Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Paper Leak Reaction: ‘नीट’वरून काँग्रेस रस्त्यावर, तर राहुल गांधीविरुद्ध भाजप आक्रमक; संभाजीनगरमध्ये फुल हायव्होल्टेज ड्रामा

नीट पेपरफुटी आणि राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसने रस्ता रोको केला. तर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर धडक दिल्याने दोन्ही पक्ष आमनेसामने आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 23, 2026 | 01:59 PM
'नीट'वरून काँग्रेस रस्त्यावर, तर राहुल गांधीविरुद्ध भाजप आक्रमक

'नीट'वरून काँग्रेस रस्त्यावर, तर राहुल गांधीविरुद्ध भाजप आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • ‘नीट’वरून काँग्रेस रस्त्यावर, तर राहुल गांधीविरुद्ध भाजप आक्रमक
  • संभाजीनगरमध्ये फुल हायव्होल्टेज ड्रामा
  • वाचा सविस्तर बातमी!
Chhatrapati Sambhajinagar: नीट पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी, दिल्ली येथे विद्यार्थी, युवकांवरील लाठीहल्ला आणि राहून गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने बुधवारी क्रांती चौकात आंदोलन करत रस्ता रोको आणि घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानासमोर केलेल्या आंदोनाच्या निषेधार्थ भाजपने गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयासमोर नारेबाजी केली. शहागंज येथे दोन्ही पक्ष आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. यात दोन्ही पक्षातील काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले.

नीट पेपरफुटी, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून काँग्रेस आक्रमक झाली आहे. यासोबतच दिल्ली येथे राहुल गांधी यांना अटक केल्याचा विरोध म्हणून बुधवारी काँग्रेसने क्रांती चौक येथे प्रचंड घोषणाबाजी करत रस्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा विरोध केला. यामुळे बराच वेळ वाहतुकीवरही परिणाम झाला.

पोलिसांनी बॅरिकेट्स लावून चौकातच अडवले

पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत सिटी चौक पोलीस ठाण्यात नेले. येथे समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले. शिक्षण व्यवस्था पारदर्शक, विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण असणे ही सरकारवी जबाबदारी आहे. पेपरफुटीच्या घटना, विद्याथ्यांवरील अन्याय आणि आंदोलन दडपण्याचे प्रयत्न हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यावेळी म्हणाले.

आंदोलनात सागर साळुंके, राजेश मुंढे, अशोक डोळस, इकबालसिंग गिल, डॉ. निलेश आंबेवाडीकर, विशाल बन्सवाल, अबीद हुसैन सय्यद, सागर नागरे, शेख कैसर बाबा, गौरव जैस्वाल, अजय डिडोरे, ऋषिकेश महाजन, संजय धर्मरक्षक, अनिता भंडारी, उषा खंडाळे, अरुणा लांडगे, शीला मगरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर काही पोलिसांनी पदाधिकाऱ्याऱ्यांना ताब्यात घेत सोडून दिले. दरम्यान, भाजपनेदेखील राहुल गांधी यांच्या आंदोलनाचा विरोध म्हणून कॉंग्रेस पक्ष कार्यालयावर हल्लाबोल केला. मात्र पोलिसांनी बॅरिकेट्स लावून त्यांना चौकातच अडवले. तोपर्यंत कॉंग्रेस पदाधिकारीदेखील पक्ष कार्यालयात जमा झाले.

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने

लोकशाही मूल्यांवर आघात

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवर करण्यात आलेला लाठीहल्ला आणि राहुल गांधींना केलेली अटक हा लोकशाही मूल्यांवर आधात असून अशा दडपशाहीचा कॉंग्रेस पक्ष तीव्र निषेध करतो. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर जनआंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. अॅड. सय्यद अक्रम (काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष)

काँग्रेसचा धिक्कार

भारताच्या इतिहासात कोणीही आतापर्यंत पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलेले नाही. मात्र राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसने हे आंदोलन केले. याचा भाजप निषेध करतो. आज काँग्रेस रामनामाचा जप करत आहे. ही सगळी नौटंकी आहे. ७० वर्षात जनभावनेचा त्यांनी आदर ठेवला नाही. त्यांचा आम्ही धिक्कार करतो. अतुल सावे (कॅबिनेट मंत्री)

दोन्ही पक्ष केली एकमेकाविरोधात घोषणाबाजी

भाजप पदाधिका-यांनी काँग्रेसविरोधात तर काँग्रेसने भाजपविरोधात घोषणाबाजी सुरु केली. हा हायव्होल्टेज ड्रामा पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी जमली होती. अशा प्रकारची आंदोलने
लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी असल्याचे पदाधिका-यांनी सांगितले, या आंदोलनात कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी मंत्री डॉ. भागवत कराड, माजी आ. संजय केणेकर सहभागी झाले होते.

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम

Web Title: High voltage drama in sambhajinagar as congress and bjp protest over neet paper leak marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • BJP
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Congress
  • neet paper leak
  • Protest

संबंधित बातम्या

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी
1

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
2

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका
3

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका

Satara News : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर; साताऱ्यात मूक मोर्चा, मुंबईत आंदोलनाचा इशारा
4

Satara News : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर; साताऱ्यात मूक मोर्चा, मुंबईत आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.