Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘फार्मर आयडी’ मिळत नसल्याने शेतकरी संतप्त! तलाठी, तहसील कार्यालयात उडवाउडवीची उत्तरे, दलालांकडून आर्थिक पिळवणूक

अर्जांची पडताळणी झाली असली तरी, 'फार्मर आयडी नंबर' मंजूर होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. तालुका आणि महसूल कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, महसूल प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 28, 2025 | 05:58 PM
'फार्मर आयडी' मिळत नसल्याने शेतकरी संतप्त! (Photo Credit - AI)

'फार्मर आयडी' मिळत नसल्याने शेतकरी संतप्त! (Photo Credit - AI)

Follow Us
Follow Us:
  • ‘फार्मर आयडी’ मिळत नसल्याने शेतकरी संतप्त!
  • तलाठी, तहसील कार्यालयात उडवाउडवीची उत्तरे
  • दलालांकडून आर्थिक पिळवणूक
गंगाखेड (परभणी): केंद्र शासनाची ‘अॅग्रिस्टॅक’ (AgriStack) योजना शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करून त्यांना सरकारी योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावर (CSC Center) जाऊन रजिस्ट्रेशन केले. अर्जांची पडताळणी झाली असली तरी, ‘फार्मर आयडी नंबर’ मंजूर होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. तालुका आणि महसूल कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, महसूल प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. विशेष म्हणजे, तहसील कार्यालय परिसरात दलाल फार्मर आयडी नंबर मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचे चित्र दिसत आहे.

योजनेचा उद्देश चांगला, पण अंमलबजावणी ढिसाळ

ज्या शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रात रजिस्ट्रेशन केले, पण त्यांना अद्याप फार्मर आयडी नंबर मंजूर झालेला नाही, त्यांना दुष्काळाचे किंवा इतर अनुदानांपासून वंचित राहावे लागत आहे. शेतकरी तलाठी आणि तहसील कार्यालयात चौकशीसाठी जातात, तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही, उलट आरेरावीची भाषा वापरून अपमानित केले जात असल्याचे शेतकरी सांगतात. ‘अॅग्रिस्टॅक’ योजनेमुळे शेतकऱ्यांचा डिजिटल डेटाबेस तयार होऊन त्यांना पीक विमा, कर्ज आणि अनुदान थेट बँक खात्यात मिळण्यास मदत होणार आहे. योजना चांगली असली तरी अंमलबजावणीत सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Agricultural Damage: अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात! कांदा, द्राक्ष, सोयाबीनचे मोठे नुकसान

पीक विमा आणि अनुदानापासून वंचित

फार्मर आयडी नंबर मिळाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यापासून वंचित राहावे लागले. त्याचबरोबर ओल्या दुष्काळाचे अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. या संतापाचा उद्रेक झाल्यास यास तहसीलदार, तलाठी आणि मंडळ अधिकारी जबाबदार असतील, अशी प्रतिक्रिया चर्चिली जात आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

तलाठी आणि महसूल विभागात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे समोर आले आहे. पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान तलाठी आणि महसूल प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या पगारातून भरून मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दलालांमार्फत पैसे घेऊन कामे करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) संपत्तीची चौकशी करून अपसंपदेचा गुन्हा दाखल करावा, जेणेकरून भ्रष्ट अधिकाऱ्यांचा माज उतरेल, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाचा मोठा फटका; छत्रपती संभाजीनगरसह विभागात 10 मंडळात अतिवृष्टी

Web Title: Farmers angry over not getting farmer id talathi tehsil offices give mixed answers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 05:58 PM

Topics:  

  • Central Governement
  • chhatrpati sambhaji nagar
  • farmer

संबंधित बातम्या

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…
1

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील
2

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.