Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती; परीक्षा केंद्राबाहेर संताप, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षेवेळी महिला उमेदवारांना मंगळसूत्र आणि दागिने काढण्याची सक्ती केल्याने मोठा वाद झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 09, 2026 | 06:55 PM
'या' परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती; परीक्षा केंद्राबाहेर संताप (Photo Credit- X)

'या' परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती; परीक्षा केंद्राबाहेर संताप (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • ‘या’ परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती
  • परीक्षा केंद्राबाहेर संताप
  • मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
CTET Exam 2026: सीटीईटीदरम्यान परीक्षा केंद्रात कोणताही धातू नेण्याची मनाई आहे, परंतु, छत्रपती संभाजीनगरमध्ये या परीक्षेदरम्यान महिला चांगल्याच संतप्त झाल्याचे दिसून आल्या. परीक्षा केंद्रावर जाताना महिलांना मंगळसुत्र आणि नाकातील दागिने काढण्याची सक्ती केली, त्यामुळे ऐनवेळी महिलांची पंचायत झाली. अनेक केंद्रांवर दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने महिलांची मोठी गैरसोय झाली.

महिला परीक्षार्थ्यांमध्ये तीव्र संताप

काही महिलांना आपले दागिने सोबत आलेल्या नातेवाईकांकडे सोपवावे लागले, तर ज्यांच्यासोबत कोणीही नव्हते त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला, कडक तपासणीच्या नावाखाली महिलांच्या भावनांचा विचार न केल्याने प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या सक्तीमुळे परीक्षा केंद्राबाहेर तणावाचे आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे महिला परीक्षार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून सुरक्षिततेच्या नावाखाली होणारी ही अडवणूक चुकीची असल्याची भावना व्यक्त होत आहे.

मेटलचे साहित्य घेऊन जाण्यास केली मनाई

राज्यभरात रविवारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटीईटीची परीक्षा पार पडली. या परीक्षेला जाताना परीक्षार्थीना वेगळीच परीक्षा द्यावी लागली. परीक्षा केंद्रात आत जाताना महिलांना चक्क मंगळसूत्र काढून जावे लागले आहे. रविवारी सकाळी ९:३० ते १२ यावेळेत परीक्षा झाली. तत्पूर्वी सकाळी सात वाजता रिपोर्टिंग टाईम असताना प्रत्येक परीक्षार्थीला परीक्षा केंद्रात जाताना कसून चौकशी केली जात होती. यात कुठलेही मेटलच साहित्य सोबत घेऊन जाऊ नका, असे गेटवरच सांगण्यात आले.

ZP Election 2026: निवडणूक ड्युटीला दांडी मारणाऱ्या ११९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल; प्रशासनाचा कडक इशाारा

महिलांची मोठी अडचण

मंगळसूत्र, काना नाकातले दागिने काढण्याच्या सूचना केल्या. त्याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे मंगळसूत्रासह अंगावरची सगळी दागिने काढावे लागले. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. त्यामुळे अनेक महिलांची परीक्षा केंद्रा जाताना अडचण झाली. काहींच्या सोबत नातेवाईक होते त्यांनी नातेवाईकांना सोने दिले. मंगळसूत्र दिले, पण काहींची मोठी अडचण झाली. यासंदर्भात मागच्या 66 काळातही तक्रारी आल्या होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, यासंदर्भात मी माहिती घेईन. मागच्या वेळी असा विषय झाला होता तेव्हा परीक्षेचे आयोजन करणाऱ्यांनी सांगितले होते की असे अनुभव आले की वेगवगेळ्या गोष्टीमध्ये साहित्य लपवले जाते. त्यातून चिटींग केली जाते. तथापि अशा पद्धतीने मंगळसूत्र काढून घेणे योग्य नाही. परंतु याची आधी काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल.

परीक्षा हिंदुस्थानात, पाकिस्तानात नाही!

शिक्षक पात्रता परिक्षेसाठी गेलेल्या महिला उमेदवारांच्या गळ्यातील मंगळसूत्रासहित सर्व दागिने काढून ठेवण्यास सांगण्यात आले, यावरून अंबादास दानवे म्हणाले, विचित्र विरोधाभास ! ‘हिंदुत्व’ आणि ‘संस्कृती’च्या गप्पा मारणा-यांच्या राज्यात महिलाना मंगळसूत्र काढून परीक्षेला बसावं लागतंय. ११ वर्षाच्या सतेनंतरही प्रशासनाला ‘मंगळसूत्र’ आणि ‘कॉपी’ मधला फरक कळत नाही बहुदा. ही आपली संस्कृती की सरकारी दडपशाही? ही परीक्षा हिंदुस्थानात सुरु आहे, पाकिस्तानात नाही. असा संताप अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

Crime News: मानवतेला काळिमा! कचरा टाकण्याच्या वादातून गर्भवतीच्या पोटात लाथ; महिलेचा गर्भपात, परिसरात संताप

Web Title: Ctet exam women forced to remove mangalsutra chhatrapati sambhajinagar controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • CTET Paper 2
  • Exam
  • Womens

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
4

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.