Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोसंबीला ‘मिठाईचा दर्जा’ द्या! दर मिळत नसल्याने आर्थिककोंडी; मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

मराठवाड्यात मोसंबीचा भाव ८ ते १२ रुपयांपर्यंत कोसळल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी सण-समारंभात मिठाईऐवजी मोसंबी देण्याचे भावनिक आवाहन नागरिकांना केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 04, 2026 | 02:33 PM
मोसंबीला 'मिठाईचा दर्जा' द्या! दर मिळत नसल्याने आर्थिककोंडी (Photo Credit- X)

मोसंबीला 'मिठाईचा दर्जा' द्या! दर मिळत नसल्याने आर्थिककोंडी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • मोसंबीला ‘मिठाईचा दर्जा’ द्या!
  • दर मिळत नसल्याने आर्थिककोंडी
  • मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी
विलास लाटे। नवराष्ट्र ढोरकीन: मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारात मोसंबीला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मोसंबीला केवळ फळ म्हणून नव्हे, तर ‘आरोग्यदायी मिठाई’ म्हणून समाजात मान्यता मिळावी, अशी भावनिक मागणी मोसंबी उत्पादक शेतकरी केली आहे.

मोसंबी हे मराठवाड्यातील लाखो शेतकरी कुटुंबांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. दुष्काळी परिस्थितीतही मोसंबीच्या बागांनी अनेक कुटुंबांना आधार दिला आहे. मुलांचे शिक्षण, विवाह, आरोग्य आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह या सर्व गरजा मोसंबीच्या उत्पन्नावर भागवल्या जातात. मात्र आज उत्पादन खर्च प्रतिकिलो २० रुपयांपेक्षा अधिक असताना बाजारात केवळ ८ ते १२ रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

Sambhajinagar Water Supply: विभागीय आयुक्तांकडून पाणीपुरवठा योजनेचा आढावा; संभाजीनगरचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार

शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ संचालक अनिल हजारे, दिपक हजारे, कैलास आढाव, सचिन हजारे, महादेव हजारे, पांडुरंग हजारे, मुरलीधर गहाळ, गणेश गहाळ, बापूराव गहाळ, विठ्ठल गहाळ, दिगंबर हजारे, देविदास हजारे, नामदेव गहाळ, ज्ञानदेव हजारे, सचिन थोटे, परसराम हजारे, भरत थोटे, प्रल्हाद गहाळ, शंकर सातपुते, कैलास गव्हाणे, योगेश गव्हाणे, मनोज हजारे, संदिप सातपुते, फेरोज पठाण, शिवनाथ हजारे, गणेश हजारे, संभाजी हजारे, अशोक भुकेले, भागवत हजारे, सुनिल हजारे, अशोक हजारे, संदिप हजारे, विठ्ठल काकडे, सुदाम गोजरे, कैलास गहाळ, विनायक रंधे, दिगंबर येरे, दिनकर हजारे, महेंद्र गव्हाणे, सूर्यकांत गव्हाण गव्हाणे, धर्मराज गव्हाणे, संपत झिने, पवन गोरे, रामदास गहाळ, अमोल गहाळ, दादासाहेब हजारे, नामदेव हजारे, बळीराम हजारे, रामेश्वर हजारे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, कुणाच्या घरी भेट देताना, रुग्णांना भेटताना, वाढदिवस, सण-समारंभ किंवा लग्नकार्य यांसारख्या प्रसंगी मिठाईच्या डब्यासोबत मोसंबीची भेट देण्याची सवय लावावी. मोसंबी ही आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. त्यामुळे ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

मोसंबीचे ब्रँडिंग व्हावे

महाराष्ट्रातील नागरिकांनी दरमहा केवळ एक किलो मोसंबी खरेदी करण्याचा संकल्प केला, तरी मोसंबीचा खप मौठ्या प्रमाणात वाढेल. परिणामी बाजारभावात सुधारणा होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. ‘मिठाईच्या डब्यासोबत मोसंबीची पिशवी हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचला, तर लाखो शेतकरी कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोसंबीला योग्य बाजारभाव मिळावा, तिचे ब्रेडिंग व्हावे आणि समाजाने या फळाला सन्मानाचे स्थान द्यावे, अशी अपेक्षा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: बारावीसाठी आता ‘बायोमेट्रिक’! वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लागणार, विद्यार्थ्यांवर तिसऱ्या डोळयांची नजर

Web Title: Marathwada mosambi farmers facing financial crisis appeal society to use as healthy sweet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Farmers
  • Marathwada

संबंधित बातम्या

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी
1

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
2

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

पुरंदर विमानतळासाठी 40 हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
3

पुरंदर विमानतळासाठी 40 हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल करताना कोणते निकष लावले? मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
4

पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल करताना कोणते निकष लावले? मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.