Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीनगर आर्थिक प्रगतीपथावर! जिल्हा उत्पन्नात 54 टक्क्यांची भरघोस वाढ; ‘महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2025-26’ जाहीर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एकूण जिल्हा उत्पन्न 2021-22 मधील 86,100 कोटींवरून 2024-25 मध्ये 1,33,105 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजेच 54.6 टक्के एकूण वाढ, तर वार्षिक सरासरी वाढदर सुमारे 15 ते 16 टक्क्यांपर्यत पोहचला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 24, 2026 | 09:44 PM
संभाजीनगर आर्थिक प्रगतीपथावर! जिल्हा उत्पन्नात 54 टक्क्यांची भरघोस वाढ; ‘महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2025-26’ जाहीर
Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगर आर्थिक प्रगतीपथावर!
  • जिल्हा उत्पन्नात 54 टक्क्यांची भरघोस वाढ
  • ‘महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2025-26’ जाहीर
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2025-26 जाहीर करण्यात आला असून, यात छत्रपती संभाजीनगर हे राज्यातील महत्त्वाचे आर्थिक विकासकेंद्र म्हणून वेगाने पुढे येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. औद्योगिकीकरण, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राचा विस्तार आणि मजबूत पायाभूत सुविधा यामुळे शहर व जिल्हा आर्थिकदृष्ट्या झपाट्याने प्रगती करत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

सर्वेक्षणानुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एकूण जिल्हा उत्पन्न 2021-22 मधील 86,100 कोटींवरून 2024-25 मध्ये 1,33,105 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजेच 54.6 टक्के एकूण वाढ, तर वार्षिक सरासरी वाढदर सुमारे 15 ते 16 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. शहराचे प्रतिव्यक्ती उत्पन्न 2.69 लाख तर जिल्ह्याचे 2.40 लाख इतके नोंदवले गेले आहे. संभाजीनगर विभागाचा विचार केल्यास विभागाचे एकूण उत्पादन 5 लाख कोटींच्या पुढे गेले असल्याचे या विकास सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.

10 हजारांहून अधिक एकरांवरील स्मार्ट औद्योगिक औद्योगिक प्रकल्प ‘ऑरिक’ अंतर्गत शेंद्रा, बिडकीन औद्योगिक वसाहतीत मागील तीन ते चार वर्षात 91 हजार 729 कोटींची गुंतवणूक आकर्षित झाली आहे. अनेक उद्योगांनी आपली पायाभरणी केली आहे. अनेकांचे उत्पादही सुरु झाले आहे. तर काहींचे बांधकामाला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम स्थानिक आर्थिक विकासावरही दिसून येत आहे.

Paithan News: पैठणमध्ये दुहेरी संकट! गॅस टंचाईमुळे ‘इंडक्शन’चा वापर वाढला; वीज यंत्रणेवर ताण आल्याने शहर अंधारात

उत्पादन आणि निर्यातीमुळे शहराच्या आर्थिक उलाढालीत वेगवान विकास होतो आहे. औद्योगिक क्षेत्रात जिल्ह्यात 9 हजार 429 युनिट्स कार्यरत असून ऑटो, अभियांत्रिकी, फार्मा व उत्पादन क्षेत्रात सुमारे 2.61 लाख रोजगार निर्माण झाले आहेत. एमएसएमई क्षेत्रात 8.02 लाख सूक्ष्म, 8 हजार 288 लघु आणि 2 हजार 064 मध्यम उद्योग कार्यरत आहेत. येणाऱ्या प्रकल्पांतुन 54 हजारांहून अधिक थेट रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. याद्वारे शहराचा वेगवान होत असल्याचे सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.

कनेक्टिव्हीटी वाढली मात्र आव्हान कायम कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने संभाजीनगरच्या विमानतळावरील प्रवासी संख्या 6.20 लाखांवरून 7 लाखांपर्यंत वाढली आहे. ही सुमारे 12.9 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. विमान हालचालींची संख्याही 6 हजार 748 पर्यंत पोहोचली आहे. समृद्धी महामार्गामुळे लॉजिस्टिक्स अधिक सक्षम झाले आहे. सामाजिक निर्देशांकांमध्येही सुधारणा दिसून येत असून शिक्षणातील गळती कमी होत आहे. पाणी व्यवस्थापन, शहरी वाहतूक आणि उत्पन्नातील तफावत ही आव्हाने कायम असल्याचेही सर्वेक्षणात नमूद केले आहे.

छत्रपती संभाजीनगर एक गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत आहे

छत्रपती संभाजीनगर हे ऑरिक, डीएमआयसी आणि मजबूत औद्योगिक पायावर आधारित राज्यातील पुढील मोठे उत्पादन व गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत आहे. योग्य धोरणात्मक नियोजन आणि पायाभूत सुविधा यामुळे शहराची प्रगती आणखी वेगाने होईल, असा विश्वास आहे.
– रितेश मिश्रा (अध्यक्ष सीएसएन फर्स्ट)

Khultabad: ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ‘धान्य महोत्सव’ प्रभावी मंच; पालकमंत्री संजय शिरसाट यांचे प्रतिपादन

Web Title: Chhatrapati sambhajinagar on the path of economic progress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Marathwada

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
4

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.