Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sillod Water Scarcity Tanker: सिल्लोड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; २१ गावांना टँकरचे चटके, केळगाव प्रकल्पाने गाठला तळ

सिल्लोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून २१ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. केळगाव लघु प्रकल्पातून शंभराहून अधिक मोटारींद्वारे होणारी अवैध पाणी चोरी प्रशासनाने रोखली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 31, 2026 | 02:53 PM
सिल्लोड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; २१ गावांना टँकरचे चटके

सिल्लोड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; २१ गावांना टँकरचे चटके

Follow Us
Follow Us:

 

  • सिल्लोड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई
  • २१ गावांना टँकरचे चटके
  • केळगाव प्रकल्पाने गाठला तळ
सिल्लोड, (वा.): गेल्या काही दिवसापासून वाढलेल्या उन्हाच्या काहीलीने सिल्लोड तालुक्यात पाणीटंचाई वाढली असून मे महिन्याच्या अखेर पर्यंत तालुक्यातील २१ गावांना टँकर पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान केळगाव लघु प्रकल्पातील भरमसाठ अवैध पाणी उपसा थांबवण्याची मागणी करून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रकल्पाने तळ गाठला आहे.

तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही एप्रिल महिन्यापासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तर मे महिन्यात टँकरचे प्रस्ताव वाढले आहे. आमठाणा, केळगाव, गोळेगाव, अंभई, उंडणगाव, जांभई, चारनेर, घाटनांद्रा या परिसरात मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यामुळे एप्रिल- मे महिन्यात अवैध पाणी उपसा केला जातो. केळगावसह तालुक्यातील इतर प्रकल्पातून देखील अवैध पाणी उपसा केला जात असून महावितरण व लघु पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. वेळीच लक्ष न दिल्यास तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाल्याने गुरुवारी अचानक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, सहायक गटविकास अधिकारी अक्षय म्हस्के यांनी केळगाव लघु प्रकल्पाला भेट दिली. यावेळी प्रकल्पातून शंभराहून आधिक विद्युत मोटारीने अवैध पाणी उपसा केला जात असल्याचे समोर आले. अवैध पाणी उपशा मुळे प्रकल्पाने तळ गाठला असून प्रकल्पातील मासे तडफडून मेल्याने पाणी दूषित झाले. या प्रकल्पावर केळगाव, जांभई, अंभई गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.

Chhatrapati Sambhajinagar: तू माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?; संशयातून 17 वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या

या गावात टँकरने पाणीपुरवठा

दरम्यान तालुक्यातील वांगी बु., चिंचवण, वरुड खुर्द, पिंप्री, बोदवड, सराटी, बोजगाव, मोढा खुर्द, वडोदवाथा, तलवाडा, आसडी, वडोदचाथा वस्ती, वरखेडी-भायगाव, पिरोळा- डोईफोडा, गव्हाली, वडाळा, विरगाव, रेलगाव परदेशीवाडी, पिंपळदरी, धावडा, जुनापानेवाडी या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. तर अंभई, जांभई गावांचे टँकरचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहे.

केळगाव प्रकल्पातील पाणी चोरीला ब्रेक

एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे तालुक्यातील केळगाव लघु प्रकल्पातून सर्रास अवैध पाणी उपसा सुरु असल्याचे वृत्त दै. नवराष्ट्र ने १९ मे रोजी प्रसिद्ध केले होते. अवैध पाणी उपशामुळे तलावाने तळ गाठला असून हे चित्र गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या पाहणीत समोर आले आहे. दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांनी महावितरण, लघु पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करीत अवैध पाणी उपसा तातडीने बंद केला.

छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटीला ‘ऑलेक्ट्रा’चा झटका! ३२ कोटींचा बस डेपो सज्ज, पण चार्जिंग स्टेशन अद्याप रखडले

Web Title: Severe water scarcity in sillod taluka 21 villages grapple with tanker dependency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Sillod
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
1

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर
3

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.