Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

₹७,१०६ कोटींच्या जळगाव-जालना रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात!

प्रस्तावित रेल्वे मार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याच्या दृष्टीने आता जळगावमध्ये हालचाली वाढल्या आहेत. जळगाव-जालना रेल्वे मार्गाचा खान्देशसह मराठवाड्याला मोठा फायदा होणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 23, 2025 | 03:20 PM
₹७,१०६ कोटींच्या जळगाव-जालना रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार (Photo Credit - X)

₹७,१०६ कोटींच्या जळगाव-जालना रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ₹७,१०६ कोटींच्या जळगाव-जालना रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार
  • भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात!
  • खान्देश आणि मराठवाड्याला मोठा फायदा
Jalgaon Jalna Railway: जळगाव-जालना १७४ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, सुमारे ७,१०६ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, प्रस्तावित रेल्वे मार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याच्या दृष्टीने आता जळगावमध्ये हालचाली वाढल्या आहेत. जळगाव-जालना रेल्वे मार्गाचा खान्देशसह मराठवाड्याला मोठा फायदा होणार आहे. संपूर्ण रेल्वे मागांपैकी सुमारे ७० टक्के मार्ग जालना जिल्ह्यातून तर उर्वरित ३० टक्के मार्ग जळगाव जिल्ह्यातून जाणार आहे. या मार्गामुळे जळगावमार्गे गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवासी व मालगाड्यांना आंध्र प्रदेश तसेच दक्षिण भारतात अधिक वेगवान दळणवळण साधता येणार आहे.

नवीन रेल्वे स्थानके

विशेषतः जालना जिल्ह्यातील राजूर येथे भेट देणाऱ्या भाविकांसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार असून, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या रेल्वे मार्गाचा मोठा लाभहोणार आहे. औद्योगिक आणि कृषी विकासाला गती देण्यासह व्यापार वाढीस मदत करून दळणवळणाची सुलभता वाढविण्याच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रस्तावित नवीन मार्गासाठी रेल्वेने २००८-०९ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात आरओआर (रेट ऑफ रिटर्न) नकारात्मक आला होता. त्या सर्वेक्षणादरम्यान जालना-जळगाव मार्गावर नागेवाडी, पिंपळगाव, बावणेपांगरी, राजूर, केदारखेडा, भोकरदन, सिल्लोड, अन्वी, गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, वाकोद, पिंपळगाव बुद्रुक, पहूर, सूनासगाव, जेरी, उमाळे, नशिराबाद, अशी संभाव्य रेल्वे स्थानके निश्चित करण्यात आली होती. कालांतराने आरओआर सकारात्मक आल्यानंतर केंद्र सरकारने जळगाव ते जालना रेल्वे मार्गाला मंजुरी दिली.

हे देखील वाचा: एका अपघातामुळे पेटला आशेचा दिवा! ६ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाची चित्रपटासारखी कथा

प्रकल्पाला मिळालेली मंजुरी

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असताना रावसाहेब दानवे यांनी जानेवारी २०२२ मध्ये या मार्गाची घोषणा केली होती. सुमारे ७,१०५ कोटी ४३ लाख रुपये खर्च रेल्वे मार्गासाठी अपेक्षित आहे. राज्य सरकारने यापूर्वीच आपल्या हिश्याच्या ५० टक्के खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. एकूण १७४ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग प्रस्तावित असून, त्यापैकी जवळपास १४० किलोमीटरचा मार्ग जालना जिल्ह्यातून तर ३४ किलोमीटरचा मार्ग जळगाव जिल्ह्यातून जाणार आहे. या मार्गासाठी आवश्यक जमिनीचे संपादन करण्यासाठी प्रशासनाकडून सध्या कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, जळगाव-भुसावळ रेल्वे मार्गावरील भादली स्थानकापासून जालना मार्ग निघणार असल्याने त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने आता कार्यवाही सुरू केली आहे.

कामाला सुरुवात कधी होणार?

जळगाव-भुसावळ दरम्यान पाचव्या रेल्वे मार्गाचे काम करतानाच, प्रस्तावित जालना मार्गासाठी जळगाव-भादली दरम्यान नऊ किलोमीटरचा सहावा मार्ग टाकण्याच्या हिशेबाने आवश्यक जमिनीचे सपाटीकरण सुरू करण्यात येत आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पार पडताच प्रत्यक्ष कामास लगेच सुरूवात केली जाईल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. जालना जळगाव रेल्वेमार्ग सुरू होणार असल्यामुळे या दोन जिल्ह्यातील दळणवळणाचा मार्ग मोकळा होणार आहे. रेल्वेमार्गामुळे अनेक तालुक्यांच्या विकासाला गती मिळेल, असे चित्र आहे.

हे देखील वाचा: छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीमुळे भाजीपाला कडाडला! ९० टक्के दर वाढले; गृहिणींचे बजेट कोलमडले

Web Title: Green signal for jalgaon jalna railway line land acquisition work for 7106 crore project in final stage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • Central Governement
  • Indian Railway
  • Jalgaon
  • Jalna

संबंधित बातम्या

हद्दच पार! ट्रेनच्या सीटवर महिलेने चक्क बनवली मॅगी; Video Viral होताच रेल्वे प्रशासनाकडून…
1

हद्दच पार! ट्रेनच्या सीटवर महिलेने चक्क बनवली मॅगी; Video Viral होताच रेल्वे प्रशासनाकडून…

Jalgaon Crime: 13 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवली जीवनयात्रा; शिक्षकांच्या त्रासाचा पालकांचा आरोप
2

Jalgaon Crime: 13 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवली जीवनयात्रा; शिक्षकांच्या त्रासाचा पालकांचा आरोप

Jalgaon Politics : मुक्ताईनगरच्या होम ग्राउंडवर Eknath Khadse यांनी घेतली माघार; नेमकं कारण काय ?
3

Jalgaon Politics : मुक्ताईनगरच्या होम ग्राउंडवर Eknath Khadse यांनी घेतली माघार; नेमकं कारण काय ?

पुरुषांनाही रडू येत…! मनातील दुःख अश्रूंनी केलं व्यक्त, खांद्यावर जबाबदारीच्या बेड्या अन् रेल्वे स्टेशनवरचा तो Video Viral
4

पुरुषांनाही रडू येत…! मनातील दुःख अश्रूंनी केलं व्यक्त, खांद्यावर जबाबदारीच्या बेड्या अन् रेल्वे स्टेशनवरचा तो Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.