काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील आरोपीचे नाव श्रीकांत विलास राठोड (20) आणि अमोल संजय चव्हाण (दोघे रा. शेवगा) असे अटक करण्यात आलेल्याची नाव आहे. तर मुख्य आरोपी ओमकार मधुकर ताकपिरे (रा. फेरजळगाव) हा फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. तर अनिकेत अरुण राठोड (17, रा. शेवगा, ता. छत्रपती संभाजीनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो रोटेगाव (ता. वैजापूर) येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. परीक्षा सुरू असल्याने तो सध्या शेवगा येथून महाविद्यालयात ये-जा करत होता.
आमने सामने आले आणि…
ओंकार ताकपिरे हा स्वप्नील चांदणे याच्या माध्यमातून अनिकेतला फोन करून महिन्याभरापासून धमक्या देत होता. “तू माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?” असा आरोप करत त्याच्यासोबत वारंवार वाद घातला जात होता. काही दिवसांपासून समृद्धी महामार्ग परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले होते. त्यावेळी झालेल्या वादानंतर अनिकेतला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी अनिकेतला दुधड शिवारात बोलावण्यात आले. तेथे ओमकार ताकपिरे, श्रीकांत राठोड आणि अमोल चव्हाण यांच्यासोबत त्याचा पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी धारदार चाकूने अनिकेतच्या पोटात वार केल्याचा आरोप आहे.
पोलीस तपास सुरु
अनिकेत गंभीर जखमी झाला आणि करमाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिरक्तस्राव झाल्यामुळे उपचार सुरु होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अनिकेतच्या भावाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात या वादामागची संबंधित मुलगी कोण होती आणि नेमका हा वाद कश्यावरुन सुरु झाला होता, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही आहे.
Raigad Crime: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटेनरवर कार आदळली, दोन महिलांचा मृत्यू
Ans: अनिकेत अरुण राठोड (वय 17) असे मृत विद्यार्थ्याचे नाव होते.
Ans: मित्राच्या बहिणीला छेडल्याच्या संशयातून आरोपी आणि अनिकेत यांच्यात वाद सुरू होता.
Ans: श्रीकांत राठोड आणि अमोल चव्हाण यांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी ओमकार ताकपिरेचा शोध सुरू आहे.






