Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होय, खरे गद्दार उद्धव ठाकरेच; शिंदेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचा गंभीर आरोप

उद्धव ठाकरे हे आम्हाला गद्दार म्हणतात, मात्र खरे गद्दार हे उद्धव ठाकरे हेच असल्याचा गंभीर आरोप राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी उद्धव ठाकरेंवर केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 28, 2026 | 11:08 AM
होय, खरे गद्दार उद्धव ठाकरेच; शिंदेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचा गंभीर आरोप
Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे हे आम्हाला गद्दार म्हणतात, मात्र खरे गद्दार हे उद्धव ठाकरे हेच असल्याचा गंभीर आरोप राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी उद्धव ठाकरेंवर केला. खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर हे शनिवारी छत्रपती संभाजीनगर शहरात होते. त्यांच्या दौऱ्यापूर्वी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उबाठा यांच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली.

 

ते म्हणाले, त्यांचे सहा खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राज्यात दौरा सुरु केला आहे. हा दौरा फक्त आम्हाला टोमणे मारण्यासाठी आहे. खासदार गेले मात्र ते का गेले याचे कारण शोधण्याचा ते प्रयत्न करत नाहीत. हा दौरा म्हणजे त्यांना उशिराने सूचनेलेले शहाणपण असल्याचे मंत्री शिरसाट म्हणाले. शिरसाट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत पुढे म्हणाले, पक्षाचे हे सहा खासदार फुटण्यामागे सर्वस्वी गद्दार उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी हेच आहेत.

हे सुद्धा वाचा : टीईटी पेपरफुटी प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे मोठे पाऊल; पोलीस महासंचालकांना दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश

ठाकरेंवर सडेतोड टिका

२०१९ साली जेव्हा निवडणूका झाल्या तेव्हा, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांचे त्यांना फोन येत होते. पहिले मुख्यमंत्री तुम्ही व्हा मात्र युती तोडू नका, असे ते विनंती करत होते. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांचे ऐकले नाही. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत भांडणात शिवसेनेप्रमुखांनी त्यांची हयात घालवली त्यांच्याचसोबत उद्धव ठाकरेंनी युती केली, मग खरा गद्दार कोण? असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदेंनी अखेरपर्यंत शिवसेना आणि भाजपला जोडण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे युती तोडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी सुरूच ठेवला. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणताना आपणही गद्दारच आहोत याची जाणीव त्यांनी ठेवावी, अशी सडेतोड टीका शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

“शिवसेनेचे खासदार फोडण्यामागे मोठे राजकारण”

उद्धव ठाकरे यांनी आरोप केला की, शिवसेनेचे खासदार फोडून त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाठवण्यात आले. यामागे केंद्रीय नेतृत्वाचे राजकीय गणित असू शकते, असा दावा त्यांनी केला. “हा माझा आरोप नाही, हा माझा समज आहे. तो खरा असू शकतो किंवा नसू शकतो. पण निवडणुका नसताना खासदार फोडण्याची गरज काय होती?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Sanjay shirsat a leader from the shinde faction of the shiv sena has leveled serious allegations against uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • BJP
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
4

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.