Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar News : तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ४३ हजार हेक्टर क्षेत्राला मिळणार पाणी

Sambhajinagar News : नांदूर मधमेश्वर कालव्याचे आवर्तन अखेर सुरू झाल्याने वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शुक्रवारी रात्री कालव्यात ३०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 22, 2026 | 02:42 PM
Relief for Farmers in 102 Villages of Vaijapur, Gangapur and Kopargaon ( वैजापूर, गंगापूर आणि कोपरगावमधील १०२ गावांतील शेतकऱ्यांना दिलासा ) फोटो सौजन्य AI

Relief for Farmers in 102 Villages of Vaijapur, Gangapur and Kopargaon ( वैजापूर, गंगापूर आणि कोपरगावमधील १०२ गावांतील शेतकऱ्यांना दिलासा ) फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • पाणी सोडल्याशिवाय माधार घेणार नसल्याची भूमिका 
  • पाणीवाटपावर प्रशासनाचा पहारा  
  • तीन आठवडे आवर्तन सुरू राहण्याची शक्यता 
Sambhajinagar News :  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील खरीप हंगामातील पिके दुष्काळाने हिरावून घेतल्यानंतर रब्बी हंगाम तरी हातचा जाऊ नये, या आशेने प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. नांदूर मधमेश्वर कालव्याच्या आवर्तनाची प्रतीक्षा संपली असून, शुक्रवारी (दि. २०) रात्री कालव्यात पाणी सोडण्यात आले. सुरुवातीला ३०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या आवर्तनातून दीड टीएमसी पाणी मिळणार असून, साधारण तीन आठवडे पाणी सुरू राहणार आहे. त्यामुळे वैजापूर, गंगापूर व कोपरगाव तालुक्यांतील १०२ गावांमधील रब्बी पिकांना जीवनदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

यंदा पावसाच्या लहरीपणामुळे तीनही तालुक्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. खरीप पिके वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली. मात्र, विहिरी आणि बोअरवेलची भूजल पातळी खालावल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला.

अशा परिस्थितीत नांदूर मधमेश्वर कालव्याचे आवर्तन शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणार होते. धरणातील पाणीपातळी अपेक्षित स्तरावर येत नसल्याने प्रत्यक्ष आवर्तन सुरू होण्यास विलंब झाला. अखेर पाणीपातळी आवश्यक स्तरावर आल्यानंतर शुक्रवारी रात्री कालव्यात पाणी सोडण्यात आले. कालव्याच्या लाभक्षेत्रात वैजापूर तालुक्यातील ४९, गंगापूर तालुक्यातील ४६ व कोपरगाव तालुक्यातील ७ अशा एकूण १०२ गावांचा समावेश आहे.

सुमारे १२८ किलोमीटर लांबीच्या रूपांतर कालव्याच्या माध्यमातून ४३ हजार ५६० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. ४९ पोटचाऱ्यांद्वारे पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उभ्या पिकांसह भूजल पुनर्भरणालाही – या आवर्तनाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

पाणी सोडल्याशिवाय माधार घेणार नसल्याची भूमिका

हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदा मोठा संघर्ष उभारला. ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्‌यात जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषण करण्यात आले. मागणीला प्रतिसाद मिळत नसल्याने ३१ ऑक्टोबर रोजी जांबरगाव परिसरात महिलांसह शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावर धडक देत सुमारे तीन तास वाहतूक रोखली. पाणी सोडल्याशिवाय माधार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती. त्यानंतर २ नोव्हेंबरच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाबाबत निर्णय झाला.

पाणीवाटपावर प्रशासनाचा पहारा

पायथा ते माथा’ पद्धतीने पाणीवाटप होणार आहे. सर्वप्रथम गंगापूर, त्यानंतर वैजापूर आणि सर्वात शेवटी कोपरगाव तालुक्याला पाणी मिळणार आहे. पाणीकटपादरम्यान अनधिकृत उपसा, कालव्याच्या दरवाजामध्ये हस्तक्षेप आणि पाण्यावरून शेतक-यांमध्ये वाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. आवर्तन सुरळीत पार पठाचे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस संरक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.

Sambhajinagar Wildlife News : सहा तासांची धडपड, अखेर यश! विहिरीत पडलेल्या रानडुकरांची सुखरूप सुटका

तीन आठवडे आवर्तन सुरू राहण्याची शक्यता

वैजापूरसह गंगापूर व कोपरगाव तालुक्यांसाठी २० नोव्हेंबर रोजी ‘नाम’तून आवर्तन सोडण्यात आले. या आवर्तनातून दौड टीएमसी पाणी मिळण्याची शक्यता असून पायथा ते माथा नियमानुसार पाणीवाटप होईल, साधारणत तीन आठवडे आवर्तन सुरू राहण्याची शक्यता आहे. असे कार्यकारी अभियंता प्रवीण पाबळे म्हणाले.

MSEDCL Abhay Yojana 2026-27 : महावितरणची अभय योजना जाहीर; संभाजीनगरमधील लाखो ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा

 

Web Title: Nandur madhameshwar canal water release vaijapur 102 villages rabi crops sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
  • sambhaji nagar news
  • water cut

संबंधित बातम्या

MSEDCL Abhay Yojana 2026-27 : महावितरणची अभय योजना जाहीर; संभाजीनगरमधील लाखो ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा
1

MSEDCL Abhay Yojana 2026-27 : महावितरणची अभय योजना जाहीर; संभाजीनगरमधील लाखो ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा

Sambhajinagar Recruitment News : संभाजीनगर महापालिका भरतीचा निकाल वादात; CCTV तपासणीत ५० उमेदवारांचे बिंग फुटले
2

Sambhajinagar Recruitment News : संभाजीनगर महापालिका भरतीचा निकाल वादात; CCTV तपासणीत ५० उमेदवारांचे बिंग फुटले

Sambhajinagar News : वाळूजला स्वतंत्र नगरपरिषदेचा मार्ग मोकळा? १२ ग्रामपंचायतींच्या एकत्रीकरणाची तयारी सुरू
3

Sambhajinagar News : वाळूजला स्वतंत्र नगरपरिषदेचा मार्ग मोकळा? १२ ग्रामपंचायतींच्या एकत्रीकरणाची तयारी सुरू

Sambhajinagar Property Tax : मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी मोठी संधी! शास्तीवर १०० टक्के माफी
4

Sambhajinagar Property Tax : मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी मोठी संधी! शास्तीवर १०० टक्के माफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.