Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar Water Supply: विभागीय आयुक्तांकडून पाणीपुरवठा योजनेचा आढावा; संभाजीनगरचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळा संपत आला तरी पाण्यासाठी १२ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत १२ जूनपर्यंत वाढीव पाणी देण्याचे आदेश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 03, 2026 | 02:52 PM
Sambhajinagar Water Supply: विभागीय आयुक्तांकडून पाणीपुरवठा योजनेचा आढावा; संभाजीनगरचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार
Follow Us
Follow Us:

 

  • विभागीय आयुक्तांकडून पाणीपुरवठा योजनेचा आढावा
  • संभाजीनगरचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): धरण उशाला अन् कोरड घशाला… या म्हणीप्रमाणे उन्हाळा संपत आला तरी जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. असे असले तरी शहरवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी दहा ते बारा दिवसांची वाट बघावी लागत आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी मंगळवारी नक्षत्रवाडी येथील ३९२ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करुन उर्वरित कामे जलदगतीने करण्याचे आदेश संबंधितांना दिले. यामुळे १२ जून रोजी संभाजीनगरकरांना वाढीव पाणी मिळून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अतिरिक्त आयुक्त कल्पना पिंपळे, जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, अपर आयुक्त (विकास व नियोजन) सुषमा देसाई, सहआयुक्त देविदास टेकाळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मनपात समाविष्ट होऊन १० वर्षे झाली, तरी सातारा-देवळाई तहानलेलाच! नागरिकांची ६०० रुपयांना टँकर घेण्याची वेळ

उच्च न्यायालयाने शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १२ जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा करण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सबंधित कंपनीला दिले आहेत. त्यानुसार नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्धीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पाणी प्रक्रिया केंद्र, एरिएशन, क्लोरिनेशन व फिल्ट्रेशन प्रकल्पांची पाहणी यावेळी करण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामे संबंधित कंत्राटदार, प्राधिकरण आणि मनपा यांनी समन्वयाने पूर्ण करावीत, असे सांगितले.

शहराचा पाणीपुरवठा होणार आहे सुरळीत

नऊशेच्या पाइपलाइनमधून मिळणारे पाणी ४५ एमएलडी इतका झाला आहे. तसेच बाराशेच्या योजनेतूनही ११५ ते १२० एमएलडी इतके मिळत आहे. त्यामुळे शहराला १६० एमएलडी इतका पाणी पुरवठा केला जात असून पाण्याचा दाब वाढल्यामुळे अनेक भागाचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र जयविश्वभारती कॉलनी, मरिमाता, एन-८, रामनगर, मुकुंदवाडी, भिमनगर-भावसिंगपूरा, पडेगाव, जुन्या शहरातील काही भागाला नवव्या ते दहाव्या दिवशी पाणी मिळत असल्याची ओरड होत आहे.

Sillod Water Scarcity Tanker: सिल्लोड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; २१ गावांना टँकरचे चटके, केळगाव प्रकल्पाने गाठला तळ

Web Title: Divisional commissioner reviews sambhajinagar water supply scheme 10 days wait

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water supply

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
1

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Latur News: पाणीटंचाईवर प्रशासन सतर्क! पाझर तलाव, बंधाऱ्यांच्या नियमित पाहणीसाठी विशेष पथकांची नियुक्ती
3

Latur News: पाणीटंचाईवर प्रशासन सतर्क! पाझर तलाव, बंधाऱ्यांच्या नियमित पाहणीसाठी विशेष पथकांची नियुक्ती

पाणीपुरवठा योजना बंद केल्याने ठेकेदार त्रस्त! कोट्यवधींचा निधी प्राप्त; शासनाकडून निधी असूनही देयके नाहीत
4

पाणीपुरवठा योजना बंद केल्याने ठेकेदार त्रस्त! कोट्यवधींचा निधी प्राप्त; शासनाकडून निधी असूनही देयके नाहीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.