Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: पाणीपुरवठ्यात ‘गॅप’ कायमच! उन्हाळ्यात ६ ते १० दिवसांनी पाणी येण्याची भीती, नागरिकांत संताप

त्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठ्याचा गॅप कमी करण्याचे महापौरांचे आदेश प्रशासनाने धाब्यावर बसवले आहेत. ६ ते १० दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त. वाचा सविस्तर.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 10, 2026 | 07:25 PM
पाणीपुरवठ्यात 'गॅप' कायमच! उन्हाळ्यात ६ ते १० दिवसांनी पाणी येण्याची भीती (Photo Credit- AI)

पाणीपुरवठ्यात 'गॅप' कायमच! उन्हाळ्यात ६ ते १० दिवसांनी पाणी येण्याची भीती (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • पाणीपुरवठ्यात ‘गॅप’ कायमच!
  • उन्हाळ्यात ६ ते १० दिवसांनी पाणी येण्याची भीती
  • नागरिकांत संताप
छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आराखडा तयार होऊनही प्रत्यक्षात मात्र परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. पाणीपुरवठ्यातील गॅप कमी करण्याचे महापौरांचे आदेश असतानाही विभागाकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. महापौर समीर राजूरकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापन या दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याची घोषणा केली होती. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा अधिक नियमित करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले होते.

सध्या शहरातील बहुतांश भागांमध्ये सहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो, तर काही भागांत आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाणी वितरणाचे योग्य नियोजन करून गॅप कमी करण्याचे आदेश महापौरांनी बैठकीत दिले होते. यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत सविस्तर आराखडा सादर करण्यास सांगण्यात आले होते.

निर्धारित मुदतीनंतर काही दिवसांनी अधिकाऱ्यांनी आराखडा सादर केला. त्यामध्ये काही सुधारणा सुचवत महापौरांनी गॅप कमी करण्यासाठी तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही दिले. उन्हाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यावर त्यांनी भर दिला होता. तथापि, आराखडा सादर होऊनही प्रत्यक्षात पाणीपुरवठ्यात कोणताही लक्षणीय बदल दिसून आलेला नाही. शहरातील बहुतांश भागांमध्ये पूर्वीप्रमाणेच गॅप कायम आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मराठवाड्याचा डंका! गणोरीच्या जिल्हा परिषद शाळेत साकारणार राज्याची पहिली ‘AI प्रयोगशाळा’; ग्रामीण मुले गिरवणार तंत्रज्ञानाचे धडे

महापौरांच्या आदेशानंतरही परिस्थिती बदलत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. संबंधित विभागाने केवळ आराखडा सादर करून कर्तव्यपूर्ती केल्याचे दाखवले का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

उन्हाळ्यात टंचाई निर्माण होण्याची भीती

पाणीपुरवठ्यातील गॅप कमी न झाल्यास येत्या उन्हाळ्यात शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. वाढत्या तापमानामुळे पाण्याची मागणी वाढत असताना पुरवठा मात्र पूर्ववत राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून गॅप कमी करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सिंचन महामंडळाच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा! शेतकऱ्यांना प्रवेशद्वारावरच रोखले; पोलिसांच्या अरेरावीविरोधात ‘बुलंद छावा’ आक्रमक

Web Title: Chhatrapati sambhajinagar water supply gap issue mayor orders ignored

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
1

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर
3

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.