Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा; तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू

पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाड्यात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. ऐन पावसाळ्यात १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर्स सुरू असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११६ टँकर धावत आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 17, 2026 | 02:33 PM
ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा

Follow Us
Follow Us:
  • ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच!
  • १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा
  • तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू
छत्रपती संभाजीनगर: पावसाला सुरुवात झाल्याने संभाजीनगर जिल्ह्यातील टैंकर बंद करण्यात आले होते. मात्र मोजकेच दिवस बरसल्यानंतर पावसाने ओढ दिली. आज जुलै महिना सुरु होऊनही पावसाचा पत्ता नसल्याने संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यात पाणीटंचाईने पुन्हा डोके वर काढले आहे. परिणामी विभागातील एकूण १८२ गावे आणि ११७ वाड्या अद्याप तहानलेल्याच आहेत.
यांच्यासाठी तब्बल ३०३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात सर्वाधिक ११६ टँकर एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात सुरु आहेत.

उन्हाळ्यानंतर पावसाळी हंगाम सुरु झाल्यानंतर शासनाकडून टैंकर बंद केले जातात. परंतु यंदाचे चित्र वेगळे ठरत आहे. मान्सूनने उशिराने केलेले आगमन, त्यातही कमी हजेरी यामुळे विभागात पाणीटंचाई कायम आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील टँकर बंद करण्यात आले होते. मात्र पाणीटंचाई कायम असल्याने जिहाभारातून टैंकरसाठीचे प्रस्ताव येणे सुरूच होते.

पावसाची ओढ; गावात पाणीटंचाई जैसे थे

परिस्थिती पाहता जिल्ह्यात पुन्हा एकदा टँकर सुरु करण्यात आले आहेत. आजघडीला ऐन पावसाळ्यात तब्बल ३०३ टँकरद्वारे मराठवाड्यात पाणीपुरवठा केले जात असल्याचे चित्र आहे. ७ जुलै रोजीच्या शासकीय टँकर अहवालानुसार मराठवाड्यातील १०३ गावांमध्ये आणि ८४ वाड्यांमध्ये एकूण २०० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होता.

यासाठी १५ शासकीय व १८५ खासगी टैंकर कार्यरत असून १३६ शासकीय व ५५५ खासगी अशा एकूण ६९१ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. यात छत्रपती संभाजीनगरसह, हिंगोली आणि धाराशीव या तीन जिल्ह्यांत एकही टँकर सुरू नव्हते तर जालना जिल्ह्यातील ७० गावे आणि ३२ वाड्यांना सर्वाधिक १०७टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु होता.

सरकारी शाळेत ७ वर्षे दांडी मारून स्वतःची संस्था चालवली! छ. संभाजीनगरमधील ‘या’ शिक्षकाच्या पराक्रमावर सीईओंची मोठी कारवाई

पाऊस न पडल्याने पाणीपातळीत वाढच नाही

बीड, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यातही टैंकरद्वारे पाणी पुरवठा कायम होता. दरम्यान, १४ जुलै रोजी प्राप्त अहवालानुसार, संभाजीनगरात सर्वाधिक ११६, जालन्यात ९२, बीडमध्ये ६६ तर नांदेड १५ आणि परभणीत १२ टैंकर सुरु आहेत. याशिवाय हिंगोली आणि लातुरात प्रत्येकी एक एक टैंटँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्यात आजघडीलादेखील शून्य टँकरसंख्या आहे. या टँकरसाठी विभागातील एकूण ८७४ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक भागांतील भूजलपातळी पुरेशी वाढलेली नव्हती, त्यातच जुलैमध्येदेखील पावसाने समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाई कायम आहे.

मराठवाडा जिल्हावार टँकर आणि अधिग्रहित विहिरींची आकडेवारी

जिल्हा बाधित गावे बाधित वाड्या सुरू टँकर संख्या अधिग्रहित विहिरी
१. छ. संभाजीनगर ९१ ३४ ११६ ३०
२. जालना ५८ २८ ९२ १०६
३. बीड २१ ३६ ६६ ९५
४. नांदेड ४ १६ १५ १९६
५. परभणी ७ ० १२ ७२
६. हिंगोली ० ३ १ ८८
७. लातूर १ ० १ १९६
८. धाराशिव ० ० ० ९१
एकूण (विभाग) १८२ ११७ ३०३ ८७४

CSMC Property Survey: मालमत्तांचे सर्वेक्षण आता खासगी एजन्सी करणार! मनपाचा हिरवा कंदील; पण ‘या’ नगरसेवकांचा तीव्र विरोध

Web Title: Water scarcity in marathwada 303 tankers deployed highest in chhatrapati sambhajinagar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Marathwada
  • Marathwada Water
  • Water Crisis
  • Water Tanker

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
1

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर
2

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.