फोटो सौजन्य सोशल मिडिया
सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून
इमिग्रेशन अँड फॉरेन्स अॅक्ट अँड रूल्स २०२५मधील तरतुदींची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. परदेशी नागरिकांना निवासाची सुविधा देणाऱ्या प्रत्येक निवास व्यवस्थापकाने त्यांच्या आगमनाची
HOTE TOOR माहिती विहित नमुन्यातील ‘Form III/С Form’ किंवा अधिकृत डिजिटल माध्यमातून नोंदविणे आवश्यक आहे. परदेशी नागरिकाच्या वास्तव्यापुरतीच ही नोंदणी मर्यादित नसून, त्याच्या निर्गमनाची माहिती आणि पुढील वास्तव्याचा पत्ताही २४ तासांच्या आत ऑनलाइन पोर्टलवर सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे परदेशी नागरिकांना निवास देणाऱ्या सर्व आस्थापनांनी नोंदणी प्रक्रियेत कोणतीही हयगय करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
विहित मुदतीत माहिती सादर न करणे, चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे किंवा परदेशी नागरिकाच्या वास्तव्याची माहिती जाणीवपूर्वक लपविणे गंभीरपणे घेतले जाणार आहे. अशा प्रकरणांत संबंधित निवास व्यवस्थापकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.
परदेशी नागरिकांच्या वास्तव्याशी संबंधित सर्व डिजिटल नोदी सुरक्षित ठेवणे आणि प्रशासनाकडून मागणी झाल्यास त्या तपासणीसाठी तात्काळ उपलब्ध करून देणेही संबंधित चालकांची जबाबदारी राहणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाब असल्याने नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.






