
फोटो सौजन्य सोशल मिडिया
देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
उन्हाचा चटका वाढल्याने अनेक उमेदवारांनी संशोधन केंद्रातील उद्यानात सावलीचा आडोसा घेत मुलाखतीची प्रतीक्षा केली. तहान-भूक विसरून उमेदवार आपला क्रमांक येण्याची वाट पाहत होते. महापालिकेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांची कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू असून, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. यात स्टाफ नर्सच्या २२ पदांसाठी ३९० अर्ज आले आहेत.
मंगळवारी या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. उमेदवारांची संख्या मोठी असल्याने मुलाखतींचे सत्र रात्रीपर्यंत सुरू होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ३४ पदांसाठी २३४ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, या भरती प्रक्रियेसाठी छत्रपती संभाजीनगरसह बीड, हिंगोली, परभणी, लातूर तसेच मराठवाड्यातील आणि राज्यातील विविध भागांतील उमेदवार शहरात आले आहेत.
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २८ पदांसाठी तब्बल ४०३ अर्ज प्राप्त झाले आहेत. या पदांसाठी आज बुधवार (३० सप्टेंबर) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे मुलाखती होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मंगळवारी मुलाखती घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला भामरे, आरपीएच डॉ. मेघा जोगदंड, तज्ज्ञ डॉ. राठोडकर आणि डॉ. चौधर उपस्थित होते. मोठ्या संख्येने उमेदवार आल्याने दिवसभर संशोधन केंद्र परिसराला भरती केंद्राचे स्वरूप आले होते.
Ahilyanagar Accident: एकाच दिवशी ३ जिल्ह्यांसाठी काळा दिवस; तीन अपघातांत २१ जणांचा बळी