Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSMC Property Survey: मालमत्तांचे सर्वेक्षण आता खासगी एजन्सी करणार! मनपाचा हिरवा कंदील; पण ‘या’ नगरसेवकांचा तीव्र विरोध

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळानंतर मालमत्तांचे सर्वेक्षण आणि फेरमुल्यांकन करण्यासाठी खासगी एजन्सी नेमण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. सर्वेक्षण काळात कर वाढ होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 16, 2026 | 02:59 PM
मालमत्तांचे सर्वेक्षण आता खासगी एजन्सी करणार! मनपाचा हिरवा कंदील (Photo Credit- X)

मालमत्तांचे सर्वेक्षण आता खासगी एजन्सी करणार! मनपाचा हिरवा कंदील (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • मालमत्तांचे सर्वेक्षण आता खासगी एजन्सी करणार!
  • मनपाचा हिरवा कंदील
  • पण ‘या’ नगरसेवकांचा तीव्र विरोध
छत्रपती संभाजीनगर: सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड खडाजंगीनंतर संभाजीनगर शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण आणि फेरमुल्यांकन करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला अखेरीस महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रस्तावाचे समर्थन केले, मात्र काहींनी याला विरोधही केला. एजन्सी नियुक्तीसाठी पालिकेकडून आता निविदा प्रसिध्द करण्यात येणार आहे. सर्वेक्षण व फेरमुल्यांकनची प्रक्रिया सुरु असताना मालमत्ता करात वाढ होणार नाही अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवलेल्या या प्रस्तावाला वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अफसर खान व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक सचिन खैरे यांनी विरोध केला. सर्वेक्षणाचे व फेरमुल्यांकनाचे काम महापालिकेच्या माध्यमातूनच करण्यात यावे अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजपचे नगरसेवक रेणुकादास वैद्य म्हणाले, शहरात किती मालमत्ता आहेत, किती मालमत्तांचे सर्वेक्षण झाले आहे याची माहिती प्रशासनाकडे नाही. यापूर्वी ‘स्पेक’ या एजन्सीने मालमत्तांचे सर्वेक्षण केले, त्याबद्दल अनेक तक्रारी होत्या.

पालिकेने या एजन्सीवर दीड कोटी रुपये खर्च केले. त्यानंतर जीआयएस मॅपिंगसाठी २० कोटी रुपये खर्च करण्यात आले, यातून एक लाख ७२ हजार मालमत्ता शोधण्यात आल्या, ते २० कोटी रुपयेदेखील पाण्यात गेले. श्री मित्र अॅपसाठी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले पण पालिकेच्या उत्पन्नात म्हणावी तशी वाढ झाली नाही. त्यामुळे महापालिकेचीच यंत्रणा वापरुन मालमत्तांचे सर्वेक्षण आणि फेरमुल्यांकन करण्यात यावे. खासगी एजन्सी नियुक्त केली तर त्या एजन्सीवर कुणाचे नियंत्रण असेल ? निविदा प्रक्रिया कशी असेल? ही प्रक्रिया पारदर्शक करा अशी सूचना त्यांनी केली. विरोधी पक्षनेते समीर साजिद यांनी प्रस्तावाचे समर्थन करताना ज्या मालमत्तांना अद्याप कर आकारणी झालेली नाही त्या मालमत्तांना प्रथम कर आकारणी करा अशी सूचना केली. सर्व झोन कार्यालयाच्या क्षेत्रात एकाच वेळी काम सुरु करा.

मुख्यमंत्र्यांचा मजीप्रा अधिकाऱ्यांना थेट दम! छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेत दिरंगाई खपवून घेणार नाही; फडणवीसांचा कडक इशारा

संस्था टिकली तर शहर टिकेल

एक एक घराला कर आकारणी करण्याची ही संधी आहे असा उल्लेख त्यांनी केला महापौर समीर राजूरकर यांनी भूमिका मांडताना महापालिका संस्थेबद्दल मातृत्वाची भावना ठेवा असे आवाहन केले. कर आकारणी आणि फेरमुल्यांकनाच्या कामात कुचराई केली तर त्यांना सोडणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला. आयुक्त अमोल येडगे यांनी प्रस्तावामागची भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेचे त्रिंबक तुपे म्हणाले, स्पेक एजन्सीचा अनुभव वाईट आहे. मालमत्ता कर आकारणीची प्रलंबिल प्रकरणे निकाली काढण्याची मागणी त्यांनी केली.

प्रस्तावाचे समर्थन करताना ते म्हणाले, विकास कामांसाठी पैसा उभा करावा लागेल. शहराचे हित पाहून आपण प्रशासनासोबत उभे राहिले पाहिजे. संस्था टिकली तर शहर टिकेल. अनिता घोडेले म्हणाल्या, पूर्वीच्या एजन्सीचा अनुभव वाईट आहे. असे असले तरी नवीन एजन्सी नियुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहात ही चांगली बाब आहे. या एजन्सीवर नियंत्रण कुणाचे असेल याचा खुलासा झाला पाहिजे. नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी केली.

भाजपचे राजगौरव वानखेडे यांनी मालमत्ता कराची चालू मागणी किती आहे ? दुबार कर आकारणी झालेल्या मालमत्ता किती आहेत ? शासकीय मालमत्ता किती आहेत ? न्यायालयीन प्रकरणात किती प्रकरणे अडकली आहेत ? सर्वेक्षण करताना कर वाढ होणार का ? असे प्रश्न उपस्थित केले.

नगरसेवक बालाजी मुंडे, महेश माळवतकर, माधुरी अदवंत, अझहर पटेल, ओसामा अब्दुल कदीर, अशोक दामले, नवीनसिंग ओबेरॉय, शिल्पाराणी वाडकर, अर्चना निळकंठ, विश्वनाथ स्वामी, रामेश्वर भआदवे, मनोज गांगवे, रशीद मामू, गणेश लोखंडे आदींनी या प्रस्तावाच्या अनुषंगाने सूचना केल्या.

छ. संभाजीनगरमधील २.८५ लाख गुंठेवारी धारकांना मोठा दिलासा! ७/१२ रद्द करून मिळणार ‘पीआर कार्ड’; मनपा सभेत ठरावाला मंजुरी

Web Title: Csmc approves private agency for property survey and revaluation in chhatrapati sambhajinagar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Property Card
  • Property Tax

संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांचा मजीप्रा अधिकाऱ्यांना थेट दम! छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेत दिरंगाई खपवून घेणार नाही; फडणवीसांचा कडक इशारा
1

मुख्यमंत्र्यांचा मजीप्रा अधिकाऱ्यांना थेट दम! छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेत दिरंगाई खपवून घेणार नाही; फडणवीसांचा कडक इशारा

छ. संभाजीनगरमधील २.८५ लाख गुंठेवारी धारकांना मोठा दिलासा! ७/१२ रद्द करून मिळणार ‘पीआर कार्ड’; मनपा सभेत ठरावाला मंजुरी
2

छ. संभाजीनगरमधील २.८५ लाख गुंठेवारी धारकांना मोठा दिलासा! ७/१२ रद्द करून मिळणार ‘पीआर कार्ड’; मनपा सभेत ठरावाला मंजुरी

‘बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या, अन्यथा…’, गोर सेनेचे प्रा. संदेश चव्हाण यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
3

‘बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या, अन्यथा…’, गोर सेनेचे प्रा. संदेश चव्हाण यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

Chhatrapati Sambhajinagar: पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात! वाढीव पाणीपुरवठा रखडला; बुधवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक
4

Chhatrapati Sambhajinagar: पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात! वाढीव पाणीपुरवठा रखडला; बुधवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.