मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
शिवसेना-भाजप युतीचा मुंबईत प्रचाराला आरंभ
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकारण तापले
देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार भाषण
मुंबई: राज्यात महानगरपालिका निवडणुका लागल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये सेना- भाजप युतीमध्ये लढणार आहेत. दरम्यान आज महायुतीने प्रचाराचा आरंभ केला आहे. वरळी येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
वरळी येथील प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “16 जानेवारीला मुंबईमध्ये आपल्याला महायुतीचा महापौर बसवायचा आहे. ही निवडणूक मुंबईचे चित्र आणि मुंबईकरांचे जीवन बदलवणारी निवडणूक आहे. मुंबई बदलून दाखवली आहे, मुंबईकरांचे जीवन देखील बदलून दाखवू हे यांचे वचन आहे. यासाठी महायुती या ठिकाणी आली आहे.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी आज अनेक सभा करून मुंबईत उतरत होतो तेव्हा डोळे फाडून फाडून बघत होतो, मुंबई कुठे गेली का? कुठे तुटली का? मुंबई कुठे सरकली का? कारण निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते. पंतप्रधान मोदी यांच्या काळात मुंबईला जितके मिळाले तितके यांच्या काळात मिळाले नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची हिंमत कोणाच्याही बापामध्ये नाही. आमच्यासोबत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे आहेत.”
#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या प्रचारार्थ जाहीर सभा 🕓 रात्री ८.०७ वा. | ३-१-२०२६📍मुंबई .@BJP4Maharashtra#Maharshtra #BMC #Mumbai #बृहन्मुंबईमहानगरपालिका https://t.co/0fGneJmYnF — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 3, 2026
“जन्माने रक्ताचा वारसा मिळू शकतो पण विचारांचा वारसा कर्माने मिळत असतो. हा वारसा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मुंबईकर आता जागे झाले आहेत. आम्हाला सत्ता नको आहे, माणसांची सेवा करायची आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.






