Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heat Wave: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४३ अंशांच्या पार; ‘डिहायड्रेशन’ आणि डोकेदुखीच्या रुग्णांत मोठी वाढ

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४३ अंशांवर गेला असून रुग्णालयांमध्ये डोकेदुखी आणि अशक्तपणाच्या रुग्णांची वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 29, 2026 | 03:44 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४३ अंशांच्या पार (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४३ अंशांच्या पार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४३ अंशांच्या पार
  • ‘डिहायड्रेशन’ आणि डोकेदुखीच्या रुग्णांत मोठी वाढ
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): वाढत्या उन्हामुळे डोकेदुखी, मळमळ, अशक्तपणा, थकवा अशी तक्रारी असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढीस लागली आहे. शहरातील शासकीय रुग्णालायनासह खासगी रुग्णालयांमध्येही सदरील रुग्ण येत आहेत. वाढत्या उन्हापासून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

एप्रिल महिन्यात कमाल तापमानाचा पारा चाळीशीच्या घरात फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी तर विक्रमी ४३ अंशाच्याही पुढे तापमानाची नोंद झाल्याने पुढील उन्हाळ्याचा अंदाज भयंकर अंदाज व्यक्त होतो आहे. मागील तीन वर्षात एप्रिल महिन्यात असलेल्या कमाल तापमानाच्या तुलनेत यावर्षी रविवारी सर्वाधिक ४३. ४ अंश सेल्शियसपर्यंत पोहोचले होते. सोमवारी ४३ अंशावर पारा होता. तर मंगळवारी ४२. ८ अंशावर किमान तापमान नोंदवले गेले आहे.

सूर्य आग ओकत असल्याचे चित्र शहरात तहान नाही तरीही पाणी प्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. अशावेळी शरीरातील पाणीपातळी झपाट्याने खाली जाते. त्यातच घराबाहेत उन्हात फिरत असाल तर पाण्याचे प्रमाण वेगाने कमी होते. यासाठी तहान लागली नाही तरीही ठराविक अंतराने पाणी पीत रहावे. शरीराची पाणीपातळी संतुलित ठेवावी. काकडी, टरबूजसारखी पाणीदार फळांचे सेवन अधिक करावे. आरोग्याची तक्रार जाणवल्यास त्वरित जवळील आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखवावे.

सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे. या उन्हाचा आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. अनेकांना डोकेदुखीचा त्रास जाणवत आहे. विशेष करून लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये अशक्तपणा, थकवा आणि अतिसारसारख्या आरोग्याचं तक्रारी दिसू लागल्या आहेत. परिणमयी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या गर्दी होऊ लागली आहे. शहरातील शासकीय रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये तसेच गल्ली बोलतील क्लिनिकमधेही रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्कादायक! ‘मी जीवन संपवत आहे’ मेसेज, नंतर दोन मित्रांची आत्महत्या

ओपीडीमध्ये दररोज चार ते पाच रुग्ण येत आहेत. मागील चार दिवसात यात वाढ झाली आहे. मात्र रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याइतके गंभीर रुग्ण नसल्याने काहीसा दिलासादायक चित्र आहे. तरीही वाढत्या उन्हापासून बचावासाठी स्वतः काळजी घेणे आवश्यक असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगितले जात आहे. मंगळवारी कमाल ४२. ८ तर किमान तापमान २८. ५ अंश सेल्शियसची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे.

तापमानाची आकडेवारी (अंश सेल्सिअसमध्ये)

दिनांक कमाल तापमान किमान तापमान
२६ एप्रिल ४३.४°C २७.६°C
२७ एप्रिल ४३.०°C २८.७°C
२८ एप्रिल ४२.८°C २८.५°C

ग्रामीण भागातही आरोग्य केंद्रात रुग्ण

शहरी भागात सिमेंटच्या इमारती आणि रस्त्यांमुळे उष्णता अधिक निर्माण होते. यामुळे शहरी भागातील रुग्णालये आणि क्लिनिक्स रुग्णांनी भरलेले असताना ग्रामीण भागातदेखील सारखीच परिस्थिती आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत चालवले जाणारे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामस्थ आरोग्याच्या तक्रारी घेऊन येत आहेत. जिल्हाभरात दररोज ३०० ते ४०० च्या आसपास रुग्ण उन्हाच्या तक्रारी घेऊन येत असल्याचा अंदाज आहे.

“शिंदे-फडणवीस यांच्यात कुरघोडी नाही, तर ‘बॉन्डिंग’ मजबूत”; निर्णयावरून रंगलेल्या वादावर उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

Web Title: Chhatrapati sambhajinagar temperature crosses 43 degrees health alert issued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • heat wave

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
4

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.