Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठवाड्याची चिंता वाढली! उन्हाच्या तडाख्याने धरणांतील पाणीपातळी घटली; जायकवाडीत ७२% साठा शिल्लक

मराठवाड्यात वाढत्या उन्हामुळे धरणांतील पाणीसाठा ७२.३४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जायकवाडीत ७२% तर सिद्धेश्वर प्रकल्पात सर्वात कमी साठा आहे. वाचा सविस्तर आकडेवारी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 13, 2026 | 03:52 PM
मराठवाड्याची चिंता वाढली! उन्हाच्या तडाख्याने धरणांतील पाणीपातळी घटली (Photo Credit- X)

मराठवाड्याची चिंता वाढली! उन्हाच्या तडाख्याने धरणांतील पाणीपातळी घटली (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • मराठवाड्याची चिंता वाढली!
  • उन्हाच्या तडाख्याने धरणांतील पाणीपातळी घटली
  • जायकवाडीत ७२% साठा शिल्लक
Marathwada Water Crisis: उन्हाने सर्वत्र तडाखा देणे सुरु केले आहे. तसे वाढत्या ऊन्हाचा पाणीसाठ्यांवर परिणाम होत आहे. ऊन जसे जसे वाढायला सुरुवात झाली आहे तशी तशी धरणातील पाणीसाठ्याची पातळी खाली जायला लागली आहे. मराठवाडा विभागाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यातील पाणीसाठा ७२.३४ टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. जायकवाडी या मोठ्या धरणामध्ये ७२ टक्के आहे. जायकवाडी, येलदरी, माजलगाव, मांजरा या मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या तरी वरी स्थिती आहे.

मराठवाड्यातल्या या मोठ्या धरणांचा प्रकल्पिय संकल्पित साठा ५१५६ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. यामध्ये सध्या ३७३० दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणाचा २१७१ दशलक्ष घनमीटर एवढी प्रकल्पिय साठा आहे, त्यापैकी सध्या १५७१ दशलक्ष घनमीटर एवढा म्हणजे ७२ टक्के पाणीसाठा आहे.

सध्या सर्वात कमी उपयुक्त साठा हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्पात आहे. याचा प्रकल्पियसाठा ८१ दशलक्ष घनमीटर आहे तर सध्या ३२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. परभणी जिल्ह्यातील येलदरीचा प्रकल्पिय साठा ८०९ दशलक्ष घनमीटर असून सध्या ६३९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा आहे. हा साठा ७९ टक्के आहे. जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पात १३६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ५६ टक्के आहे.

मराठवाड्याच्या आरोग्य व्यवस्थेत क्रांती होणार! ‘घाटी’ला आता ‘एम्स’चा दर्जा मिळणार? राज्य सरकारचा केंद्राकडे मोठा पाठपुरावा

नांदेड : प्रकल्प अर्ध्यावर

जिल्ह्यातील सिना कोळेगाव प्रकल्पाचा प्रकल्पिय साठा ८९ दशलक्ष घनमीटर असून सध्या त्यात ६० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ६८ टक्के एवढे आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचा प्रकल्पिय साठा ९६४ दशलक्ष घनमीटर असून सध्या त्यात ७२२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ७५ टक्के एवढे आहे. नांदेड जिल्ह्यातील निम्न मनार प्रकल्पाचा प्रकल्पिय साठा १३८ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या त्यात ८० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ५८ टक्के एवढे आहे. जिल्ह्यातील विष्णूपुरी प्रकल्पात ४७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे.

माजलगाव प्रकल्प, ७३% साठा

बीड जिल्ह्यातील माजलगाद प्रकल्पाचा प्रकल्पिय साठा ३१२ दशलक्ष घनमीटर असून सध्या त्यात २२९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ७३ टक्के एवढे आहे. याच जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पाचा प्रकल्पिय साठा १७७ दशलक्ष घनमीटर असून सध्या त्यात १३९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ७९ टक्के एवढे आहे. धाराशीव जिल्ह्यातील निम्न तेरणा प्रकल्पाचा प्रकल्पिय साठा ९१ दशलक्ष घनमीटर असून सध्या त्यात ७४ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ८१ टक्के एवढे आहे.

Chhatrapati Sambhajinagar News: दुष्काळाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल: नदीजोड प्रकल्पांमुळे मराठवाड्याचा कायापालट

Web Title: Marathwada dam water level declines jayakwadi storage at 72 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Marathwada

संबंधित बातम्या

हायड्रोलिक चाचणीवरून पेटला नवा वाद, मनपा आयुक्त येडगे चाचणीच्या बाजूने; महापौरांनी गरजेवरच उपस्थित केले प्रश्न
1

हायड्रोलिक चाचणीवरून पेटला नवा वाद, मनपा आयुक्त येडगे चाचणीच्या बाजूने; महापौरांनी गरजेवरच उपस्थित केले प्रश्न

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘तुमच्यासमोरच हात पकडतो, काय कराल?’ पतीसमोरच महिलेचा विनयभंग; विरोध करताच मायलेकांकडून हल्ला
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘तुमच्यासमोरच हात पकडतो, काय कराल?’ पतीसमोरच महिलेचा विनयभंग; विरोध करताच मायलेकांकडून हल्ला

पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजून मित्राजवळ सोडले, नंतर हॉटेलमध्ये…; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
3

पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजून मित्राजवळ सोडले, नंतर हॉटेलमध्ये…; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार

Chhatrapati Sambhajinagar Accident: पिकअप-दुचाकीचा भीषण अपघात!  एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
4

Chhatrapati Sambhajinagar Accident: पिकअप-दुचाकीचा भीषण अपघात! एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.