Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरकरांना आनंदाची बातमी! नवीन वर्षात मिळणार २४ तास पाणी; योजनेतील मोठा अडथळा दूर

छत्रपती संभाजीनगरच्या २४ तास पाणी प्रकल्पाला हिरवा कंदील! प्रशासक जी. श्रीकांत यांनी एमयूआयडीसीएल करारावर स्वाक्षरी केली, ८२२ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले आणि २,७४० कोटी रुपयांच्या योजनेतील अंतिम अडथळा दूर केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 07, 2025 | 02:59 PM
छत्रपती संभाजीनगरकरांना आनंदाची बातमी! नवीन वर्षात मिळणार २४ तास पाणी (Photo Credit - X)

छत्रपती संभाजीनगरकरांना आनंदाची बातमी! नवीन वर्षात मिळणार २४ तास पाणी (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:
  • छत्रपती संभाजीनगरकरांना आनंदाची बातमी!
  • आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांचा पुढाकार
  • पाणीपुरवठा योजनेतील मोठा अडथळा मुंबईतील करारानंतर दूर
छत्रपती संभाजीनगर: पुणे महापालिकेच्या पावलावर पाऊल टाकत महापालिकेने ‘स्मार्ट’पणे संभाजीनगरकरांना चोवीस तास नळांना पाणी देण्याची योजना आखली. या योजनेला राज्य व केंद्र शासनाने देखील पाठबळ देत निधी पुरवला आहे. योजना पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांची शर्यत आयुक्त जी. श्रीकांत यांनी पार केली आहे. प्रतीक्षेत असलेल्या २७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतील मोठा अडथळा मुंबईतील करारानंतर दूर झाला आहे. महानगरपालिकेचा ८२२ कोटी रुपयांचा हिस्सा म्हणून घेण्यात येणाऱ्या कर्जावर गुरुवारी मुंबईत महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी (MUIDCL) शी करारावर स्वाक्षरी करून नवीन वर्षात चोवीस तास नळाद्वारे पाणी देण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

‘धरण उशाला अन् कोरड घशाला’… ही म्हण संभाजीनगरकरांसाठी तंतोतंत लागू होते. कारण मराठवाड्याची तहान भागवण्याची क्षमता ठेवणाऱ्या जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असताना केवळ जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांमुळे नळाद्वारे पाणी देता येत नव्हते. शहरवासियांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी पुढील ४० वर्षांच्या लोकसंख्येचा विचार लक्षात घेता नवीन जलवाहिनी आणि टाक्या बांधण्याचे नियोजन केले. राजकीय श्रेयवादावरून मंजूर झालेली जलवाहिनीची योजना आता साडेतीन हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे.

योजनेतील निधीचा वाटा:

  • २५% केंद्र सरकारचा
  • ४५% राज्य शासनाचा
  • ३०% महापालिकेचा (८२२ कोटी रुपयांचा)

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar: शहरात ई-बसची प्रतीक्षा वाढली! ओलेक्ट्रा कंपनीशी संपर्क तुटल्याने ३५ एसी बस प्रकल्पाला मोठा विलंब

मोठा अडथळा झाला दूर

“२७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुदतीत पूर्ण करणे गरजेचे आहे. कर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने मोठा अडथळा दूर झाला आहे. पुढील काळात कर्जफेडीसाठी महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारावी लागेल आणि त्यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात येतील.” – जी. श्रीकांत, प्रशासक, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांनी म्हटले आहे.

आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांचा पुढाकार

एक-एक करत येणाऱ्या अडचणींवर प्रशासक जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेत मार्ग काढले. मागील सहा महिन्यांपासून ८२२ कोटी रुपयांच्या हिश्श्याच्या विषयावरून जलवाहिनीचे काम अंतिम होत नव्हते. अखेर प्रशासकांनी गुरुवारी ‘MUIDCL’ शी मुंबईत करार करून सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला. या करारामुळे काम लवकर पूर्ण होऊन शहरवासीयांना नवीन वर्षापर्यंत चोवीस तास पाणी मिळण्याचा विषय निकाली निघाला आहे.

सरकारच्या अमृत-२ योजनेअंतर्गत शहरासाठी २७४० कोटी रुपयांचा पाणीपुरवठा प्रकल्प राबविला जात आहे. या कामाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतली असून, हैदराबाद येथील जीवीपीआर (GVPR) कंपनी या कामासाठी कंत्राटदार म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.

या प्रकल्पात केंद्र सरकारचा २५ टक्के, राज्य शासनाचा ४५ टक्के तर महापालिकेचा ३० टक्के निधी आहे. केंद्र आणि राज्य शासनाने आपला वाटा दिला असून, महापालिकेच्या ८२२ कोटी रुपयांच्या हिश्शासाठी कर्ज देण्याची प्रक्रिया मागील आठ ते नऊ महिन्यांपासून सुरू होती.

हे देखील वाचा: २५ वर्षे मोफत वीज! दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी महावितरणची ‘SMART’ योजना; काय आहे ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र’ स्कीम?

Web Title: Good news for chhatrapati sambhajinagar residents 24 hour water will be available in the new year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water supply

संबंधित बातम्या

संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! १५ दिवसांत नव्या दोन्ही जलवाहिन्या होणार सुरू; पाणीटंचाईतून मिळणार कायमचा दिलासा
1

संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! १५ दिवसांत नव्या दोन्ही जलवाहिन्या होणार सुरू; पाणीटंचाईतून मिळणार कायमचा दिलासा

Chhatrapati Sambhajinagar: मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक? वेगवेगळ्या अर्जांना एकच प्रश्नपत्रिका; उमेदवारांचा संतप्त सवाल!
2

Chhatrapati Sambhajinagar: मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक? वेगवेगळ्या अर्जांना एकच प्रश्नपत्रिका; उमेदवारांचा संतप्त सवाल!

‘माझं लेकरू परत आलं हो…’, छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!
3

‘माझं लेकरू परत आलं हो…’, छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर
4

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.