Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khultabad: ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ‘धान्य महोत्सव’ प्रभावी मंच; पालकमंत्री संजय शिरसाट यांचे प्रतिपादन

शेती आणि उद्योग यांची सांगड घालून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या महोत्सवातून होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 23, 2026 | 03:42 PM
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी 'धान्य महोत्सव' प्रभावी मंच; पालकमंत्री संजय शिरसाट यांचे प्रतिपादन (Photo Credit- X)

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी 'धान्य महोत्सव' प्रभावी मंच; पालकमंत्री संजय शिरसाट यांचे प्रतिपादन (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ‘धान्य महोत्सव’ प्रभावी मंच
  • पालकमंत्री संजय शिरसाट यांचे प्रतिपादन
Khultabad Agriculture and Grain Festival 2026: कृषी व धान्य महोत्सव हा ग्रामीण विकासासाठी प्रभावी मंच ठरत असून, या माध्यमातून शेतकरी, महिला बचत गट आणि स्थानिक उद्योजकांना थेट बाजारपेठ मिळत आहे. शेती आणि उद्योग यांची सांगड घालून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या महोत्सवातून होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले. खुलताबाद येथील भद्रा मारुती संस्थान परिसरात आयोजित दोन दिवसीय धान्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, सभापती सुनीता खंडागळे, भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठ पाटील बारगळ, डॉ. बी. टी. गोरे आर्दी उपस्थित होते. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, जिल्ह्यातील कृषी उत्पादनात सातत्याने वाढ होत असून या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रभावी पाणी व्यवस्थापनावर विशेष भर देणे आवश्यक

धान्य महोत्सव हा यासाठी प्रभावी दुवा ठरत आहे. या महोत्सवात विविध धान्ये, कृषी उत्पादने, प्रक्रिया उद्योगातील वस्तू तसेच पारंपरिक व स्थानिक उत्पादनांचे स्टॉल उभारण्यात आले असून, शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संवाद साधला जात आहे. त्यामुळे बाजारपेठेतील पारदर्शकता वाढण्यास मदत होत आहे. ग्रामीण भागात उत्पादनवाढ होत असली तरी पाणीटंचाई, प्रदूषण आणि अपुरी पायाभूत सुविधा या समस्या अद्याप कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. या अडचणींवर मात करण्यासाठी जलसंधारण, पाइपलाइन कामे आणि प्रभावी पाणी व्यवस्थापनावर विशेष भर देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

Chhatrapati Sambhajinagar: अवकाळी पावसाचे सत्र संपले! आता पुन्हा उष्णतेत होणार वाढ; सिमेंट रस्ते, इमारतींमुळे वाढतेय तापमान

शहरात कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देणार

शासनाच्या विविध योजनांद्वारे या बाबींवर सातत्याने काम सुरू असून, ग्रामीण भागात आवश्यक सुविधा पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्हा प्रशासन, कृषी विभाग व आत्मा यांच्या सहकार्याने प्रस्ताव तयार केल्यास शहरात कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देता येईल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती जोरी यांनी केले, तर आभार तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांनी मानले.

धान्य महोत्सवात ७० स्टॉल उभारले

उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी प्रास्ताविकातून महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. महोत्सवात विविध धान्ये, कृषी उत्पादने तसेच महिला बचत गटांच्या वस्तूंचे सुमारे ७० स्टॉल उभारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी शास्त्रज्ञ डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. संजय पाटील, डॉ. दीप्ती पाडगावकर तसेच डाळिंब तज्ज्ञ डॉ. बी. टी. गोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रेखा चव्हाण, प्रतिक्षा कापसे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, विकास कापसे, पंचायत समिती सदस्य दिनेश अंभोरे, नगरसेवक परसराम बारगळ, योगेश बारगळ, शुभम बारगळ, उमेश आवारे, सचिन पवार, उमेश आवारे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंग्रजी शाळांना ‘संरक्षण कायदा’ लागू करा! संस्थाचालकांवरील हल्ले आणि खंडणीच्या प्रकारांमुळे ESM आक्रमक

Web Title: Khultabad agriculture and grain festival 2026 news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
4

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.