Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उकाड्याने हैराण संभाजीनगरकरांसाठी गूड न्यूज! मान्सूनचे अंदमानात आगमन; मराठवाड्यात ‘या’ तारखेला बरसणार सरी

छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! मान्सूनने अंदमानात वेळेपूर्वीच हजेरी लावली असून, ५ ते ८ जून दरम्यान मराठवाड्यात मान्सूनच्या सरी बरसण्याचा अंदाज डॉ. कैलास डाखोरे यांनी वर्तवला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 18, 2026 | 03:40 PM
उकाड्याने हैराण संभाजीनगरकरांसाठी गूड न्यूज! मान्सूनचे अंदमानात आगमन; मराठवाड्यात ‘या’ तारखेला बरसणार सरी
Follow Us
Follow Us:

 

  • उकाड्याने हैराण संभाजीनगरकरांसाठी गूड न्यूज!
  • मान्सूनचे अंदमानात आगमन
  • मराठवाड्यात ‘या’ तारखेला बरसणार सरी
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): एकीकडे संभाजीनगर शहर जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्यभरात उष्णतेचा कहर सुरु असल्याने लोक त्रासले आहेत तर दुसरीकडे मान्सूनने अंदमान बेटांवर आगमन केल्याची आनंद वार्ता आहे. हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे वेळेच्या चार दिवस आधीच मान्सूनची वाटचाल सुरु आहे. या वेगाने प्रगती राहिल्यास जूनच्या पहिल्या आठवड्याअखेरीस मराठवाड्यात आणि संभाजीनगर जिल्ह्यात मान्सूनच्या सरी बरसण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी व्यक्त केली आहे.

चार दिवस आधीच मान्सूनची कूच सुरु

राज्यातील हवामनात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. संभाजीनगरसह मराठवाडा होरपळून निघत आहे. संभाजीनगरात विक्रमी ४३ अंशाच्या पुढे कमाल पार गेला आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता मान्सूनची आतुरतेने प्रतीक्षा आहे. दरम्यान, हवामानातील वेगवान हालचालींमुळे ठरलेल्या वेळेच्या चार दिवस आधीच मान्सूनची कूच सुरु आहे. मान्सूनने अंदमान निकोबार बेटावर धडक मारली असल्याने आता त्याची वाटचाल भारताच्या दिशेने सुरु झाली आहे. अंदाजे १ जूनच्याही आधी केरळच्या किनारपट्टीवर मान्सून पोहोचून पुढे कोंकणमार्गे महाराष्ट्राकडे तो प्रवासाला लागेल असा अंदाज आहे.

पावसाळ्यात वीज गुल होणार नाही! महावितरणचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; ३० मे पर्यंत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश

८ ते ९ जूनपर्यंत मराठवाड्यात होणार मान्सूनचे आगमन

यात हवामानात कोणताही अनपेक्षित अडथळा न आल्यास अंदाजे जूनच्या पहिल्या आठवडा अखेरीस म्हणजेच ८ ते ९ जूनपर्यंत मराठवाड्यात मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान संशोधन प्रकल्पाचे कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी आवश्यक शेतीची कामे उरकून घेण्याचे आवाहन हवामान अभ्यासकांनी केले आहे.

दरवर्षी येतो १० ते १२ जूनपर्यंत पाऊस

मान्सून कोंकणमार्गे मराठवाड्यात अंदाजे १० ते १२ जूनपर्यंत धडक मारतो. यंदा मान्सूनची गती चार दिवस वेगाने होत आहे. या प्रवासात कुठेही रेंगाळला नाही तर अंदाजे ५ ते ८ जूनपर्यंत पोहोचू शकेल. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात कुठेही मान्सूनने आगमन केल्यास प्रत्येक जिल्ह्यात त्याच दिवशी मान्सूनचे आगमन झाल्याचे समजले जाते. त्यानुसार संभाजीनगर जिल्ह्यातही अंदाजे ५ ते ८ जूनपर्यंत मान्सूनच्या सुखद सरी बरसतील असा अंदाज आहे.

Maharashtra Rain News : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! माथेरानची मिनी ट्रेन बंद, काय आहे प्रशासनाचा निर्णय

Web Title: Monsoon 2026 arrival update marathwada chhatrapati sambhajinagar rain prediction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • mansoon
  • Marathwada

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
1

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.