
Jalgaon News (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला
या प्रकारांची गंभीर दखल पोलिस घेत अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दोन्ही सहायक फौजदारांना तात्काळ निलंबित केले. निलंबन काळात त्यांना दररोज सकाळी व सायंकाळी राखीव पोलिस निरीक्षकांकडे हजेरी लावणे बंधनकारक राहणार असून, अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालयाची हद्द सोडता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. शिस्तभंगाच्या या कारवाईची जिल्हा पोलिस दलात जोरदार चर्चा सुरू आहे. (Jalgaon News)
16 जुलै रोजी दुपारी गीता कश्यप यांनी पोलिस मुख्यालयातील हजेरी प्रमुख संभाजी पाटील यांना वेतनवाढीबाबत वरिष्ठांकडे अहवाल का पाठविला, याचा जाब विचारत शिवीगाळ केली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेले राखीव पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांच्याशीही त्यांनी आक्रमक वर्तन केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Jalgaon LIVE Updates | Navarashtra (नवराष्ट्र)
17 जुलै रोजी श्रद्धा रामोशी यांनीही हजेरी कक्षात येऊन गोपनीय अहवाल वरिष्ठांकडे का पाठविला, यावरून संभाजी पाटील यांच्याशी वाद घातला. अहवाल राखीव पोलिस निरीक्षकांनी पाठविल्याचे समजल्यानंतर त्यांनी हजेरी कक्षात उपस्थित शिवीगाळ केली.
कर्मचाऱ्यांसमोर तसेच हजेरी प्रमुख, राखीव पोलिस निरीक्षक आणि अन्य एका कर्मचाऱ्याला चपलेने मारण्याची तसेच न्यायालयात खटला दाखल करून नोकरी करू देणार नसल्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.