महापालिकेने विविध संवर्गातील पदांसाठी अर्ज मागविले होते. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून एक हजार रुपये, तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकडून ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले. या भरती प्रक्रियेसाठी सुमारे २९ हजार उमेदवार पात्र ठरले असून गुरुवारपासून त्यांना ऑनलाइन प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, पदांचे स्वरूप वेगवेगळे असल्याने स्वतंत्र परीक्षा घेणे अपेक्षित होते. अनेकांनी एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करत शुल्क भरले आहे. मात्र एकाच प्रश्नपत्रिकेच्या आधारे निवड प्रक्रिया राबविली जात असल्याने एखाद्या पदासाठी संधी न मिळाल्यास दुसऱ्या पदासाठी स्वतंत्र स्पर्धेची संधीही गमावली जाणार असल्याची खंत उमेदवार व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, प्रशासनाने या आक्षेपांवर स्पष्टीकरण देताना सर्व पदांसाठी निर्धारित अभ्यासक्रम समान असल्याने एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जाणार असून कोणत्याही अफवा किंवा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दुपारी ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), अग्निशामक आणि चालक-यंत्रचालक पदांसाठी परीक्षा होईल. दुपारी १२ वाजता कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), रोखपाल तसेच उद्यान सहाय्यक/कृषी सहाय्यक पदांची परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक आणि उपअग्निशमन केंद्र अधिकारी पदांसाठी परीक्षा होणार आहे. ९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता स्वच्छता निरीक्षक पदासाठी परीक्षा घेतली जाईल. दुपारी १२ वाजता अनुरेखक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक पदांसाठी ऑनलाइन परीक्षा होणार आहे.
महापालिकेतील रिक्त पदांच्या भरतीसाठी आयबीपीएस या शासनमान्य संस्थेमार्फत परीक्षा घेतली जात आहे. विविध पदांसाठी भरती असली तरी त्यांचा अभ्यासक्रम समान असल्याने एकच प्रश्नपत्रिका ठेवण्यात आली आहे.
संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर






