Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! नव्या योजनेतून जॅकवेलचे पंपिंग सुरू; १२ जूनपर्यंत शहराला मिळणार अतिरिक्त पाणी

Chhatrapati Sambhajinagar Water Supply Scheme छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून १२ जूनपासून शहराला २०० एमएलडी पाणी मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 12, 2026 | 02:50 PM
छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! नव्या योजनेतून जॅकवेलचे पंपिंग सुरू

छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! नव्या योजनेतून जॅकवेलचे पंपिंग सुरू

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार!
  • नव्या योजनेतून जॅकवेलचे पंपिंग सुरू
  • १२ जूनपर्यंत शहराला मिळणार अतिरिक्त पाणी
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर शहराच्या दीर्घकालीन पाणीटंचाईवर उपाय म्हणून राबविण्यात येत असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांना वेग आला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १२ जूनपासून शहराला पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर कंपनीने जय्यत तयारी हाती घेतली आहे. जॅकवेलमधून सोमवारी सकाळपासून पंपिंग सुरू करण्यात आले असून मुख्य जलवाहिनीची स्वच्छता, तसेच स्कोअर आणि बटरफ्लाय व्हॉल्व्हची तपासणी पूर्ण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

नियोजित वेळापत्रकानुसार ९ मे रोजी पंपिंग सुरू होणे अपेक्षित होते; मात्र काही तांत्रिक दुरुस्तींमुळे हा टप्पा पुढे ढकलण्यात आला. अखेर सोमवारी सकाळी ९ वाजता पहिला पंप सुरू करण्यात आला. या पंपातून ताशी सुमारे ४५ लाख लिटर क्षमतेने पाणी उपसा सुरू झाला. दुपारनंतर दुसरा पंपही कार्यान्वित करण्यात आला असून त्यातूनही तितक्याच क्षमतेने पाणी वहन सुरू आहे. जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याने पाणी उपशात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर सायफन प्रणालीत बदल करण्यात आला आहे. सायफनचे पाईप सुमारे दोन मीटरने खाली सोडण्यात आले असून त्यामुळे पाण्याचा उपसा अधिक कार्यक्षमतेने होण्यास मदत होणार आहे.

मुख्य जलवाहिनीची स्वच्छता मोहीम

जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान सुमारे ३८ किमी लांबीची आणि २५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीची संपूर्ण स्वच्छता करण्यात येत असून टप्प्याटप्याने स्कोअर व्हॉल्व्ह आणि बटरफ्लाय व्हॉल्व्हद्वारे पाणी सोडून त्यांची कार्यक्षमता तपासली जात आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील अडथळे टाळण्यास मदत होणार आहे.

युद्धपातळीवर सध्या काम आहे सुरू

नवीन योजनेद्वारे १२ जूनपासून २०० एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार सर्व यंत्रणा सज्ज करण्यात येत असून, वेळेत पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासन आणि कंत्राटदार यांच्याकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. शहरवासीयांना यामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

पावसाळ्यात वीज गुल होणार नाही! महावितरणचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; ३० मे पर्यंत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश

उद्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी येणार

जलवाहिनीची स्वच्छता आणि सर्व तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात मंगळवारी दि.१२ मे रोजी पाणी घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यानंतर शुद्धीकरण यंत्रणेची चाचणी आणि स्थिरीकरणासाठी सुमारे सात दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे.

शुद्धीकरण प्रक्रियेची तयारी

जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आल्यानंतर ब्लिचिंग पावडर आणि अलम यांचे प्रमाण निश्चित करणे, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी, तसेच अंतर्गत यंत्रणांची चाचणी ही कामे सात दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत. सर्व निकष पूर्ण झाल्यानंतरच पुढील टप्पा सुरू केला जाईल.

एमबीआरमध्ये पाणी २२ मेपासून

एमबीआर (मास्टर बॅलन्सिंग रिझव्हॉयर) मध्ये पाणी सोडण्यापूर्वी सर्व तांत्रिक तपासण्या पूर्ण करून आवश्यक प्रमाणपत्र (पिसो) मिळवणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेनंतरच २२ मेपासून एमबीआरमध्ये पाणी घेण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली आहे.

“मातृत्व हा गुन्हा नाही!”; गरोदरपणाच्या कारणावरून नोकरी नाकारणे बेकायदेशीर; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल

Web Title: Chhatrapati sambhajinagar new water supply scheme pumping starts june deadline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water supply

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
4

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.