Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनपात समाविष्ट होऊन १० वर्षे झाली, तरी सातारा-देवळाई तहानलेलाच! नागरिकांची ६०० रुपयांना टँकर घेण्याची वेळ

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत समाविष्ट होऊन १० वर्षे झाली तरी सातारा-देवळाई परिसरातील पाणी समस्या सुटलेली नाही. तीव्र उन्हाळ्यामुळे नागरिकांना ६०० रुपयांना खाजगी टँकर घ्यावा लागत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 01, 2026 | 02:18 PM
मनपात समाविष्ट होऊन १० वर्षे झाली, तरी सातारा-देवळाई तहानलेलाच!

मनपात समाविष्ट होऊन १० वर्षे झाली, तरी सातारा-देवळाई तहानलेलाच!

Follow Us
Follow Us:

 

  • सातारा, देवळाईची तहान टँकरवरच
  • २ हजार लिटर पाण्यासाठी ६०० रुपये मोजण्याची वेळ
  • विहिरी, बोअरवेल कोरडे
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर महापालिकेत समावेश होऊन दहा वर्षे उलटली, तरी सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने परिसरातील विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. परिणामी हजारो कुटुंबांची तहान खासगी टैंकरवर अवलंबून झाली असून दोन हजार लिटर पाण्यासाठी ६०० रुपये मोजावे लागत आहेत.

महापालिकेच्या हद्दीत समावेश झाल्यानंतर मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पाणी, ड्रेनेज, रस्ते आणि वीजपुरवठ्याच्या समस्या अद्याप कायम आहेत. सुमारे सव्वा लाख लोकसंख्या आणि २९ हजार मालमत्ता असलेल्या या परिसरात उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाई तीव्र झाली आहे. अनेक भागांतील विहिरी आणि विंधनविहिरींनी एप्रिलमध्येच तळ गाठल्याने नागरिकांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

नव्या योजनेचा लाभ अद्यापही नाही

खासगी टँकरच्या दरातही वाढ झाली आहे. दोन हजार लिटरचा टँकर ६०० रुपयांना मिळत असला, तरी पाच हजार लिटर पाण्यासाठी १,५०० रुपये आणि सात हजार लिटर पाण्यासाठी २ हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. पाणी भरण्यासाठी दूरवर जावे लागत असल्याने टँकरचालकांचा खर्च वाढल्याचे सांगितले जाते. दरम्यान, महापालिकेने नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाइपलाइन टाकली असली, तरी अनेक ठिकाणी वितरण व्यवस्थेची कामे अपूर्ण आहेत. काही ठिकाणी पाइपलाइन फुटल्याच्या तसेच अंतर्गत जोडण्या न झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे नव्या योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला, तरी तो अपुरा असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. वाढत्या मागणीमुळे टँकरसाठी प्रतीक्षा करावी लागत असून नियमित सेवा देण्याची मागणी होत आहे.

छत्रपती संभाजीनगरकरांना दिलासा! १२ जूनपासून नव्या १५०० मिमी जलवाहिनीतून पाणीपुरवठा; ‘या’ तारखेला होणार चाचणी

दहा वर्षांनंतरही प्रश्न ‘जैसे थे’

सातारा-देवळाई परिसराचा २०१६ मध्ये महापालिकेत समावेश झाला. या काळात मालमत्ता कर आणि गुंठेवारीतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला. मात्र पाणी, ड्रेनेज, रस्ते आणि वीजपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधांचे प्रश्न अद्याप कायम आहेत. विविध कामांसाठी खोदलेले अनेक रस्ते दुरुस्तीअभावी खराब अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

मनपा टकरसाठी वाढली गर्दी

महापालिकेकडून नक्षत्रवाडी येथून टँकर भरून सातारा-देवळाई भागात पाठवले जातात. साधारणपणे एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. वाढती मागणी लक्षात घेता दररोज ८० ते ९० फेऱ्या माराव्या लागत आहेत. दहा ते पंधरा टैंकर कार्यरत असले, तरी मागणीच्या तुलनेत ती संख्या अपुरी ठरत असल्याने अधिक टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पाईपलाईन टाकली, पण पाणी कधी ?

महापालिकेच्या नवीन योजनेअंतर्गत पाइपलाइनचे मुख्य काम अनेक भागांत पूर्ण झाले आहे. मात्र वितरण वाहिन्यांना अंतर्गत जोडण्या देण्याचे काम अद्याप बाकी आहे. काही ठिकाणी खोदलेले खड्डे तसेच राहिल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे योजनेचा प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Sillod Water Scarcity Tanker: सिल्लोड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; २१ गावांना टँकरचे चटके, केळगाव प्रकल्पाने गाठला तळ

Web Title: Even after 10 years of being incorporated into the municipal corporation satara deolai remains parched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Crime News: छ. संभाजीनगर हादरलं! पोलीस ठाण्याशेजारील मैदानावर १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या; जुन्या वादातून रक्तरंजित थरार
1

Crime News: छ. संभाजीनगर हादरलं! पोलीस ठाण्याशेजारील मैदानावर १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या; जुन्या वादातून रक्तरंजित थरार

छत्रपती संभाजीनगरकरांना दिलासा! १२ जूनपासून नव्या १५०० मिमी जलवाहिनीतून पाणीपुरवठा; ‘या’ तारखेला होणार चाचणी
2

छत्रपती संभाजीनगरकरांना दिलासा! १२ जूनपासून नव्या १५०० मिमी जलवाहिनीतून पाणीपुरवठा; ‘या’ तारखेला होणार चाचणी

Sillod Water Scarcity Tanker: सिल्लोड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; २१ गावांना टँकरचे चटके, केळगाव प्रकल्पाने गाठला तळ
3

Sillod Water Scarcity Tanker: सिल्लोड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; २१ गावांना टँकरचे चटके, केळगाव प्रकल्पाने गाठला तळ

Chhatrapati Sambhajinagar: तू माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?; संशयातून 17 वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या
4

Chhatrapati Sambhajinagar: तू माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?; संशयातून 17 वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.