फोटो सौजन्य सोशल मिडिया
Ganpati Bappa : हिंदू धर्मात गणपती बाप्पाला बुद्धी, ज्ञान आणि विघ्नहर्ता म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे बाप्पाच्या कानात मनातील गोष्ट सांगण्यामागे आपल्या इच्छा आणि भावना देवापर्यंत पोहोचवण्याची भक्तांची श्रद्धा आहे. विसर्जनापूर्वी बाप्पाच्या कानात हळूच इच्छा सांगून, “बाप्पा, माझी मनोकामना पूर्ण करावी आणि माझ्या आयुष्यातील अडचणी दूर कराव्यात,” अशी प्रार्थना केली जाते. लोकपरंपरेनुसार गणपतीच्या कोणत्या कानात इच्छा सांगणे शुभ मानले जाते. तर धार्मिक मान्यता आणि लोकपरंपरेनुसार बाप्पाची उजवी बाजू अनेक धार्मिक परंपरांमध्ये मंगल आणि शुभतेशी जोडली जाते. त्यामुळे बाप्पाच्या उजव्या कानात मनोकामना सांगण्याची पद्धत रूढ झाल्याचे मानले जाते.
भक्त आपल्या मनातील इच्छा बाप्पाला अगदी मनापासून सांगतात. काही जण एखाद्या कामात यश मिळावे, नोकरी मिळावी, व्यवसायात प्रगती व्हावी, घरात सुख-शांती राहावी किंवा एखादी अडचण दूर व्हावी अशी प्रार्थना करतात.
गणपती बाप्पाच्या पूजेनंतर घरात फुलांच्या माळा, हार आणि सजावटीसाठी वापरलेली अनेक फुले उरतात गुलाब, झेंडू, जास्वंद यांसारख्या फुलांचा वापर खत, घरासाठी सुगधी पोटपीनरी, नैसर्गिक रंग आणि सजावटीच्या वस्तू तयार करण्यासाठी करता येती. पूजेनंतर उरलेल्या फुलांचा वापर करण्याचे काही खेपे पर्याय आज आपण जाणून घेऊया.
पूजेनंतर उरलेल्या फुलांचा सर्वांत सोपा वापर म्हणजे त्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, यासाठी आधी फुलांमधून धागे, तार, प्लास्टिक किवा इतर न कुजणाऱ्या वस्तू वेगळ्या करून घ्या. त्यानंतर फुलांचे छोटे तुकडे करून ते कंपोस्ट किंवा सेंद्रिय कचऱ्यामध्ये मिसळा, काही काळानंतर या फुलांचे विघटन होऊन त्यापासून चांगले सेंद्रिय खत तयार होऊ शकते.
१) सुगंधी पोटपौरी बनवा ताजी फुलं लगेच
फेकण्याऐवजी ती व्यवस्थित वाळवून त्यापासून पोटपौरी तयार करता येते. फुलांच्या पाकळ्या स्वा ट्रेमध्ये पसरवून चांगल्या प्रकारे वाळवून घ्या. त्यानंतर त्या एका सुंदर वाटीत किंवा काचेच्या भांड्यात ठेवता येतात.
२ ) वाळलेल्या फुलांपासून धूपबत्ती पूजेनंतर वाळलेली
किंवा सुकलेली फुलंही उपयोगी पडतात, या फुलांचा वापर करून घरच्या घरी धूपासारख्या सुगंधी वस्तू तयार करता येतात. मात्र, अशा वस्तू तयार करताना वापरल्या जाणाऱ्या सामारीबाबत योग्य माहिती आणि सुरक्षिततेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
फुलांपासून सुंदर फ्लोरल आर्ट फुलांच्या पाकळ्यांचा वापर सुंदर क्राफ्ट तयार करण्यासाठीही करता येतो. यासाठी पाकळ्या पुस्तकाच्या पानांमध्ये ठेवून काही दिवस दाबून ठेवा.
Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप






