Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छ. संभाजीनगरमधील २.८५ लाख गुंठेवारी धारकांना मोठा दिलासा! ७/१२ रद्द करून मिळणार ‘पीआर कार्ड’; मनपा सभेत ठरावाला मंजुरी

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहराच्या वाढीव १८ खेड्यांतील २.८५ लाख गुंठेवारी धारकांसाठी ७/१२ रद्द करून पीआर कार्ड देण्याच्या ऐतिहासिक ठरावाला मंजुरी दिली आहे. कोल्हापूर पॅटर्ननुसार होणार काम.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 15, 2026 | 01:56 PM
छ. संभाजीनगरमधील २.८५ लाख गुंठेवारी धारकांना मोठा दिलासा! ७/१२ रद्द करून मिळणार 'पीआर कार्ड' (Photo Credit- X)

छ. संभाजीनगरमधील २.८५ लाख गुंठेवारी धारकांना मोठा दिलासा! ७/१२ रद्द करून मिळणार 'पीआर कार्ड' (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • छ. संभाजीनगरमधील २.८५ लाख गुंठेवारी धारकांना मोठा दिलासा!
  • ७/१२ रद्द करून मिळणार ‘पीआर कार्ड’
  • मनपा सभेत ठरावाला मंजुरी
छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर शहराच्या वाढीव क्षेत्रात म्हणजेच १८ खेड्यांमध्ये पीआर कार्ड देताना बहुतांश मालमत्ता या गुंठेवारीत मोडतात. या सर्व मालमत्ताधारकांना आता पीआर कार्ड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामाला मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली. शहरातील २ लाख ८६ हजार ५०० मालमत्ताधारकांचा सातबारा रद्द करून त्यांना पीआर देण्याची योजना शासनाने अंमलात आणली आहे. भूमी अभिलेख विभागामार्फत हे काम केले जाणार आहे. मंगळवारी (१४ जुलै) सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मांडण्यात आला. यावर चर्चा होऊन या कामाला मंजूरी देण्यात आली आहे.

आचारसंहिता संपल्यानंतर प्रथमच मंगळवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. यात मनपा प्रशासनातर्फे पीआर कार्डचा ठराव सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. यावर सदस्यांनी आपापले मत व्यक्त करत चर्चेत सहभाग घेतला. प्रारंभी नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी, शहराच्या इतिहासात पहिल्यांदा हे मोठे काम होत असल्याचे सांगितले. महापौर समीर राजूरकर यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले, त्याबद्दल वानखेडे यांनी महापौरांचे अभिनंदन केले. शहराच्या वाढीव क्षेत्रात म्हणजेच १८ खेड्यांमध्ये पीआर कार्ड देताना बहुतांश मालमत्ता या गुंठेवारीत मोडतात. त्यांना अगोदर सातबारामध्ये नाव घ्यावे लागेल, त्यावरून पीआर कार्ड तयार करून मिळेल. भूमी अभिलेख विभागाचा इतिहास पाहता सलीम अली सरोवराचे चार पीआर कार्ड तयार करून दिले आहेत. असा कोणताही प्रकार या भागात होऊ नये.

‘बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या, अन्यथा…’, गोर सेनेचे प्रा. संदेश चव्हाण यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

१८ खेड्यातील २.८५ लाख मालमत्ताधारकांना दिलासा

सिडको-हडकोसाठीही विशेष बाब म्हणून पीआर कार्ड द्यावेत, अशी मागणी त्यांनी सदस्य राजगौरव वानखेडे यांनी केली. महापौरांनी हस्ताक्षेप करत या ठरावावर अधिक प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की, वाढीव हद्दीतील १८ खेड्यांमधील नागरिकांना पीआर कार्ड मिळतील. शहरात अगोदरच सीटीएस क्रमांक आहेत. अमित भुईगळ यांनी स्लम मधील नागरिकांचा विचार करावा लागणार असल्याचे म्हटले. नगरसेवक रशीद मामू, सविता कुलकर्णी, माधूरी अदवंत यांनीही या विषयावर आपली भूमिका मांडली.

वक्फ बोर्डाच्या जागांचे काय? असा प्रश्न उसामा अब्दुल कदीर यांनी उपस्थित केला. उपसंचालक मनोज गजें यांनी सविस्तर माहिती देताना या योजनेचा २ लाख ८६ हजार ५०० जणांना लाभ होणार असल्याने सांगितले. शासनाने या संदर्भात अध्यादेश काढून निर्णय घेतला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, या सर्व प्रक्रियेसाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्च येणार असून, हा निधी डीपीडीसीतून मिळावा यासाठी प्रस्ताव सुद्धा पाठविला जाणार आहे. नागरिकांना मोठा दिलासा देताना त्यात चूकीचे काही होणार नाही, याची काळजी, दक्षता घ्यावी अशी सूचना नगरसेवकांनी केली.

चौकशीनंतरच मिळणार आहे आता ‘पीआर कार्ड’

पालिका आयुक्त अमोल येडगे यांनी याविषयी अधिक माहिती देताना नमूद केले की, कोल्हापूर येथे हे काम झाले आहे. त्याच धर्तीवर शासनाने छत्रपती संभाजीनगर शहराची निवड करून पीआर कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. सभेत अशा पद्धतीचा ठराव घेणारी ही पहिली महापालिका आहे. गावठाण आणि अन्य ठिकाणी चौकशी करूनच पीआर कार्ड दिले जाणार असल्याचे आयुक्त येडगे म्हणाले. यानंतर महापौर समीर राजूरकर यांनी ठरावाला मंजूरी दिली.

Chhatrapati Sambhajinagar: पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात! वाढीव पाणीपुरवठा रखडला; बुधवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक

Web Title: Municipal corporation approves pr cards for gunthewari properties marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Property Card

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
1

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.