Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीला अन्नासह सोशल मीडियाचाही उपवास! विठ्ठलनामात रमण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे भक्तांना अनोखे आवाहन

छत्रपती संभाजीनगरमधील विठ्ठल मंदिरांच्या विश्वस्तांनी भक्तांना आषाढी एकादशी दिवशी मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहून 'डिजिटल उपवास' करण्याचे आवाहन केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 24, 2026 | 02:58 PM
आषाढीला अन्नासह सोशल मीडियाचाही उपवास! विठ्ठलनामात रमण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे भक्तांना अनोखे आवाहन

आषाढीला अन्नासह सोशल मीडियाचाही उपवास! विठ्ठलनामात रमण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे भक्तांना अनोखे आवाहन

Follow Us
Follow Us:
  • आषाढीला अन्नासह सोशल मीडियाचाही उपवास!
  • विठ्ठलनामात रमण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे भक्तांना अनोखे आवाहन
  • वाचा सविस्तर बातमी!
नीरा देवकत्ते । छत्रपती संभाजीनगर: आषाढी एकादशीला अवघे काही तास शिल्लक असून शहरातील विठ्ठल मंदिरांवर रोषणाई, फुलांची सजावट यासह जय्यत तयारी झाली आहे. दरम्यान, एकादशीच्या दिवशी दर्शन घेताना अनेक भक्तांकडून फोटो, रिल काढण्यात येतात. यामुळे इतरांची गैरसोय होते. ज्याप्रमाणे आपण एक विठ्ठलाच्या भक्तीत दिवसभर उपवास करतो त्याचप्रमाणे भक्तांनी एक दिवस मोबाईल, सामाजिक माध्यमांपासून दूर रहावे व डिजिटल उपवास करावा, असे आवाहन श्री गजानन मंदिर विश्वस्त मंडळासह अनेक विठ्ठल मंदिरांच्या विश्वस्तांनी केले आहे.

आषाढी एकादशी अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपली असून शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये एकादशीच्या पूर्वसंध्येलाच ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च गजर होणार आहे. शुक्रवारी
सायंकाळी तसेच शनिवारी पहाटे अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमातून कलावंत आपली सेवा श्री विठ्ठलचरणी अर्पण करणार आहेत. दरम्यान, एकादशीच्या दिवशी केवळ अन्नाचाच नव्हे, तर मोबाईल आणि सोशल मीडियाचाही ‘डिजिटल उपवास’ करून विठ्ठल नामात तल्लीन व्हावे, असे आवाहन विविध मंदिरांच्या विश्वस्त मंडळांनी केले आहे.

मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. मात्र, दर्शनाच्या रांगेत किंवा मंदिर परिसरात मोबाईल, सोशल मीडिया, रील्स पाहणे किंवा छायाचित्रण करण्यात अनेकजण व्यस्त असल्याने भक्तीच्या वातावरणात व्यत्यय येतो. ही बाब लक्षात घेऊन यंदा ‘डिजिटल उपवास’ ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. भाविकांनी शक्यतो मोबाईल घरी किंवा वाहनात ठेवून संपूर्ण दिवस विठ्ठल नामस्मरणात व्यतीत करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ZP School Condition: जिवंत मरणाच्या दाढेत विद्यार्थी! पावसामुळे शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले, पालकांमध्ये भीतीचे सावट

धावणी मोहल्ला (शहागंज), ज्योतीनगर, जयसिंगपुरा, पंढरपूर गाव, सुधाकरनगर यांसह शहरातील अनेक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. या आवाहनाला भाविकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. शिस्तबद्ध दर्शनासह काही काळ मोबाईलपासून दूर राहून भक्तीचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.

विश्वस्तांच्या आवाहनाचे भक्तांकडून स्वागत

शहरातील २० ते २५ विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात काही काळ मोबाईलपासून दूर राहून शांतचित्ताने दर्शन घेतल्यास भक्तीचे वातावरण अधिक पवित्र व प्रसन्न राहील, अशी भावना शहरातील अनेक भाविकांनी व्यक्त केली.

पहाटे पाच वाजेपासून दर्शनाची सोय

आषाढी एकादशीच्या दिवशी बहुतांश मंदिरांचे दरवाजे पहाटे ५ वाजल्यापासून दर्शनासाठी खुले राहणार आहेत. पहाटे महाआरतीनंतर रात्री उशिरापर्यंत दर्शन सुरू राहील. भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, फराळ, राजगिरा लाडू आदी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

NEET Paper Leak Reaction: ‘नीट’वरून काँग्रेस रस्त्यावर, तर राहुल गांधीविरुद्ध भाजप आक्रमक; संभाजीनगरमध्ये फुल हायव्होल्टेज ड्रामा

Web Title: Vitthal temple trustees appeal for digital fast on ashadhi ekadashi marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Ashadhi Ekadashi
  • Chhatrapati Sambhajinagar
  • digital
  • Social Media

संबंधित बातम्या

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या
1

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
2

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.