Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरचा भव्य विस्तार! ३११ गावांच्या विकासासाठी स्वतंत्र ‘DPR’ तयार होणार; २२० कोटींचा निधी सज्ज

छत्रपती संभाजीनगर नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीतील ३११ गावांच्या पायाभूत विकासासाठी स्वतंत्र डीपीआर (DPR) तयार केला जाणार आहे. राज्य सरकारच्या २२० कोटींच्या निधीतून रस्ते, पाणी आणि कचरा व्यवस्थापनाची कामे केली जातील.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 28, 2026 | 01:58 PM
छत्रपती संभाजीनगरचा भव्य विस्तार! (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगरचा भव्य विस्तार! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरचा भव्य विस्तार!
  • ३११ गावांच्या विकासासाठी स्वतंत्र ‘DPR’ तयार होणार
  • २२० कोटींचा निधी सज्ज
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या ३११ गावांच्या विकासासाठी आता पायाभूत सुविधांचा स्वतंत्र सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते आणि अग्निशमन सुविधा उभारण्यावर प्राथमिक टप्प्यात भर दिला जाणार आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या नियोजन प्राधिकरणाच्या बैठकीत या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शहराचा वाढता विस्तार आणि नागरी सुविधांवरील ताण लक्षात घेऊन सात तालुक्यांतील ३११ गावांचा नियोजन प्राधिकरणात समावेश करण्यात आला आहे. या गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी सुरुवातीला मूलभूत
सुविधांची स्थिती तपासून स्वतंत्र डीपीआर तयार करण्याचे निश्चित करण्यात आले.

प्राधिकरणाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, फुलंब्री, वैजापूर, कन्नड आणि खुलताबाद परिसरातील गावांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गावांमध्ये स्वच्छ नियमित पाणीपुरवठा, कचरा संकलन व विल्हेवाट, अंतर्गत रस्त्यांचे जाळे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीची अग्निशमन सेवा उपलब्ध करण्यावर भर राहणार आहे.
यापूर्वी सिडकोने झालर क्षेत्रातील २६ गावांचा विकास आराखडा तयार केला होता. त्यामुळे ती गावे वगळून उर्वरित गावांसाठी स्वतंत्र नियोजन प्रक्रिया राबवली जाणार आहे. डीपीआर मंजूर झाल्यानंतर प्राधिकरणाच्या समितीकडून निधीची तरतूद केली जाईल. त्यानंतर राज्य शासनाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे.

केंद्राची ‘भारत औद्योगिक विकास योजना’ जाहीर; देशात उभे राहणार १०० इंडस्ट्रियल पार्क, संभाजीनगरच्या ‘ऑरिक’ला सुवर्णसंधी!

विविध सुविधांवर लक्ष

३११ गावांचा अंतिम विकास आराखडा तयार करण्यापूर्वी नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन आणि अग्निशमन या चार प्रमुख घटकांचा सखोल अभ्यास करून त्यानुसार स्वतंत्र डीपीआर तयार केला जाणार आहे. भविष्यात वाढणारी लोकसंख्या आणि नागरी विस्तार लक्षात घेऊनच सुविधा उभारल्या जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

२२० कोटी खर्चाविना

छत्रपती संभाजीनगर नियोजन प्राधिकरणासाठी राज्य शासनाने २२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, अद्याप या निधीचा वापर झालेला नाही. याच निधीतून प्राथमिक स्तरावर डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. तसेच नियोजन प्राधिकरणासाठी आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती, वेतन आणि प्रशासकीय खर्चही या निधीतून भागविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळणार आहे.

सात तालुक्यांतील गावांचा समावेश

नियोजन प्राधिकरणात समाविष्ट गावांमध्ये छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, फुलंब्री, वैजापूर, कन्नड आणि खुलताबाद तालुक्यांचा समावेश आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागात झपाट्याने वाढणारी वसाहत आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेऊन या भागांचा नियोजनबद्ध विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mathadi Workers Protest: राज्य सरकारच्या ‘त्या’ जीआरविरोधात माथाडी कामगारांचा एल्गार! १० हजार कुटुंबांवर उपासमारीची टांगती तलवार

Web Title: Grand expansion of chhatrapati sambhajinagar a separate dpr to be prepared for the development of 311 villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने
1

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम
2

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला
3

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा; तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू
4

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा; तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.