवर जळमटे व तेलाचा थर, उघड्या कचरापेट्या, खिडक्यांना जाळी नसणे अशा गंभीर त्रुटी आढळल्या. इडलीसाठी तयार केलेले आंबवलेले पीठ सांडपाण्याच्या नाल्यालगत उघड्यावर ठेवण्यात आले होते. याशिवाय उत्पादन विभागात तंबाखूची पाकिटे आणि भिंतींवर थुंकल्याच्या खुणाही आढळल्या.

कामगारांचे आरोग्य प्रमाणपत्रच नाही

मिठाई उत्पादन सुरू असतानाही आस्थापनेने उत्पादक ऐवजी रेस्टॉरंट या प्रकारचा परवाना घेतल्याचे निदर्शनास आले, इमरती-जिलेबीमध्ये वापरल्या जाणाऱ्या टार्द्राझीन या कृत्रिम रंगाचा वापर किती प्रमाणात करायचा, याची माहिती कामगारांना नव्हती. शिवाय सुमारे २५ ते ३० कामगारांचे वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते.

अस्वच्छतेचा कळस; नमुने प्रयोगशाळेत

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम-२००६ अंतर्गत आढळलेल्या गंभीर उल्लंघनांमुळे उत्तम उपहार गृहाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. आस्थापना बंद करण्यात आली आहे. वारंवार वापरलेल्या खाद्यतेल व वनस्पती तुपाचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवालानंतर कारवाई केली जाणार आहे.

मलम कागदावर, औषध रिकाम्या बाटल्यांमध्ये; FDA च्या तापासातून दवाखान्यांतील धक्कादायक प्रकार उघड

Web Title: Fda suspends license of uttam upahar gruha over unhygienic conditions and toxic oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • FDA
  • FDA Raid
  • Food Safety
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Solapur News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; अभिनव स्नॅक्सला तात्काळ व्यवसाय बंदचे आदेश
1

Solapur News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; अभिनव स्नॅक्सला तात्काळ व्यवसाय बंदचे आदेश

FDA News: एफडीएची राज्यभर धडक कारवाई! 3 महिन्यांत 12,083 तपासण्या; तब्बल 67.20 कोटींचा अन्नसाठा जप्त
2

FDA News: एफडीएची राज्यभर धडक कारवाई! 3 महिन्यांत 12,083 तपासण्या; तब्बल 67.20 कोटींचा अन्नसाठा जप्त

Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी
3

Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
4

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.