Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विकसित भारतासाठी जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपा’; रविंद्र चव्हाण यांचं आवाहन

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त भाजपकडून देशभर ‘समरसता संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. वाराणसीहून आलेल्या पवित्र मातीच्या कलश यात्रेचं छत्रपती संभाजीनगरात रविंद्र चव्हाण यांनी स्वागत केलं.

  • By विवेक
Updated On: Aug 09, 2026 | 04:59 PM
‘विकसित भारतासाठी जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपा’; रविंद्र चव्हाण यांचं आवाहन

‘विकसित भारतासाठी जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपा’; रविंद्र चव्हाण यांचं आवाहन

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर ‘समरसता संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत संत रविदास महाराज यांच्या जन्मभूमी वाराणसी येथील पवित्र माती कलशात घेऊन निघालेली कलश यात्रा ७ ऑगस्ट रोजी नागपूर मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी या यात्रेचे स्वागत केले.

मुकुंदवाडी येथील संत रविदास मंदिरातून या कलश यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर सायंकाळी कासलीवाल मैदान येथे कलश पूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी संत रविदास महाराज तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत रवींद्र चव्हाण यांनी अभिवादन केले.

काय म्हणाले रवींद्र चव्हाण ?

यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, “संत रविदास महाराजांनी जाती-धर्म या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन समता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. त्याच विचारांना पुढे नेत समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा संकल्प या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.”

मनोज जरांगेंच्या ‘आमदार पाडू’च्या इशाऱ्यावर प्रवीण दरेकरांचं थेट चॅलेंज; म्हणाले, ‘उमेदवार उभे करा, क्षमता सिद्ध करा’

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. जाती-धर्माच्या भिंतींपलीकडे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समरसतेचा विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आणि सर्वांनी मिळून राष्ट्रभक्तीचा धागा जपणे आज गरजेचे आहे. ‘समरसता संकल्प अभियान’ ही त्याच व्यापक विचाराची वाटचाल आहे,” असे आ. चव्हाण यांनी सांगितले.

संत रविदास महाराजांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा संकल्प

वाराणसी येथून सुरू झालेली ही कलश यात्रा जुलै २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत विविध टप्प्यांत राज्यभर प्रवास करणार आहे. संत रविदास महाराजांच्या जन्मभूमीची पवित्र माती राज्यातील सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी कलश पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल. या माध्यमातून संत रविदास महाराजांचा समता, बंधुता आणि सामाजिक एकतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा संकल्प आहे.

‘जात प्रमाणपत्र देताना अधिकारी खोडसाळपणा करतात’; मनोज जरांगेनंतर आता नरेंद्र पाटलांचा सरकारला आंदोलनाचा इशारा

या कलश यात्रेच्या स्वागत व पूजन सोहळ्यास भाजपचे राष्ट्रीय महामंत्री दुष्यंत कुमार गौतम, जालना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार किसन वानखेडे, आमदार संतोष दानवे, प्रदेश सरचिटणीस आमदार माधवी नाईक, आमदार सुहास शिरसाठ, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी आमदार तथा प्रदेश चिटणीस राम सातपुते, भाजपाचे छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष विश्वजीत गायकवाड, महापौर समीर राजूरकर, माजी आमदार संजय केणेकर, माजी महापौर भगवान घडमोडे, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह वारकरी, लिंगायत, वीरशैव, नाथ संप्रदाय, महानुभव पंथ तसेच वैष्णव संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Ravindra chavan samarasta sankalp abhiyan sant ravidas kalash yatra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • BJP
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तीन संवर्गात कंत्राटी भरती,  ८४ पदे १०२७ उमेदवार अर्ज
1

Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तीन संवर्गात कंत्राटी भरती, ८४ पदे १०२७ उमेदवार अर्ज

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
2

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
3

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Dombivali News : श्रीकांत शिंदेंचा दांडिया रद्द, पण रवींद्र चव्हाणांचा कार्यक्रम सुरू? राजेश कदमांचा थेट सवाल; म्हणाले…
4

Dombivali News : श्रीकांत शिंदेंचा दांडिया रद्द, पण रवींद्र चव्हाणांचा कार्यक्रम सुरू? राजेश कदमांचा थेट सवाल; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.