Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जायकवाडीची जलपातळी घटल्याने संभाजीनगरच्या २७४० कोटींच्या नवीन पाणी योजनेला मोठा झटका; १२ जूनचा वाढीव पाणीपुरवठा रखडणार?

छत्रपती संभाजीनगरमधील २७४० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला जायकवाडी धरणातील घटत्या जलपातळीचा फटका बसला आहे. सायफन सिस्टीम फेल झाल्याने १२ जूनचा वाढीव पाणीपुरवठा रखडण्याची शक्यता आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 09, 2026 | 02:09 PM
जायकवाडीची जलपातळी घटल्याने संभाजीनगरच्या २७४० कोटींच्या नवीन पाणी योजनेला मोठा झटका

जायकवाडीची जलपातळी घटल्याने संभाजीनगरच्या २७४० कोटींच्या नवीन पाणी योजनेला मोठा झटका

Follow Us
Follow Us:
  • जायकवाडीची जलपातळी घटली
  • संभाजीनगरच्या २७४० कोटींच्या नवीन पाणी योजनेला मोठा झटका
  • १२ जूनचा वाढीव पाणीपुरवठा रखडणार?
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): मराठवाड्यात यंदा पावसाचे आगमन लांबल्याने आणि जायकवाडी धरणातील पाणीसाठा सातत्याने कमी होत असल्याने शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेपुढे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. धरणातून सायफन पद्धतीने पाणी उपसा करताना अडथळे येऊ लागल्याने नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे जाणारा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. परिणामी, १२ जूनपासून शहराला प्रस्तावित वाढीव ५० एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्याच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

केंद्र सरकारच्या अमृत-२ अभियानांतर्गत सुमारे २ हजार ७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना उभारण्यात येत आहे. या योजनेतील मुख्य जलवाहिनी आणि पाणीउपसा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असली तरी धरणातील घटत्या जलपातळीमुळे पाणी उचलण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. सध्या परिस्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सायफन पाइपची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

नवीन योजनेसाठी जायकवाडी धरणातील जॅकवेलमध्ये सायफन प्रणालीद्वारे पाणी आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणातील जलपातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने या व्यवस्थेची कार्यक्षमता कमी होत आहे. जलपातळी खाली गेल्यामुळे पाइपलाइनमध्ये हवेचे बुडबुडे तयार होत असून पंपांना आवश्यक दाब मिळत नाही. परिणामी पाणीउपसा खंडित होत असून जॅकवेलमार्गे नक्षत्रवाडीपर्यंत पाणी पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

सायफन पाइप वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

सायफन पाइपची लांबी वाढविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जॅकवेलमध्ये पुन्हा सुरळीत पाणी आणण्याचा प्रयत केला जाणार आहे. ही उपाययोजना तात्पुरती असल तरी वाढीव पाणीपुरवठ्याचे नियोजन वेळेत सुख्ख ठेवण्यासाठी ती आवश्यक मानली जात आहे.

Jalna Jalgaon Railway: जालना-जळगाव अजिंठा रेल्वे मार्गासाठी भूसंपादन वेगवान; प्रशासनाकडे २५० अर्ज दाखल

फ्लोटिंग पंप हा पर्याय?

जायकवाडीतील जलपातळी सातत्याने कमी होत असल्याने सायफन प्रणालीवर अवलंबून राहणणे दीर्घकालीन दृष्टिकोनातून व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धरणात फ्लोटिंग पंप् बसविण्याच्या विचार सुरू आहे. त्यामुळे जॅकवेलल सातत्याने पाणीपुरवठा करता येऊ शकतो.

दोन दिवसांपासून झाला पाणीपुरवठा विस्कळीत

नवीन योजनेद्वारे सध्या दररोज २० ते २५ एमएलडी पाणी उचलले जात आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पाणीउपशातील तांत्रिक अडचणी वाढल्याने नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारा पुरवठा प्रभावित झाला आहे. शहरासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असताना निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.

२७४० कोटींच्या योजनेचे ८५ टक्के काम झाले पूर्ण

अमृत-२ योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरसाठी नवीन पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माहितीनुसार योजनेची सुमारे ८५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मुख्य जलवाहिन्या आणि पाणी वाहतुकीची यंत्रणा उभारण्यात आली असली तरी अनेक भागातील वितरण नेटवर्क आणि जलकुंभांची कामे अद्याप सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात शहरासाठी २०० एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यात १५ जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमीच शेतकऱ्यांनो, खरिप पेरणीची घाई करू नका

Web Title: Chhatrapati sambhajinagar new water supply project hit by low water levels in jayakwadi dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Marathwada
  • Water Crisis
  • water scheme

संबंधित बातम्या

निदा खान प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील! त्यांना तात्काळ अटक करा; पालकमंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक आरोप
1

निदा खान प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील! त्यांना तात्काळ अटक करा; पालकमंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक आरोप

छ. संभाजीनगरमध्ये मान्सून लांबला; सरासरीच्या केवळ ३६ टक्के पाऊस, शेतकरी चिंतेत; कृषी विभागाचा पेरणीबाबत महत्त्वाचा सल्ला
2

छ. संभाजीनगरमध्ये मान्सून लांबला; सरासरीच्या केवळ ३६ टक्के पाऊस, शेतकरी चिंतेत; कृषी विभागाचा पेरणीबाबत महत्त्वाचा सल्ला

Jalna Jalgaon Railway: जालना-जळगाव अजिंठा रेल्वे मार्गासाठी भूसंपादन वेगवान; प्रशासनाकडे २५० अर्ज दाखल
3

Jalna Jalgaon Railway: जालना-जळगाव अजिंठा रेल्वे मार्गासाठी भूसंपादन वेगवान; प्रशासनाकडे २५० अर्ज दाखल

Farmers News: दुष्काळाच्या छायेत मराठवाडा; मराठवाड्यातील ४३ लाख एकर शेती संकटात; अनियमित मान्सूनमुळे कृषी अर्थव्यवस्थेला फटका
4

Farmers News: दुष्काळाच्या छायेत मराठवाडा; मराठवाड्यातील ४३ लाख एकर शेती संकटात; अनियमित मान्सूनमुळे कृषी अर्थव्यवस्थेला फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.