Chhatrapati Sambhajinagar Water Supply Scheme छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून १२ जूनपासून शहराला २०० एमएलडी पाणी मिळणार आहे.
गंगापूर तालुक्यातील बोलठाण गावात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले असून, ग्रामस्थ अक्षरशः पाण्यासाठी भटकंती करत आहेत. प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याने संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.
अलीकडील अपघातांनंतर टँकर चालकांवरच कारवाई होत असल्याची टीका व्यावसायिकांनी केली. प्रत्येक दुर्घटनेसाठी टँकर चालकांनाच जबाबदार धरले जात आहे, असे लोणकर म्हणाले.
नाशिक जिल्ह्यातील १८७ गाव आणि वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहेत.
अमरावतीची पाणीपुरवठा योजना आर्थिक तोट्यात जाऊन भविष्यात या क्षेत्राचे खाजगीकरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार सध्या ४२७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
नाशिक जिल्ह्यात अवकाळीच्या तडाख्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली असून २ गावे आणि २१ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामीण भागात जलस्रोत आटत चालल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
वडगाव शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील ३९ कोटींचा जलशुद्धीकरण पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी उलब्ध होणार आहे.
शहरात अनेक ठिकाणी ट्रान्सफार्मर उघडया स्थितीत आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असून ट्रान्सफार्मर सुरक्षित करण्यात यावेत, अशी सूचना संकेत नाईक यांनी केली.
दिवसभरात किमान पंधरा ते वीस हजार कूलजार विक्रीचा प्राथमिक अंदाज आहे. एका जारची किंमत ३० रूपये या आधारे शहरात कूलजारची वर्षाला उलाढाल चार ते पाच कोटी रुपये इतकी आहे.
प्रशासनाच्या सुरुवातीच्या प्रस्तावानुसार, नवीन योजनेअंतर्गत मीटर कनेक्शन असलेल्या घरांनाच पाणीपुरवठा केला जाईल. मीटर पुरवण्याची आणि बसवण्याची जबाबदारी निविदाद्वारे निवडलेल्या कंत्राटदार कंपनीकडे सोपवली जाईल.
वाढत्या शहराची गरज ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पात स्वतः लक्ष घातले होते. एमआयडीसी, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयासाठी त्यांनी बैठकाही घेतल्या.
रायगड जिल्ह्यातील कोरळवाडी आदिवासी वाडीत पाणीपुरवठा योजनेच्या विलंबामुळे स्थानिक नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत काही महत्त्वाची पावले घेतली आहेत.
मुबलक पाऊस पडूनही तालुक्याला एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाईच्या झळा बसतात. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीने टँकरमुक्त तालुका करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील पाणीपुरवठा यंत्रणा जायकवाडी येथील वीज बिघाडामुळे कोलमडली आहे. पाण्याचे वेळापत्रक २ दिवसांनी पुढे ढकलण्यात आले असून, स्थिती पूर्ववत होण्यासाठी १५ दिवस लागतील.
संगमनेरमध्ये नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी महायुतीच्यावतीने मागणी करण्यात आली. यावेळी मागणी पूर्ण न झाल्यास रास्ता रोको करू असा इशाराही मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आला.