Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा-देवळाईत पाणीटंचाई परिसरातील बोअरवेल कोरडया; पालिकेने टँकर सुरू करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगरच्या सातारा-देवळाई परिसरात भीषण पाणीटंचाई. बोअरवेल आटल्याने रहिवाशांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. कंत्राटदारांवर कारवाईची मागणी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 16, 2026 | 05:46 PM
सातारा-देवळाईत पाणीटंचाई परिसरातील बोअरवेल कोरडया

सातारा-देवळाईत पाणीटंचाई परिसरातील बोअरवेल कोरडया

Follow Us
Close
Follow Us:

 

  • सातारा-देवळाईत पाणीटंचाई
  • परिसरातील बोअरवेल कोरडया
  • पालिकेने टँकर सुरू करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा-देवळाई परिसरात उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. बोअरवेल आटल्याने नागरिकांना खासगी टँकरचे महागडे पाणी खरेदी करावे, लागत आहे. या भागात महापालिकेने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी महापौरांकडे केली आहे. शहरासाठी २७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना सुरू असून पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी अतिरिक्त पाणी आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांत पाण्याची टंचाई कायम आहे. ज्या भागांत नळजोडणी आहे, तेथे आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्यानेनागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे.

कंत्राटदारांवर कारवाई करा

नगरसेवकांनी नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात ड्रमनुसार पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने टैंकर सेवा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पाइपलाइनचे काम विलंबाने करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मराठवाड्याची चिंता वाढली! उन्हाच्या तडाख्याने धरणांतील पाणीपातळी घटली; जायकवाडीत ७२% साठा शिल्लक

नो नेटवर्क भागाची मदार टँकरवर

नो-नेटवर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा-देवळाई परिसरात परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. येथील अनेक बोअरवेल कोरड्या पडल्यामुळे नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे आर्थिक ताणही वाढत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. या पाश्र्श्वभूमीवर प्रभाग २६ मधील नगरसेविका सविता कुलकर्णी यांच्यासह अप्पासाहेब हिवाळे, पद्मसिंग राजपूत आणि मौहन साळवे यांनी महापौर समीर राजूरकर तसेच आयुक्त जी. श्रीकांत यांना निवेदन दिले. त्यामध्ये सातारा-देवळाई भागातील पाइपलाइनचे काम संथगतीने सुरू असल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पाईपलाईनचे काम संथ, नागरिकांची गैरसोय

सातारा-देवळाई परिसरात नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम अपेक्षेपेक्षा मंद गतीने होत असल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असून टँकरवरील अवलंबित्व वाढले आहे. त्यामुळे कामाचा वेग वाढवून तातडीने पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा! ७५० शेतकऱ्यांना नोटिसा; धावपट्टी १२ हजार फुटांपर्यंत वाढणार

Web Title: Water crisis in satara deolai chhatrapati sambhajinagar demand for tankers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Sambhaji Nagar 2026: संभाजीनगरमध्ये ‘व्हीप’ वॉर! अंबादास दानवेंवर स्वपक्षीय आमदाराचे गंभीर आरोप
1

Sambhaji Nagar 2026: संभाजीनगरमध्ये ‘व्हीप’ वॉर! अंबादास दानवेंवर स्वपक्षीय आमदाराचे गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar: ट्रक चोरी, कर्जाचा बोजा! पोलिसांनी चोराला मदत केली म्हणत…; 26 वर्षीय तरुणाचा टोकाचा निर्णय
2

Chhatrapati Sambhajinagar: ट्रक चोरी, कर्जाचा बोजा! पोलिसांनी चोराला मदत केली म्हणत…; 26 वर्षीय तरुणाचा टोकाचा निर्णय

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत
3

मनपाचे झोन कार्यालय लाचखोरीने हादरले! बांधकाम कामगार प्रमाणपत्रासाठी 550 रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत

छ. संभाजीनगर मनपाचा सावळा गोंधळ! मालमत्ता कर सवलतीसाठी झुंबड, पण पहिल्याच दिवशी वेबसाईट ‘क्रॅश’
4

छ. संभाजीनगर मनपाचा सावळा गोंधळ! मालमत्ता कर सवलतीसाठी झुंबड, पण पहिल्याच दिवशी वेबसाईट ‘क्रॅश’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.